LPG Gas Crisis: ‘ओव्हन’, ‘इंडक्शन’सह वॉटर हीटरला वेटिंग; मागणी वाढल्याने स्टॉक संपला

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 14, 2026 18:59 IST2026-03-14T18:58:30+5:302026-03-14T18:59:00+5:30

मागणी वाढल्याने ग्राहकांना तोंड देताना विक्रेत्यांची दमछाक

Due to gas shortage, citizens are now in great demand for electric appliances like ovens and induction | LPG Gas Crisis: ‘ओव्हन’, ‘इंडक्शन’सह वॉटर हीटरला वेटिंग; मागणी वाढल्याने स्टॉक संपला

LPG Gas Crisis: ‘ओव्हन’, ‘इंडक्शन’सह वॉटर हीटरला वेटिंग; मागणी वाढल्याने स्टॉक संपला

कोल्हापूर : गॅसटंचाईमुळे नागरिकांचा आता इलेक्ट्रिक वस्तू खरेदीकडे कल वाढू लागला आहे. गेल्या तीन-चार दिवसांपासून ‘ओव्हन’, ‘इंडक्शन’सह ‘वॉटर हीटर’च्या मागणीत तीन पटीने वाढ झाली आहे. मागणी वाढली आणि विक्रेत्यांच्या गोडावूनमध्ये इलेक्ट्रिक वस्तू नसल्याने ग्राहकांना वेटिंग करावे लागत आहे.

कोल्हापूर शहरासह काही प्रमाणात ग्रामीण भागात स्वयंपाक, अंघोळीचे पाणी तापवण्यासाठी गॅसचा वापर सर्रास केला जातो. मात्र, सध्या युद्धामुळे गॅसची टंचाई जाणवत आहे. नागरिकांना मागणीच्या प्रमाणात गॅस उपलब्ध होत नसल्याने हवालदिल झाले आहेत. युद्ध कधी बंद होईल आणि गॅसपुरवठा कधी सुरळीत होईल, याचा अंदाज येत नाही. त्यामुळे ग्राहकांनी आता इलेक्ट्रिक वस्तू खरेदी करण्याचा सपाटा लावला आहे.

यामध्ये ‘ओव्हन’, ‘इंडक्शन’, ‘वॉटर हीटर’च्या मागणीत मोठी वाढ झाली आहे. त्यात, अचानक मागणी वाढल्याने या इलेक्ट्रिक वस्तूंची टंचाई भासू लागली आहे. बहुतांशी इलेक्ट्रिक दुकानांत स्टॉकच शिल्लक नाही. नियमितपेक्षा तीन पटीने मागणी वाढल्याने ग्राहकांना तोंड देताना विक्रेत्यांची दमछाक होताना दिसत आहे.

मागणी ३ हजारांची, मिळतात सातशे!

इंडक्शनची मागणी तीन हजार नगांची केली तर संबधित कंपन्यांकडून केवळ ७०० पाठवले जातात. त्यामुळे ग्राहकांना वेटिंगवर राहावे लागत आहे.

‘ओव्हन’, ‘इंडक्शन’, वॉटर हीटरच्या मागणीत मोठी वाढ झाली आहे. ग्राहकांकडून बुकिंग करून घेऊन उपलब्ध झाल्यानंतर त्यांना वस्तू द्यावी लागत आहे. सध्या तरी या उपकरणाच्या दरात वाढ झालेली नाही. - मुग्धा कुलकर्णी (संचालक, सारस इलेक्ट्रॉनिक्स कोल्हापूर)

Web Title : एलपीजी संकट से इलेक्ट्रिक उपकरणों की मांग बढ़ी; स्टॉक खत्म, वेटिंग!

Web Summary : कोल्हापुर में युद्ध के कारण एलपीजी की कमी, ओवन, इंडक्शन और वॉटर हीटर जैसे इलेक्ट्रिक उपकरणों की मांग बढ़ गई। दुकानों ने स्टॉक खत्म होने की सूचना दी, जिससे ग्राहकों को वेटिंग लिस्ट में रखा गया क्योंकि मांग तीन गुना हो गई।

Web Title : LPG Crisis Spurs Electric Appliance Demand; Stock Depleted, Waiting Period!

Web Summary : Kolhapur faces LPG shortage due to war, driving up demand for electric appliances like ovens, induction cooktops, and water heaters. Shops report stock depletion, forcing customers onto waiting lists as demand triples.