शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रशांत किशोर यांना बिहारच्या आरा येथील रॅलीमध्ये गंभीर दुखापत, उपचारासाठी पाटणाला रवाना
2
छांगुर बाबावर EDची मोठी कारवाई! मुंबई, लखनौमध्ये छापे; ६० कोटींहून जास्तीचे मनी लाँड्रिंग उघड
3
"मी कोणाला छेडत नाही; पण मला कुणी त्रास दिला तर..."; एकनाथ शिंदेंचा उबाठा गटाला इशारा
4
महाराष्ट्र मराठी माणसाच्या बापाचाच! इथे कुणी वेडंवाकडं वागायचा प्रयत्न केला तर...- राज ठाकरे
5
"आता दुकाने नाही शाळाच बंद करेन"; त्रिभाषा सूत्रावरुन राज ठाकरेंनी सरकारला दिला इशारा
6
वैभव सूर्यवंशीच्या 'त्या' कृत्यामुळे मोठा गोंधळ; विराट कोहलीचे चाहते प्रचंड संतापले, कारण...
7
"जो भारताचा नागरिक नाही...", बंगालमधील दुर्गापूरमध्ये पंतप्रधान मोदींची सभा; घुसखोरांना इशारा दिला
8
भाजपा आमदाराच्या काकांना पालिका कर्मचाऱ्यांकडून लाठ्याकाठ्यांनी बेदम मारहाण, कारण काय?  
9
करुण नायरला दोन्ही टेस्टमध्ये संधी मिळेल! फ्लॉप शोनंतरही कोचला त्याच्यावर 'भरवसा'
10
"विधिमंडळात हे माझे ३६वे वर्ष, पण एवढ्या वर्षात..."; जयंत पाटील यांना नेमकी कसली खंत?
11
काल युद्धाचा इशारा, आज राजधानी सोडून पळून गेले... सिरियाचे राष्ट्राध्यक्ष अल-शारांचा अजब कारभार
12
नारायणपूरमध्ये सुरक्षा दलांना मोठे यश, चकमकीत ६ नक्षलवादी ठार
13
IND vs ENG ...तर रिषभ पंतला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळवू नका! शास्त्रींनी दिला गिल-गंभीर जोडीला सल्ला
14
ITI प्रवेशासाठी 'अनुसूचित जाती' व 'अल्पसंख्याक'चा दुहेरी लाभ घेणाऱ्यांवर होणार कारवाई
15
Dukes Ball Controversy : विषय हार्ड! चेंडूच्या क्वॉलिटी संदर्भातील मुद्द्यावर कंपनी घेणार रिव्ह्यू
16
"कुणाचा बाप आला... बापाचा बाप आला... आजोबा आला तरी मुंबई...", CM देवेंद्र फडणवीसांनी ठणकावलं
17
भीषण अपघातात ट्रकखाली चौघे शंभर फूट फरफटत गेले, पित्यासह दोन चिमुकल्यांचा मृत्यू
18
बौद्ध भिक्षूंचे 80 हजारहून अधिक अश्लील फोटो-व्हिडिओ; ब्लॅकमेल करून थायलंडमधील महिलेनं कमावले 102 कोटी
19
कॅनडामध्ये विमान हायजॅक! अधिकाऱ्यांमध्ये घबराट; मागून पाठवले F-35 लढाऊ विमान पण...
20
"CM फडणवीसांनी ४० फोन केले पण..."; ठाकरेंनी मतांची माती केली म्हणत एकनाथ शिंदेंनी सगळचं काढलं

बॉक्साईट उत्खननामुळे पावनखिंडीचे अस्तित्व धोक्यात

By admin | Updated: April 23, 2015 00:57 IST

‘उत्खनन बंद’ची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी : ग्रामस्थ, इतिहासप्रेमींतून संताप; आंदोलनाचा इशारा

राजेंद्र लाड - आंबा शिवकालीन जाज्वल्य इतिहास आणि संपन्न जैवविविधता जपलेल्या सह्याद्रीच्या घाटमाथ्यावरील पावनखिंड, मानोली सडा, वाघझरा परिसरात ‘इको झोन’च्या निर्बंधांना बगल देत बेधडक बॉक्साईट उत्खनन सुरू केल्याने इतिहास व निसर्गप्रेमींतून संताप व्यक्त होत आहे. जंगल पोखरून बॉक्साईटचे उत्खनन सुरू असल्यामुळे खाणीपासून दीड किलो मीटरवर पायथ्यासी असलेल्या पावनखिंडीचे अस्तित्व धोक्यात आले आहे. ही बॉक्साईट खाण बंद करावी, अशी मागणी वीररत्न बाजीप्रभू तरुण मंडळाचे अध्यक्ष नारायण पाटील व रामचंद्र यादव यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्धारे केली आहे.याबाबतचे निवेदन पालकमंत्री चंद्रकांत पाटील, आमदार सत्यजित पाटील, पर्यावरण व पर्यटन मंत्रालय व जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहे. त्यामुळे पावनखिंड जागतिक वारसास्थळाचा एक भाग आहे. त्याचे संरक्षण व संवर्धन करणे स्थानिक लोकांबरोबर जागतिक स्तरावरही याचा विचार होत असताना येथे मात्र बेधडक उत्खनन सुरू आहे, याचे आश्चर्य इतिहासप्रेमींतून व्यक्त होत आहे. पावनखिंड व धोपेश्वर या दरम्यानच्या सह्याद्रीच्या सड्यावरील अडीचशे हेक्टर क्षेत्रात बॉक्साईट आहे. ही जागा लीजवर दिल्यामुळे पावनखिंडीच्या बाजूने सडा खोदण्यास प्रारंभ झाला आहे. पावनखिंडीलगतच्या सड्यावर थेट झाडीतून रस्ते काढून मशिनरीची घरघर गती घेत आहे. गेल्या महिन्याभरात पन्नास हजार टनांपर्यंत खनिजांचे उत्खनन केले आहे. वनविभागाने रस्ता अडविल्याने खनिज जाग्यावरच पडले आहे. अन्य वाहनांची ये-जा मात्र पावनखिंडीला जाणाऱ्या ऐतिहासिक मार्गावरून चालू आहे. खाणीवर बंदी न आणल्यास ग्रामस्थांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे. शासनाकडूनच राष्ट्रीय अस्मितेवर घालाशाहूवाडी तालुक्यात दरवर्षी सुमारे दोन हजार मिली मीटरपेक्षा जास्त पाउस पडतो. या खाणीमुळे जंगल नष्ट होईलच शिवाय पावसाचे प्रमाणही कमी होईल. विपुल वनौषधी तसेच शेखरू, मॉरमन, हरियाल, गेळा, जारूळ नामशेष होण्याची शक्यता आहे. शासन पावनखिंडीलगतच्या उत्खननाला परवानगी देऊन राष्ट्रीय अस्मितेवर घाला घालत असल्याचा आरोप मंडळाचे सचिव सुभाष पाटील यांनी केला आहे. बॉक्साईट उत्खनन सुरू असले, तरी वनविभागाने वाहतुकीचा रस्ता रोखला आहे. केंबुणेर्वाडी, गजापूर, भाततळी, मालाईधनगरवाडा, पांढरेपाणी, आदी गावांतील ग्रामस्थांना बॉक्साईट उत्खनन आणि वाहतुकीचा त्रास होणार आहे. त्यामुळे तेथील ग्रामस्थांनी वेळीच सावध होण्याची गरज असल्याचे नारायण पाटील यांनी सांगितले.