शहरं
Join us  
Trending Stories
1
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
2
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
3
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
4
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
5
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
6
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
7
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
8
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
9
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
10
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
11
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
12
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
13
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
14
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
15
Travel : निसर्गाची मुक्त हस्ताने उधळण! भारताच्या 'या' ४ सुंदर ठिकाणांपुढे स्वित्झर्लंडही पडेल फिके
16
चेहऱ्यावर मास्क, खांद्यावर बंदूक...; भारतात येणाऱ्या जहाजावर इराणी कमांडोंनी कसा केला कब्जा? बघा भरसमुद्रातला थरारक VIDEO
17
पुणेकर...! म्हाडाची २९५ घरे घेणार का ? प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य... कुठे, कुठे आहेत...
18
डोनाल्ड ट्रम्प यांच्या ‘हेलहोल’ टिप्पणीवर भारताची सावध भूमिका; परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले...
19
हर्षवर्धन सपकाळ मातोश्रीवर गेले, उद्धव ठाकरे यांची भेट घेतली; कोणत्या विषयावर काय चर्चा झाली?
20
काळाचा घाला! उत्तराखंडच्या चंबा-कोटी रोडवर भीषण अपघात; बस दरीत कोसळून ८ जणांचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

नाट्यरसिकांना नाटकांची मेजवानी

By admin | Updated: November 12, 2014 00:40 IST

राज्य नाट्य स्पर्धा : तीन वर्षांत प्रथमच १८ संघांचा सहभाग

कोल्हापूर : विविध कारणांमुळे दहा वर्षांत मरगळलेल्या कोल्हापूरच्या नाट्यसृष्टीने, हौशी व प्रायोगिक रंगभूमीने आता कात टाकली आहे. राज्य नाट्य स्पर्धेत तिसऱ्या वर्षी प्रथमच कोल्हापूर केंद्रावर १८ संघांनी नोंदणी केली असून त्यात सिंधुदुर्ग, बेळगांव संघांचाही समावेश आहे. आपल्या नाटकाचे दर्जेदार सादरीकरण व्हावे यासाठी सर्व नाट्यसंस्थांनी तालमींवर जोर दिला आहे. त्यामुळे यंदाच्या राज्य नाट्य स्पर्धेत रंगत येणार आहेच, शिवाय नाट्यरसिकांना विविध विषयांवर आधारलेल्या नाटकांचा अनुभवही घेता येणार आहे. तब्बल दहा वर्षांनंतर २०१२ मध्ये कोल्हापूरला राज्य नाट्य स्पर्धेचे प्राथमिक केंद्र म्हणून मान्यता मिळाली. पहिल्या वर्षी १०, दुसऱ्या वर्षी १२ संघांनी यात सहभाग नोंदविला होता. यंदा मात्र स्पर्धेत उतरलेल्या संघांची संख्या १८ वर गेली आहे. यातील काही संहिता जुन्याच तर काही संस्था नव्या संहितेचा नवा प्रयोग रंगमंचावर सादर करणार आहेत. त्यामुळे त्याविषयी उत्सुकता आहे. भालजी पेंढारकर सांस्कृतिक केंद्र (ट्रिपल सीट), गायन समाज देवल क्लब (प्रियांका आणि दोन चोर), सुगुण नाट्यकला संस्था (नटसम्राट), प्रतिज्ञा नाट्यरंग (किरवंत), प्रत्यय (क्राईम अ‍ॅन्ड पनिशमेंट), श्री हनुमान तरुण मंडळ (लव्ह इथले भयकारी), पदन्यास कलाअकादमी (चिताई), परिवर्तन कला फौंडेशन (कावळा आख्यान) अशा कोल्हापुरातील नावाजलेल्या नाट्य संस्थांसह सिंधुदुर्गमधील अक्षरसिंधु साहित्य कलामंच (तर्पण), वसंतराव आचरेकर सांस्कृतिक प्रतिष्ठान (एक दिवस मठाकडे), बेळगावमधील बरेकर नाट्य संस्था (वेडिंग अल्बम), कोल्हापुरातील शालिनीदेवी चिंतामणी कापसे प्रतिष्ठान (एकच प्याला), जयसिंगपूरमधील नाट्य शुभांगी (टू इज कंपनी), आजऱ्याचे नवनाट्य मंडळ (तमसो मा), हातकणंगलेतील रंगयात्रा नाट्यसंस्था (ती रात्र) या १८ संस्था राज्य नाट्यस्पर्धेमध्ये सादरीकरण करणार आहेत. येत्या १७ तारखेपासून सुरू होणाऱ्या या स्पर्धेसाठी आता सर्वच संस्थांच्या तालमींना वेग आला असून बॅकस्टेज आर्टिस्ट, पार्श्वसंगीत, नेपथ्य, मेकअप, वेशभूषा, रंगभूषा, प्रकाश योजना यांची सर्व तयारीसाठी धावपळ सुरू आहे. (प्रतिनिधी)शासकीय संस्थांची नोंदणी गेल्या काही वर्षांत राज्य नाट्यमधून एक्झिट घेतलेल्या स्थापत्य बांधकाम विभाग (नाटक मी माझ्या मुलांचा), एस. टी. नाट्यसंघ (एक कप चहासाठी), कुंभी-कासारी बहुद्देशीय शेतकरी मंडळ (ता. पन्हाळा) (टुडे इज अ गिफ्ट), महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ अशा शासकीय व अशासकीय संस्थांनीही यंदा सहभाग नोंदवला आहे. नवोदितांना संधी राज्य नाट्यमध्ये सादर होणाऱ्या बहुतांशी संहिता जुन्या असल्या तरी त्यांचे रंगमंचीय सादरीकरण करणारे कलाकार तरुण आहे. गतवर्षी रंगभूमीवर वाढलेल्या मुलींच्या टक्क्यांबरोबरच नवी पिढी पुन्हा एकदा प्रायोगिक रंगभूमीकडे वळल्याचे सकारात्मक चित्र आहे.