शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
2
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
3
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
4
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
5
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
6
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
7
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
8
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
9
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
10
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
11
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
12
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
13
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
14
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
15
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
16
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
17
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
18
इराणकडून आखाती देशांच्या तोंडचं पाणी पळवण्याची तयारी, पाणी आणि गॅस प्रकल्पांवर हल्ले, नव्या चालीमुळे खळबळ
19
बच्चू कडूंनी रचला खुनाचा कट? आमदार प्रवीण तायडेंचा ऑडिओ क्लिपसह खळबळजनक दावा
20
SIP की एकरकमी गुंतवणूक? १ कोटींचा टप्पा गाठण्यासाठी सर्वात सोपा मार्ग कोणता? पाहा गणित
Daily Top 2Weekly Top 5

LPG Gas Crisis: ‘ओव्हन’, ‘इंडक्शन’सह वॉटर हीटरला वेटिंग; मागणी वाढल्याने स्टॉक संपला

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 14, 2026 18:59 IST

मागणी वाढल्याने ग्राहकांना तोंड देताना विक्रेत्यांची दमछाक

कोल्हापूर : गॅसटंचाईमुळे नागरिकांचा आता इलेक्ट्रिक वस्तू खरेदीकडे कल वाढू लागला आहे. गेल्या तीन-चार दिवसांपासून ‘ओव्हन’, ‘इंडक्शन’सह ‘वॉटर हीटर’च्या मागणीत तीन पटीने वाढ झाली आहे. मागणी वाढली आणि विक्रेत्यांच्या गोडावूनमध्ये इलेक्ट्रिक वस्तू नसल्याने ग्राहकांना वेटिंग करावे लागत आहे.कोल्हापूर शहरासह काही प्रमाणात ग्रामीण भागात स्वयंपाक, अंघोळीचे पाणी तापवण्यासाठी गॅसचा वापर सर्रास केला जातो. मात्र, सध्या युद्धामुळे गॅसची टंचाई जाणवत आहे. नागरिकांना मागणीच्या प्रमाणात गॅस उपलब्ध होत नसल्याने हवालदिल झाले आहेत. युद्ध कधी बंद होईल आणि गॅसपुरवठा कधी सुरळीत होईल, याचा अंदाज येत नाही. त्यामुळे ग्राहकांनी आता इलेक्ट्रिक वस्तू खरेदी करण्याचा सपाटा लावला आहे.यामध्ये ‘ओव्हन’, ‘इंडक्शन’, ‘वॉटर हीटर’च्या मागणीत मोठी वाढ झाली आहे. त्यात, अचानक मागणी वाढल्याने या इलेक्ट्रिक वस्तूंची टंचाई भासू लागली आहे. बहुतांशी इलेक्ट्रिक दुकानांत स्टॉकच शिल्लक नाही. नियमितपेक्षा तीन पटीने मागणी वाढल्याने ग्राहकांना तोंड देताना विक्रेत्यांची दमछाक होताना दिसत आहे.

मागणी ३ हजारांची, मिळतात सातशे!इंडक्शनची मागणी तीन हजार नगांची केली तर संबधित कंपन्यांकडून केवळ ७०० पाठवले जातात. त्यामुळे ग्राहकांना वेटिंगवर राहावे लागत आहे.

‘ओव्हन’, ‘इंडक्शन’, वॉटर हीटरच्या मागणीत मोठी वाढ झाली आहे. ग्राहकांकडून बुकिंग करून घेऊन उपलब्ध झाल्यानंतर त्यांना वस्तू द्यावी लागत आहे. सध्या तरी या उपकरणाच्या दरात वाढ झालेली नाही. - मुग्धा कुलकर्णी (संचालक, सारस इलेक्ट्रॉनिक्स कोल्हापूर)

English
हिंदी सारांश
Web Title : LPG Crisis Spurs Electric Appliance Demand; Stock Depleted, Waiting Period!

Web Summary : Kolhapur faces LPG shortage due to war, driving up demand for electric appliances like ovens, induction cooktops, and water heaters. Shops report stock depletion, forcing customers onto waiting lists as demand triples.
टॅग्स :Cylinderगॅस सिलेंडरUS Israel Iran Warअमेरिका-इस्रायल-इराण वॉर