शहरं
Join us  
Trending Stories
1
“अजितदादांचा पक्ष मविआत येऊ शकतो अन् २०२९ला बारामतीचा आमदार…”; युगेंद्र पवारांचा मोठा दावा
2
महाराष्ट्र दिनी राज ठाकरेंची हुतात्मा स्मारकाबाबत पोस्ट; मराठी माणसाला आवाहन, सरकारवर टीका
3
‘मिसिंग लिंक’ नाही, मग आता काय म्हणायचे?; विशेष मार्गिकेला CM फडणवीसांनी दिले नवीन नाव
4
Travel : ना मोबाईल नेटवर्क, ना विजेचा झगमगाट! तरीही पर्यटकांची धाव; तुम्हाला माहितीये का 'हे' अनटोल्ड डेस्टिनेशन?
5
महाराष्ट्रदिनी PM मोदी यांचे CM फडणवीस यांना खास पत्र, नेमकं काय म्हटलंय? वाचा
6
३ देशांतून तातडीने बाहेर पडा! UAEची नागरिकांना सूचना; सावधगिरीची इशारा की युद्धात उडी?
7
“महाराष्ट्राचे राजकीय महत्त्व कमी करायचा प्रयत्न, सरकारने आत्मपरीक्षण करावे”: हर्षवर्धन सपकाळ
8
माणुसकीला काळिमा! १२ वर्ष सिगरेटचे चटके, मग घटस्फोट देऊन घराबाहेर काढलं; हैवान पतीचा क्रूर चेहरा समोर
9
“महाविकास आघाडीने विकासाची लिंक मिस केली, आम्ही ती वेगाने कनेक्ट केली”: DCM एकनाथ शिंदे
10
लग्नाचे विधी सुरू होणार तोच पथक दारात! परभणीत बालविवाह रोखला; अल्पवयीन मुलीची बाल कल्याण समितीकडे रवानगी
11
कृणाल पांड्याला गोलंदाजी का दिली नाही? भुवीने सांगितलं अजब कारण; पाहा तुम्हाला तरी पटतंय का?
12
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
13
सुट्ट्यांचा आनंद महामार्गावरच 'जाम'! खेड शिवापूर ते साताऱ्यापर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा; प्रवासी हतबल
14
धावत्या बसचे चाक बाहेर निघाले, साकोली जवळ मोठा अपघात टळला!
15
भोंदू खरातने परिसाची शक्ती प्राप्त करण्याचे सांगून फिर्यादीच्या पैशातून केला २१ देशांचा परदेश दौरा!
16
बंगालचा निकाल काय लागणार? एक्झिट पोलवर दादाची 'गुगली'! हसत हसत म्हणाला, 'याची भविष्यवाणी तर..." 
17
टेबलाखालून स्पर्श अन् प्रमोशनसाठी शरीरसंबंधांची सक्ती; महिला बॉसवर आरोप करणारे चिरायु राणा कोण?
18
परतूरचा 'विकासपुरूष' हरपला! माजी आमदार सुरेशकुमार जेथलिया यांचे हृदयविकाराच्या धक्क्याने निधन
19
Top Marathi News LIVE Updates: महाराष्ट्र दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे मुख्यमंत्री फडणवीसांना खास पत्र
20
एकच प्याला मृत्यूचा! वाढदिवसाच्या पार्टीच्या बहाण्याने जावयाला सासरी बोलावले, अन्..., असं फुटलं पत्नी अन् सासऱ्याचं बिंग    
Daily Top 2Weekly Top 5

म्हाकवेतील ‘पेयजल’चे काम निकृष्ट

By admin | Updated: July 9, 2015 00:25 IST

शिवसेनेचा आरोप : अशुद्ध पाणीपुरवठा चौकशी न केल्यास आंदोलनाचा इशारा

म्हाकवे : म्हाकवे (ता. कागल) येथील राष्ट्रीय पेयजल योजनेतून नदीमध्ये स्टेच गॅलरी, नदीपासून पाईपलाईन, पाणी साठविण्यासाठी सुमारे ४० हजार लिटर क्षमतेच्या टाकीचे काम गतवर्षी पूर्ण झाले आहे. यासाठी सुमारे दीड कोटी रुपये खर्ची पडले आहेत. मात्र, तरीही गावाला गाळ मिश्रित अशुद्ध व अपुरा पाणीपुरवठा होत असून, या योजनेचे काम निकृष्ट झाल्यामुळेच ग्रामस्थांना त्रास होत असल्याची तक्रार येथील शिवसेना शाखेच्यावतीने गटविकास अधिकाऱ्याकडे केली आहे. या कामाची त्वरित चौकशी होऊन दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी, अन्यथा शिवसेना स्टाईलने आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे.सुमारे सात हजारांहून अधिक लोकसंख्या असणाऱ्या या गावासाठी २०११-१२ मध्ये पेयजलमधून दीड कोटींच्या पाणी योजनेला मंजुरी मिळाली, तर महाजलमधून जॅकवेलसाठी सुमारे दहा लाखांचा निधीही मिळाला आहे. यातून जॅकवेलसह नदीमध्ये पाणी शुद्धीकरणासाठी स्टेच गॅलरी, सहा इंची पाईपलाईन, पाणी साठविण्यासाठी टाकी, आदी कामे झाली आहेत.मात्र, ही सर्वच कामे दर्जाहीन व नियोजितपणे झालेली नाहीत. त्यामुळे ग्रामस्थांना सध्या गाळ मिश्रित व अशुद्ध पाणीपुरवठा होत आहे. याबाबत वारंवार तक्रारी करूनही वरिष्ठांनी दखल घेतलेली नाही. त्यामुळे शिवसेनेने आता आंदोलनाचा मार्ग अवलंबिण्याचे ठरविले आहे. निवेदनावर शाखा अध्यक्ष निवृत्ती पाटील, उपाध्यक्ष धोंडिराम पाटील, केरबा पाटील, युवराज पाटील, संजय देवडकर, सिद्राम शिंदे, आनंदा पाटील, सिद्राम पाटील, आदींची नावे आहेत. (वार्ताहर)तक्रार होताच जांभुळवाडी, भाटनांगनूर तर्फ सावंतवाडी येथील पाणी योजनेची चौकशी झाली. मात्र, म्हाकवे येथील पाणी योजनेच्या कामाबाबत शिवसेनेसह अनेक ग्रामस्थांनी तोंडी व लेखी तक्रारी केल्या आहेत. मात्र, या कामाची चौकशीच झालेली नाही, याचे गौडबंगाल काय? येथील ठेकेदार आणि स्थानिक अधिकारी यांच्यामध्ये मिलीभगत असण्याची शक्यता आहे. त्यामुळे वरिष्ठांनी यामध्ये गांभीर्याने लक्ष घालावे.- निवृत्ती पाटील, शिवसेना, शाखा अध्यक्ष, म्हाकवे.