शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur News: दोनवेळा कारवाई, स्वत:चा परवाना निलंबित.. दुसऱ्याच्या परवान्यावर गर्भपाताचा गोरखधंदा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 25, 2026 11:53 IST

डॉ. युवराज पाटीलसह एजंट अटकेत, पोर्टेबल सोनोग्राफी मशीन, गर्भपाताची औषधे जप्त

कोल्हापूर : यापूर्वी दोनदा अवैध गर्भलिंग निदान आणि गर्भपाताच्या रॅकेटमध्ये सापडलेला डॉ. युवराज पांडुरंग पाटील (वय ४३, रा. सोनाळी, ता. कागल) याने वैद्यकीय सेवेचा परवाना निलंबित असतानाही मित्राच्या परवान्यावर गर्भपाताचा गोरखधंदा सुरू केला होता. बिद्री (ता. कागल) येथील श्रद्धा हॉस्पिटलमध्ये पोलिसांनी छापा टाकून केलेल्या कारवाईत डॉ. पाटील याच्याकडील गर्भलिंग तपासणीचे पोर्टेबल मशीन आणि गर्भपाताची औषधे जप्त केली. डॉ. पाटील याच्यासह एजंट संभाजी वसंत शिंदे (वय ४५, रा. बोरवडे, ता. कागल) याची पोलिस कोठडीत रवानगी झाली.बिद्री येथील डॉ. युवराज पाटील याच्या हॉस्पिटलमध्ये अवैध गर्भलिंग निदान आणि गर्भपात होत असल्याची माहिती पोलिस अधीक्षक योगेश कुमार यांना मिळाली होती. याची पडताळणी करून कारवाई करण्याचे आदेश त्यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा आणि इस्पुर्ली पोलिसांना दिली होती. त्यानुसार पोलिसांनी एजंट संभाजी शिंदे याच्याशी संपर्क साधून चार महिन्यांच्या गर्भवतीची तपासणी करायची असल्याचे सांगितले. २२ हजार रुपयांत गर्भलिंग निदान करण्याचे ठरताच त्याने सोमवारी रात्री तपासणीसाठी महिलेस बोलवून घेतले. डॉ. पाटील याच्या हॉस्पिटलमध्ये तपासणी सुरू होताच पोलिसांनी छापा टाकून कारवाई केली.

वाचा: कोल्हापुरात अवैध गर्भपातात जुन्याच टोळ्या सक्रिय, शासकीय यंत्रणांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नगर्भलिंग निदान करताना पाटील रंगेहाथ सापडला. तातडीने एजंट शिंदे यालाही पोलिसांनी अटक केली. श्रद्धा हॉस्पिटलच्या झडतीत गर्भलिंग निदान करण्याचे एक पोर्टेबल मशीन, गर्भपाताच्या गोळ्यांची दोन पाकिटे, दोन टॅब, तीन मोबाइल, पेशंटच्या नावांचे रजिस्टर, बिल रजिस्टर मिळाले. पाटील याची आलिशान फॉर्च्युनर कारही पोलिसांनी जप्त केली. डॉ. उत्तमकुमार बळवंत सरदेसाई या नावाचे नोंदणी प्रमाणपत्र, वैद्यकीय परिषदेचा परवाना हॉस्पिटलमध्ये मिळाला. पाटील याचा वैद्यकीय सेवेचा परवाना दोन वर्षांपूर्वीच वैद्यकीय परिषदेने रद्द केल्याची माहिती पोलिसांच्या चौकशीतून समोर आली. या धक्कादायक प्रकाराने कारवाई करणारे पोलिस आणि वैद्यकीय अधिकारीही चक्रावले.

यापूर्वी दोन गुन्हे‘बीएचएमएस’ पदवी घेतलेला डॉ. युवराज पाटील हा यापूर्वी गर्भलिंग निदान आणि गर्भपाताच्या गुन्ह्यात दोनदा सापडला होता. २००९ आणि २०२२ मध्ये त्याच्यावर पोलिसांनी कारवाई केली होती. त्या गुन्ह्यांचा आधार घेऊन वैद्यकीय परिषदेने त्याचा परवाना निलंबित केला. त्यानंतर डॉ. उत्तमकुमार सरदेसाई या मित्राच्या नावे तो हॉस्पिटल चालवत होता. डॉ. सरदेसाई यांचा शोध सुरू आहे. पाटील याची पत्नीही डॉक्टर असून, त्यांचा या गुन्ह्यात सहभाग आहे काय? याचा तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

३० ते ७० हजारांचे पॅकेजगर्भलिंग निदान करण्यासाठी पाटील हा २० ते ३० हजार रुपये घेत होता. त्यानंतर गर्भपातासाठी ३० ते ४० हजार रुपये घेत होता. कोल्हापूरसह बेळगाव जिल्ह्यातून त्याच्याकडे मोठ्या संख्येने रुग्ण येत होते, अशी माहिती पोलिसांनी दिली.

English
हिंदी सारांश
Web Title : Kolhapur Doctor Busted: Illegal Abortions Under Friend's License Uncovered

Web Summary : Kolhapur police arrested Dr. Patil for running an illegal abortion racket using a friend's license after his own was suspended for previous offenses. He charged up to ₹70,000 per procedure. An agent and portable ultrasound machine were also seized.