शहरं
Join us  
Trending Stories
1
"अंबरनाथ, बदलापूरमधून आम्ही तुम्हाला हाकलून दिले, उल्हासनगरमध्ये धनुष्यबाणाचा सुपडासाफ करु"
2
राजकारणातून निवृत्तीच्या चर्चांवर खुद्द नारायण राणेंचे उत्तर, म्हणाले- "जर माझ्या पदाचा..."
3
हिंदूंवरचे अत्याचार बांगलादेशला महागात पडणार! IPL 2026 पाठोपाठ आता 'या' खेळातही NO ENTRY?
4
एक्स बॉयफ्रेंड, थर्टी फर्स्टची भेट अन् घरात मिळाला मृतदेह; अमेरिकेत हत्या झालेली निकिता कोण?
5
एकदा फूल चार्ज केल्यानंतर ४० दिवस चार्जरकडं बघायचं नाही? Oppo A6 Pro 5G भारतात लॉन्च!
6
व्हेनेझुएलानंतर अमेरिकेच्या रडारवर कोण? ट्रम्प यांनी ‘या’ देशाचं नाव घेत दिले स्पष्ट संकेत
7
भाग्यवान! पिठाची गिरणी चालवणाऱ्याचं एका क्षणात फळफळलं नशीब, 'असा' झाला करोडपती
8
अमेरिकेचे उपराष्ट्राध्यक्ष जेडी व्हान्स यांच्या घरावर हल्ला, खिडक्यांची तोडफोड, एकाला अटक!
9
काय सांगता! भारतात जे काम फ्री होते, त्यासाठीच अमेरिकेत प्रतितास ९ हजार कमावतात लोक
10
राजस्थानच्या सीकर आणि जालोरमध्ये भीषण अपघात; ६ लोकांचा मृत्यू, १४ जण जखमी
11
"युतीसाठी मी ५० मिनिटे भाजपा कार्यालयात ताटकळत बसलो, पण शेवटी..."; प्रताप सरनाईकांचा आरोप
12
५ लाख थकवले, पैसे मागितले की रडतो...; 'मन हे बावरे'च्या निर्मात्यावर शशांकचे आरोप, मंदार देवस्थळींविरोधात कायदेशीर कारवाई करणार
13
वैभव सूर्यवंशीची कॅप्टन्सीत पहिली फिफ्टी! १० उत्तुंग षटकारांसह २८३ च्या स्ट्राईक रेटनं कुटल्या धावा
14
भाजप निवडणूक आयोगाला खिशात घेऊन फिरतंय का? बिनविरोध निवडीवरून नाना पटोलेंचा घणाघात!
15
BRICS नष्ट करण्याची तयारी; अमेरिकेला का हवे 'या' 5 देशांवर नियंत्रण? जाणून घ्या...
16
आंध्र प्रदेशात ONGC पाइपलाइनमधून गॅसगळतीनंतर भीषण आग; परिसरात भीतीचे वातावरण
17
मीरा भाईंदरमध्ये आठवडा होत आला तरीही उमेदवारांची शपथपत्रेच 'अपलोड' केलेली नाहीत
18
‘५ लाख द्या, नाहीतर अश्लील व्हिडीओ व्हायरल करेन’, ड्रायव्हरची मालकिणीला धमकी, त्यानंतर...  
19
नवनीत राणांनी अजित पवारांना दिलेल्या 'त्या' सल्ल्यावर खोडके बरसले; म्हणाले 'औकातीत राहून बोलायला शिका'
20
व्हेनेझुएलावर अचानक हल्ला करून अमेरिकेचा चीन-रशियाला मोठा इशारा; भारतावर काय होणार परिणाम?
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur Municipal Election 2026: अर्ज माघारीत घोळ झाला, कोल्हापुरात 'या' प्रभागात महायुतीचा अधिकृत उमेदवारच नाही राहिला

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 3, 2026 13:40 IST

फरास-रमेश पोवार यांच्यात रस्सीखेच

कोल्हापूर : कोल्हापूर महापालिकेच्या निवडणुकीत शुक्रवारी अर्ज माघारीच्या दिवशी शेवटच्या क्षणी बऱ्याच घोळानंतर प्रभाग क्रमांक १२ क मधून शिंदेसेना व राष्ट्रवादी (अजित पवार) पक्षाचे उमेदवार या दोन्ही पक्षांनी पुरस्कृत केले. या दोन्ही पक्षांतील बेबनाव, एकेका जागेसाठीची रस्सीखेच आणि फरास-पोवार या उमेदवारांच्या पातळीवरील जाणीवपूर्वक समन्वयाचा अभाव त्यासाठी कारणीभूत ठरला.तिथे क मधून वैष्णवी वैभव जाधव यांना राष्ट्रवादीने पुरस्कृत केल्याचा दावा केला आहे, तर शिंदेसेनेने अमृता सुशांत पोवार यांना पुरस्कृत केले असल्याचे त्या पक्षाकडून सांगण्यात आले. एकच मतदारसंघ आणि एकाच महायुतीचे दोन उमेदवार असे चित्र तिथे पुढे आले.घडले ते असे : या प्रभागातील प्रत्येकी दोन जागा राष्ट्रवादी व शिंदेसेनेच्या वाट्याला आल्याचे नेत्यांच्या बैठकीत निश्चित झाले. त्यातील मतदारसंघ अ मधून ओबीसी प्रवर्गातून आश्किन आजरेकर यांना उमेदवारी देण्यात आली. ब आणि क मध्ये सर्वसाधारण महिला असे आरक्षण होते. तर ड हा खुला होता. तिथे आदिल फरास यांनी अर्ज दाखल केला. ब मधून राष्ट्रवादीकडून हसीना बाबू फरास यांनी, तर संगीता रमेश पोवार यांनीही शिंदेसेनेकडून अर्ज दाखल केला. राष्ट्रवादी अंतर्गत झालेल्या चर्चेतून एकाच कुटुंबात दोन उमेदवार नकोत म्हणून हसीना फरास यांनी माघार घेण्याचे ठरले. 

वाचा : इचलकरंजीत 'शिव-शाहू'च्या उमेदवारांना माघारीसाठी ४० लाखांची ऑफर; शशांक बावचकर यांचा आरोपसंगीता पोवार यांचा ब आणि क मध्ये अर्ज होता. त्यामुळे त्यांनी ब मधून माघार घ्यावी आणि क मधून निवडणूक लढवावी, असे प्रयत्न राष्ट्रवादीच्या पातळीवर झाले. परंतु त्यास पोवार यांच्याकडून प्रतिसाद मिळाला नाही. क मधून अर्ज मागे घेऊन त्या मोकळ्या झाल्या. परिणामी महायुतीला क मध्ये उमेदवारच राहिला नाही. त्यामुळे दोन्ही पक्षांनी अगोदर ज्यांच्याशी बोलणे करून ठेवले होते त्या उमेदवारांना पुरस्कृत केले. परिणामी, जागा एक आणि दोन उमेदवार रिंगणार राहिले. आम्हाला ३० डिसेंबरलाच आमदार राजेश क्षीरसागर यांनी ब मधून एबी फॉर्म दिला होता. त्यामुळे आमचा तोच अर्ज कायम झाला. तेथूनच लढावे अशा आमदार क्षीरसागर यांच्या सूचना होत्या. त्यानुसारच क मधून माघार घेतल्याचे उमेेदवार संगीता पोवार यांचे पती रमेश पोवार यांनी स्पष्ट केले.

English
हिंदी सारांश
Web Title : Kolhapur Election Fiasco: Alliance Fails to Field Candidate in Ward 12C

Web Summary : Kolhapur's municipal election sees alliance infighting. Ward 12C lacks a unified candidate due to coordination failures between Shiv Sena (Shinde) and NCP (Ajit Pawar). Candidate withdrawals resulted in no official alliance nominee, creating confusion and intra-party competition.
टॅग्स :Kolhapur Municipal Corporation Electionकोल्हापूर महानगरपालिका निवडणूक २०२६kolhapurकोल्हापूरMunicipal Electionमहानगरपालिका निवडणूक २०२६Mahayutiमहायुती