शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या एका जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ४ नावांवर चर्चा, विक्रम काकडे यांचं नाव आघाडीवर
2
'चंद्रकांता' फेम भरत कपूर यांचं निधन, वयाच्या ८६ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास; अभिनयाचा चार दशकांचा प्रवास थांबला
3
"न कळत सारं घडलं..." लाजिरवाण्या पराभवानंतर अक्षर पटेल झाला 'कावरा बावरा', म्हणे...
4
वेगळ्या घोषणेची गरज नाही, भारत आधीपासूनच हिंदूराष्ट्र - सरसंघचालक मोहन भागवत
5
Bhuvneshwar Kumar : स्विंगचा किंग भुवीची पॉवरप्लेमध्ये कमाल! एकाच डावात दोन खास विक्रमांना गवसणी
6
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
7
चंद्रपुरातील किडनी विक्री प्रकरणात रविंद्रपाल सिंग यांना जामीन नाहीच, हायकोर्टाचा निर्णय; सखोल तपासासाठी अर्ज फेटाळला
8
एमआयडीसीतील फॅक्टरींमध्ये अनेक कामगारांचे पोलिस व्हेरिफिकेशनच नाही; ना कागदपत्र, ना कुणाची नोंद
9
Virat Kohli New Record : किंग कोहलीचा 'विराट' पराक्रम! IPL मध्ये ९००० धावांसह रचला नवा विक्रम
10
२६ कामगारांचा बळी घेणाऱ्या एसबीएल कंपनीतील पाच पदाधिकाऱ्यांना दणका; उच्च न्यायालयाचा अटकपूर्व जामिनास नकार
11
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार, संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
12
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
13
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
14
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
15
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
16
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
17
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
18
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
19
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
20
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
Daily Top 2Weekly Top 5

‘अंनिस’मुळे वाळीत प्रकरणातून सुटका

By admin | Updated: August 31, 2015 21:17 IST

कुटुंबियांशी सर्व व्यवहार बंद असल्याने आपण माणूस असूनसुद्धा समाजाकडून पशू-प्राण्यांसारखी वागणूक देण्यात येत असल्याचे दडपण येऊन मायनाक यांनी आत्महत्येचा प्रयत्न केला होता

शिवाजी गोरे- दापोली --दाभोळ गावापासून जवळ असणाऱ्या एका गावातील वाडीने विष्णू मायनाक यांच्या कुटुंबाला दोन वर्षे वाळीत टाकले होते. वाळीत टाकलेल्या कुटुंबाशी बोलणाऱ्या व्यक्तिला वाडीने पाच हजार रुपये दंड जाहीर केला होता. वाळीत कुटुंबियांशी सर्व व्यवहार बंद असल्याने आपण माणूस असूनसुद्धा समाजाकडून पशू-प्राण्यांसारखी वागणूक देण्यात येत असल्याचे दडपण येऊन मायनाक यांनी आत्महत्येचा प्रयत्न केला होता. परंतु दापोलीतील अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या पदाधिकाऱ्यानी वेळीच हस्तक्षेप करुन घरवापसी केल्याने एक कुटुंब उद्ध्वस्त होण्यापासून बचावले आहे.बैठकीत न आल्याने दाभोळनजीकच्या एका गावातील वाडीने मुंबईतील एकाला वाळीत टाकले. मात्र, त्याचा एक भाऊ गावातच राहात आहे. त्याला वाडीने बैठकीत तुला भाऊ हवाय की वाडी हवीय? असा प्रश्न उपस्थित केला. विष्णू मायनाक यांनी आपल्याला भाऊ हवाय, असे उत्तर देताच वाडीतील प्रमुख मंडळींच्या संतापाचा पारा चढला. त्याच बैठकीत विष्णू मायनाक यांना वाळीत टाकण्याचा निर्णय झाला. त्याच्याशी कोणीही बोलू नये किंवा कोणताही व्यवहार करु नये. तसे केल्यास पाच हजार रुपये दंड व दंड न भरल्यास त्या कुटुंबाला वाळीत टाकण्याची धमकी देण्यात आली. त्यामुळे गेली दोन वर्षे मायनाक कुटुंब दडपणाखाली जीवन जगत होते. त्यामुळे दडपण येऊन आपण आपले जीवन संपवून घेतले तर आपली पत्नी व मुलींना वाडी सामावून घेईल, या विचाराने दोनवेळा आत्महत्येचा प्रयत्न केल्याची कबुली मायनाक यांनी दिली.त्यानंतर काही सामाजिक कार्यकर्त्यांच्या मदतीने अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या मुक्ता दाभोलकर, अनिश पटवर्धन यांना झालेला प्रकार सांगितला. दाभोळ पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक नवनाथ जगताप यांनी वाडीतील प्रमुखांना व फिर्यादीला दाभोळ येथे बोलावून घेतले. बैठकीत दोन्ही बाजू ऐकून घेत कायद्याने कोणालाही वाळीत टाकणे गुन्हा असल्याची जाणीव करून दिल्यानंतर हा बहिष्कार मागे घेण्यात आला.अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या पुढाकाराने घर वापसी.दाभोळ पोलीस उपनिरीक्षक नवनाथ जगताप यांची भूमिका निर्णायक.