शहरं
Join us  
Trending Stories
1
RCBच्या रोमहर्षक विजयानंतर विराट कोहली रडला अन् अनुष्का शर्माही... Video Viral 
2
RCB चा प्ले ऑफमध्ये प्रवेश पक्का; रचीनचा Run Out अन् ड्यू प्लेसिसच्या स्टनर कॅचने फिरला सामना 
3
प्रज्वल रेवण्णांच्या अडचणीत वाढ, ब्लू कॉर्नर नोटीसनंतर अटक वॉरंट जारी
4
आग्र्यात बूट व्यावसायिकांच्या घरावर छापा, सापडलं कोट्यवधींचं घबाड; नोटांचे बंडल पाहून अधिकारीही चक्रावले
5
आम्ही भाजपावाले आहोत, आम्हाला घाबरणं माहिती नाही, पाकव्याप्त काश्मीरचा ताबा मिळवणारच- अमित शाह
6
"संविधानाचे रक्षण करणे हेच आमचे ध्येय, कारण...", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल
7
OUT or NOT-OUT? Faf Du Plessis दुर्दैवीरित्या बाद झाला, अम्पायरच्या निर्णयावर विराट खवळला 
8
"मी उद्या भाजपा कार्यालयात येतोय, तुम्हाला...", विभव कुमार यांच्या अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांचे नरेंद्र मोदींना आव्हान
9
विराट कोहलीचा भीमपराक्रम! जमला नाही कोणालाच असा विक्रम, ख्रिस गेल याच्याशीही बरोबरी
10
विभव कुमार यांच्या अटकपूर्व जामीन याचिकेवर न्यायालयाचा आदेश; म्हणाले...
11
Ruturaj Gaikwad च्या विकेटवर अनुष्का शर्माचं भन्नाट सेलिब्रेशन जणू जिंकला सामना  
12
विदर्भात विजांच्या कडकडाटासह पाऊस, मुंबईत कशी असणार स्थिती?; असा आहे हवामान अंदाज
13
विमान प्रवास करताना कान दुखतो का? 'या' 5 सोप्या टिप्स फॉलो करा, नक्कीच वाटेल 'रिलॅक्स'!
14
धक्कादायक! पुणे-सोलापूर हायवेवर होर्डिंग कोसळून दोन जण जखमी 
15
"मुंबई बॉम्बहल्ल्यातील आरोपी प्रचारात पाहून बाळासाहेबांच्या आत्म्यालाही वेदना होत असतील"
16
Rohit Sharma अखेर व्यक्त झाला! मुंबई इंडियन्सच्या अपयशाचं खरं कारण सांगितलं, म्हणाला... 
17
निस्वार्थी सुरेश रैना! विराट कोहलीनं सांगितली जगाला माहीत नसलेली Mr. IPL ची गोष्ट, Video 
18
32000 रुपयांचा बँक बॅलन्स, 9 लाखांचे शेअर्स... स्वाती मालीवाल यांच्याकडे किती संपत्ती? जाणून घ्या...
19
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
20
दादा कोंडकेंच्या 'मुका घ्या मुका' चित्रपटाची अलका कुबल यांना होती ऑफर पण...

कोल्हापूर जिल्ह्यात दाट धुके पसरल्याने तांत्रिक बिघाड, वीजपुरवठ्यात व्यत्यय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 05, 2018 12:25 PM

कोल्हापूर जिल्ह्यात सोमवारी पहाटे दाट धुके पसरल्याने वीजपुरवठ्यात तांत्रिक बिघाड झालेला आहे. पहाटे ५.१५ च्या सुमारास महापारेषणच्या तळंदगे ४४० वीजउपकेंद्रातून मुडशिंगी २२० अतिउच्चदाब उपकेंद्राला वीजपुरवठा करणाऱ्या २२० वाहिनीची अर्थिंग तार तुटल्याने मुडशिंगी अतिउच्चदाब उपकेंद्र बंद पडले.

ठळक मुद्देकोल्हापूर जिल्ह्यात दाट धुके पसरल्याने तांत्रिक बिघाड वीजपुरवठ्यात व्यत्यय

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यात सोमवारी पहाटे दाट धुके पसरल्याने वीजपुरवठ्यात तांत्रिक बिघाड झालेला आहे. पहाटे ५.१५ च्या सुमारास महापारेषणच्या तळंदगे ४४० वीजउपकेंद्रातून मुडशिंगी २२० अतिउच्चदाब उपकेंद्राला वीजपुरवठा करणाऱ्या २२० वाहिनीची आर्थिंग तार तुटल्याने मुडशिंगी अतिउच्चदाब उपकेंद्र बंद पडले.

परिणामी कोल्हापूर जिल्ह्यातील अनेक भागात महावितरणचा वीजपुरवठा बंद झाल्याने ग्राहकांची गैरसोय झाली होती. जवळपास चार तास वीजपुरवठा बंद राहिला. मात्र धुके कमी होताच यंत्रणा पूर्ववत होत असून बहुतांश वीजपुरवठा पूर्ववत करण्यात आला आहे. उर्वरित ठिकाणी काम युध्दपातळीवर सुरू आहे.

दाट धुके पडल्याने हवेतील आर्द्रता वाढते. आर्द्रतेत पाण्याचा अंश असल्याने वाहिनीतील दोन तारांमधील हवेमुळे विलग राहणारा विद्युत दाब एक होतो. त्यामुळे विजेचे वहन-पारेषण पुढे होऊ शकत नाही. पर्यायाने वीजपुरवठा ठप्प होतो.

अशाच प्रकारचा बिघाड आज पहाटेपासून विविध अतिउच्चदाब वीजउपकेंद्रांना येणाऱ्या वाहिन्यावर होत असल्याने अर्ध्या जिल्ह्यातील विद्युत पारेषण यंत्रणा ठप्प झाली होती. जसजसे धुके कमी होत आहे तसतशी पारेषण यंत्रणा पूर्ववत केली जात आहे.

या अतिउच्चदाब वीज उपकेंद्रांना धुक्याचा फटका बसलामहापारेषणच्या मुडशिंगी, तिळवणी, बिद्री, फाईव स्टार, इचलकरंजी, जयसिंगपूर, कोथळी, राधानगरी, कुरूंदवाड या अतिउच्चदाब वीजउपकेंद्रांचा वीजपुरवठा पहाटेपासून ठप्प होता. सुमारे २९५ मेगावॅट विजेचे पारेषण ठप्प झाले

वीजपुरवठा पूर्ववत करण्याचे काम सुरूसकाळी ९ वाजेच्या सुमारास मुडशिंगी उपकेंद्राला कराडहून आलेल्या वाहिनीवरून सुरळीत करण्यात आले. कोल्हापूर शहरातील शाहूमिल व विद्यापीठ उपकेंद्राला धुक्याचा फटका बसला होता. सकाळी ९ .३० च्या सुमारास दोन्ही उपकेंद्राचा वीजपुरवठा सुरू झाल्याने कोल्हापूर शहरातील वितरण पूर्ववत झाले. बिद्री, कोथळी, राधानगरी, गोकुळ शिरगाव, जयसिंगपूर व कुरूंदवाड अतिउच्चदाब केंद्रातून होणारा वीजपुरवठा पूर्ववत सुरु झाला आहे. गडहिंग्लज विभागातील वीजपुरवठाही पूर्ववत करण्यात आला आहे. सद्यस्थितीत फाईव्ह स्टार एमआयडीसी, हुपरी व इचलकरंजी येथील वीजपुरवठा बंद आहे. तो देखील थोड्याच वेळात पूर्ववत केला जात आहे.सांगलीला जादा फटका नाही...सांगली जिल्ह्यात मिरज भागातील ३३/११  वीज उपकेंद्राचा पुरवठा काहीअंशी पर्यायी मार्गाने सुरू करण्यात आला, तर २२० केव्ही मिरज ते विटा व कर्वे ते कडेगाव अतिउच्चदाब वीज वाहिन्यांवर बिघाड झाला असून पैकी कर्वे- कडेगाव वाहिनी कऱ्हाडहून सुरू केली आहे. बाकी सांगली जिल्ह्यात वीज पुरवठा सुरळीतपणे सुरू आहे.

टॅग्स :mahavitaranमहावितरणkolhapurकोल्हापूर