शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
3
Mumbai Local Accident: लोकल ट्रेनमधून उतरताना फलाटाच्या फटीत अडकून प्रवाशाचा मृत्यू; घाटकोपरमधील घटना
4
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
5
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
6
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
7
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
8
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
9
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
10
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
11
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
12
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
13
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
14
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
15
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
16
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
17
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम
18
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
19
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
20
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी

कोल्हापूर: हालेवाडी फाट्यावर मद्यधुंद तरुणांचा हवेत गोळीबार?, हुपरी-रेंदाळचे आठ जण ताब्यात

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 12, 2022 12:01 IST

पोलिसांनी सर्वत्र नाकाबंदी करुन तातडीने घटनास्थळाकडे धाव घेतली. दरम्यान गाडी नंबर वरून संबंधित तरुणांना आजऱ्यातील हॉटेल मॉर्निंग स्टार व हॉटेल नैनीताल जवळून ताब्यात घेतले.

आजरा : हालेवाडी (ता.आजरा) फाट्याला हुपरी - रेंदाळ (ता. हातकणंगले) येथील मद्यधुंद तरुणांकडून हवेत गोळीबार झाल्याचा संशय आहे. पोलिसांनी इनोव्हा गाडीतील आठ जणांना ताब्यात घेतले असून रात्री उशिरापर्यंत चौकशी सुरू होती.प्रत्यक्षदर्शी हॉटेल मालकाकडून मिळालेली माहिती अशी, रात्री नऊ ते साडेनऊच्या दरम्यान हालेवाडी फाट्याला इनोव्हा गाडीमधील टेप मोठ्याने लावून तरुणांचा दंगा सुरु असल्याचे लक्षात आले. अर्धा ते पाऊण तास दंगा सुरूच होता.त्यानंतर भांडणाचा आवाज येण्यास सुरु झालेनंतर हॉटेल मालकासह वेटर गाडीच्या दिशेने गेले. रस्त्यावरुन आपल्याकडे लोक येत असल्याचे पाहून या तरुणांनी हवेत गोळीबार केला व पटापट गाडीत बसले. व आपल्याकडे येणाऱ्या हॉटेल मालकासह कामगारांच्या अंगावर गाडी घालण्याचा प्रयत्न चालकाने केला. संबंधित हॉटेल मालकाने याबाबतची माहिती पोलीस स्टेशनला दिली.पोलिसांनी सर्वत्र नाकाबंदी करुन तातडीने घटनास्थळाकडे धाव घेतली. दरम्यान गाडी नंबर वरून संबंधित तरुणांना आजऱ्यातील हॉटेल मॉर्निंग स्टार व हॉटेल नैनीताल जवळून ताब्यात घेतले. उपविभागीय पोलीस अधिकारी राजीव नवले व सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनिल पाटील यांनी तरुणांकडून गोळीबाराबाबत चौकशी सुरू केली आहे. रात्री उशिरापर्यंत या घटनेची आजरा पोलिसात नोंद झालेली नाही.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसFiringगोळीबार