Narendra Dabholkar Murder : सूत्रधाराचा शोध लागेपर्यंत आमचा लढा सुरूच राहणार - कॉ. उदय नारकर
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 20, 2018 09:23 IST2018-08-20T08:20:46+5:302018-08-20T09:23:05+5:30
दाभोलकर आणि गोविंद पानसरे यांच्या मारेकऱ्यांना अटक व्हावी या मागणीसाठी कोल्हापुरातही डाव्या विचारांच्या कार्यकर्त्यांनी शिवाजी पेठेतील फिरंगाई तालीम परिसरात निर्भय बनो मॉर्निंग वॉकचे आयोजन केले

Narendra Dabholkar Murder : सूत्रधाराचा शोध लागेपर्यंत आमचा लढा सुरूच राहणार - कॉ. उदय नारकर
कोल्हापूर : डॉ. नरेंद्र दाभोलकर आणि गोविंद पानसरे यांच्या मारेकऱ्यांना अटक व्हावी या मागणीसाठी कोल्हापुरातही डाव्या विचारांच्या कार्यकर्त्यांनी शिवाजी पेठेतील फिरंगाई तालीम परिसरात निर्भय बनो मॉर्निंग वॉकचे आयोजन करण्यात आले होते. भर पावसातही कार्यकर्ते त्यामध्ये सहभागी झाले होते.
दाभोलकर यांच्या मारेकऱ्यास पोलिसांनी अटक केली आहे. त्यासाठी पोलीस यंत्रणेचे आभार व्यक्त करून कॉ. उदय नारकर म्हणाले, या खुनामागील मेंदू कुणाचा आहे याचा शोध लागेपर्यंत आमचा लढा थांबणार नाही. याउलट आम्ही तो अधिक तीव्र करू. दाभोलकर-पानसरे हे मानव कल्याणचा विचार मांडत होते त्यांना मारणारे हे समस्त मानव जातीचे मारेकरी आहेत. एका विशिष्ट विचारसरणीच्या लोकांचे आर्थिक हितसंबंध धोक्यात येतील म्हणून त्यांना संपविण्यात आल्याचंही त्यांनी म्हटलं. या मॉर्निंग वॉकमध्ये प्राचार्य टी एस पाटील, सीमा पाटील, हसन देसाई, सतीश पाटील, कृष्णात कोरे, रमेश वडणगेकर,अनिल चव्हाण आदी सहभागी झाले.