कुणाचाही अपप्रचार नको, विकासाच्या जोरावरच मते मागा : हसन मुश्रीफ

By ऑनलाइन लोकमत | Published: April 7, 2024 07:27 PM2024-04-07T19:27:41+5:302024-04-07T19:28:37+5:30

महागाव येथील मेळाव्यात राष्ट्रवादी कार्यकर्त्यांना आवाहन

Don't let anybody's propaganda, ask for votes on the basis of development says Hasan Mushrif | कुणाचाही अपप्रचार नको, विकासाच्या जोरावरच मते मागा : हसन मुश्रीफ

कुणाचाही अपप्रचार नको, विकासाच्या जोरावरच मते मागा : हसन मुश्रीफ

गडहिंग्लज : जिल्ह्यासह राज्याचा विकासासाठी भाजपबरोबर आघाडी केली आहे. त्यामुळे कुणाचाही अप्रचार करु नका. विकासाच्या जोरावरच मते मागा, असे आवाहन पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी केले.

महागाव येथे महायुतीचे उमेदवार संजय मंडलिक यांच्या प्रचारार्थ आयोजित चंदगड विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी खासदार  मंडलिक, आमदार राजेश पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.

मुश्रीफ म्हणाले, भावनेवर राजकारण होत नाही, कोल्हापूरच्या विकासासाठी ही निवडणूक महत्त्वाची आहे. त्यासाठी विकास करणारा खासदारच दिल्लीला पाठवायचा आहे.
मंडलिक म्हणाले, राज्याला महायुतीशिवाय पर्याय नाही. आतापर्यत हजार कोटीच्यावर निधी आणला आहे. आम्ही विकासकामावर कौल मागत आहोत.  

राजेश पाटील म्हणाले, छत्रपती संभाजीराजे यांनी आमच्या खासदारांवर बोलण्यापेक्षा आपल्या खासदारकीच्या कारकीर्दीत काय केले हे सांगावे. यावेळी संतोष पाटील, एम. के. देसाई, अल्बर्ट डिसोझा, सुधीर देसाई, दशरथ कुपेकर यांचीही भाषणे झाली.

मेळाव्यास विष्णूपंत केसरकर, महाबळेश्वर चौगुले, मुन्नासाहेब नाईकवाडी, बाबासाहेब पाटील, जयप्रकाश मुन्नोळी, संभाजी पाटील, प्रकाश पताडे, भरत पाटील, राजु मुरकुटे, बशीर पठाण, बाबूराव चौगुले, सागर देसाई, पी. के. पाटील, वसंत चौगुले, प्रदीप कडूकर आदी उपस्थित होते. जयसिंग चव्हाण यांनी प्रास्ताविक केले. अनिकेत कोणकेरी यांनी आभार मानले.

'त्यांना' विधानसभेसाठी  शुभेच्छा..!

गोपाळराव पाटील, अप्पी पाटील, नंदाताई बाभूळकर व अमर चव्हाण हे सगळे माझे चांगले मित्र आहेत. महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणून त्यांना माझ्या शुभेच्छा आहेत, असेही मुश्रीफ म्हणाले. त्याची मेळाव्यात विशेष चर्चा झाली.

Web Title: Don't let anybody's propaganda, ask for votes on the basis of development says Hasan Mushrif

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.