शहरं
Join us  
Trending Stories
1
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
2
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
3
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
4
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
5
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
6
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
7
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
8
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
9
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
10
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
11
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
12
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
13
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
14
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
15
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
16
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
17
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
18
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
19
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
20
दमदार इंजिनसह BMW ने भारतात लॉन्च केली सर्वात स्वस्त बाईक, जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
Daily Top 2Weekly Top 5

आजऱ्यात नळाला चक्क गटारीचे पाणी

By admin | Updated: December 19, 2014 00:13 IST

आरोग्याचा प्रश्न गंभीर : सांडपाण्याचे अयोग्य व्यवस्थापन, गटारी तुंबल्या; तक्रारींकडे दुर्लक्ष

ज्योतीप्रसाद सावंत - आजरा -निर्मल ग्राम म्हणून शासनाचा पुरस्कार पटकाविलेल्या आजरा शहरामध्ये ग्रामपंचायतीच्या नळपाणी पुरवठा योजनेतून काही भागात चक्क गटारींचे पाणी येत असल्याने शहरवासीयांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होत आहे. सांडपाण्याचे योग्य व्यवस्थापन नसल्याने ठिकठिकाणी असे प्रकार वारंवार घडत आहेत.चार वर्षांपूर्वी शहरात घिसाडघाई करून अनेक ठिकाणी ग्रामपंचायतीच्या माध्यमातून गटारी बांधण्यात आल्या. गरजेपेक्षा अधिक खोलीच्या या गटारींची सफाई करताना कामगार वर्गावर मर्यादा येत आहेत, तर काही ठिकाणी गटारींमध्ये माती व अन्य साहित्य पडून त्या मुजल्या आहेत. विशेषत: चाफे गल्ली परिसरात गेल्या अनेक दिवसांपासून चावीच्या पाण्यातून गटारींचे पाणी येत आहे. मुळात या भागातील गटारींच्या पाण्याचा निचरा होण्यासाठी कोणताच पर्याय अवलंबलेला नसल्याने गटारींचे पाणी तुंबून पाणीपुरवठा योजनेच्या पाईपमध्ये मिसळत आहे. या प्रकाराबाबत ग्रामस्थांकडून वारंवार ग्रामपंचायतीकडे तक्रार केली जात असतानाही अद्याप हा प्रकार बंद झालेला नाही.डेंग्यूसारखा आजार शहरात फैलावू नये, यासाठी धूर फवारणी यंत्रासारखा प्रकार ग्रामपंचायतीमार्फत अवलंबला जात असताना दुसरीकडे भरवस्तीत सांडपाण्याचे साचलेले डबके, चावीतून येणारे दूषित पाणी असा विरोधाभास दिसत आहे. ग्रामपंचायतीने पुढाकार घेऊन प्रथम सांडपाणी पुढे नेण्यासाठी आवश्यक ती उपाययोजना व त्याचबरोबर तातडीने योग्य ते उपाय करून स्वच्छ पाणी पुरविण्याची गरज आहे.सहनशीलतेचा अंत पाहू नये : ग्रामस्थअक्षरश: गटारींमधील पाणी चावीतून येत आहे. पाणी पिण्याकरिता योग्य नाहीच; पण घरखर्चाला वापरतानाही पाण्याला घाण वास येणे, अंगाला खाज सुटणे, अंगावर पुरळ येणे असे प्रकार घडत आहेत. विनंत्या करून झाल्या, आता ग्रामपंचायतीने सहनशीलतेचा अंत पाहू नये, असे निवेदन राजू लिचम, गोपाळ पाटील, सुरेश पाटील, शिवाजी मनगुतकर यांनी दिले आहे.भरवस्तीतील पाणी निचरा होण्याच्या दृष्टीने ग्रामपंचायत पातळीवर प्रयत्न सुरू आहेत; परंतु खासगी शेतजमिनीतून पाणी नेण्यास शेतकरी वर्गाचा विरोध असल्याने ही परिस्थिती उद्भवली आहे. जोपर्यंत गटारींच्या पाण्याचा निचरा होत नाही, तोपर्यंत पाणीपुरवठ्याची गळती शोधणे अवघड आहे. - मैमुनबी पठाण, सरपंच आजरा.