शहरं
Join us  
Trending Stories
1
...तेव्हा आम्ही पाठीशी उभे राहिलो; मोहिते पाटलांच्या पक्षांतरानंतर फडणवीसांचा पहिल्यांदाच हल्लाबोल
2
'परीक्षेत जय श्री राम लिहितात अन् 50 % मार्क्स मिळतात', ओवेसींचा मोदी-शहांवर निशाणा
3
IPL 2024 CSK vs SRH : ऋतु'राज'! मराठमोळ्या गायकवाडचे शतक थोडक्यात हुकले; CSK ने धावांचा डोंगर उभारला
4
चेन्नईच्या फलंदाजाची स्फोटक खेळी! इरफान म्हणाला, याला वर्ल्ड कपच्या संघात घ्यायलाच हवं...
5
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
6
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
7
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
8
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
9
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
10
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी
11
माजी पंतप्रधानांच्या नातवाचे अश्लिल व्हिडीओ व्हायरल; निवडणूक होताच खासदार देशातून फरार
12
'अरे! तुमचं डोकं फुटलंय की सिलिंडर...'; बेंगलोर ब्लास्टवरून पंतप्रधान मोदी काँग्रेसवर बरसले 
13
माढ्याचा खासदार प्रत्येक वेळी नवा; आता कोण? परंपरा टिकणार की बदलणार?
14
IPL 2024 GT vs RCB : साई 'सु'दर्शन! शाहरूखही चमकला; युवा भारतीय खेळाडूंनी RCB ला धू धू धुतले
15
अनेक तासांचा प्रवास आता मिनिटांत! 'वंदे भारत' मेट्रोच्या रुपात येणार, कधी सुरू होणार? पाहा...
16
IPL 2024 GT vs RCB : "विराटच्या स्लो स्ट्राईक रेटबद्दल बोललं जातं पण...", इरफानची 'मन की बात'!
17
Narendra Modi : "राम मंदिर बांधण्याचा निर्णय देशाच्या स्वातंत्र्याच्या दुसऱ्याच दिवशी घ्यायला हवा होता"
18
'आप'च्या थीम साँगवर निवडणूक आयोगाचा आक्षेप; आतिशी म्हणाल्या, "त्यांनी हुकूमशाही केली तर योग्य, आम्ही गाणं लिहिलं तर चूक"
19
IPL 2024 GT vs RCB : WHAT A BALL सिराज! अखेर शाहरूख खानच्या घातक खेळीचा अंत
20
सांगलीत विशाल पाटलांना धक्का; चंद्रहार पाटील यांच्या प्रचारात विश्वजीत कदम सक्रिय

डॉनला ४१ वर्षे पूर्ण, कोल्हापुरातील रसिकांनी जागविल्या आठवणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 15, 2019 6:55 PM

अमिताभ बच्चन यांच्या खऱ्या अर्थाने ‘अँग्री यंग मॅन’च्या प्रतिमेवर शिक्कामोर्तब करणाऱ्या ‘डॉन’ या सिनेमाला रविवारी ४१ वर्षे पूर्ण झाली. डायलॉग, अ‍ॅक्शन आणि गाणी यांमुळे ब्लॉकबस्टर झालेल्या या सिनेमाबद्दल काही बच्चनवेड्यांनी तर खास कोल्हापुरी स्टाईलने या आठवणी जागविल्या आहेत.

ठळक मुद्देडॉनला ४१ वर्षे पूर्ण, कोल्हापुरातील रसिकांनी जागविल्या आठवणीदहावीच्या पूर्वपरीक्षेला लिहिली चक्क सिनेमाची स्टोरी!

संदीप आडनाईककोल्हापूर : अमिताभ बच्चन यांच्या खऱ्या अर्थाने ‘अँग्री यंग मॅन’च्या प्रतिमेवर शिक्कामोर्तब करणाऱ्या ‘डॉन’ या सिनेमाला रविवारी ४१ वर्षे पूर्ण झाली. डायलॉग, अ‍ॅक्शन आणि गाणी यांमुळे ब्लॉकबस्टर झालेल्या या सिनेमाबद्दल काही बच्चनवेड्यांनी तर खास कोल्हापुरी स्टाईलने या आठवणी जागविल्या आहेत.काहीही झालं तरी बच्चन यांच्या सिनेमाचा पहिल्या दिवशी पहिला खेळ बघायचाच हा नियम असलेले कलाशिक्षक आणि ‘चिल्लर पार्टी’चे मिलिंद यादव हे तर ‘डॉन’ सिनेमातील पोलीस पाठलाग करताना धावणाऱ्या अमिताभचे प्रसिद्ध पोस्टर तेव्हाच्या तरुणाईच्या शर्टवर चितारून देत. ‘डॉन’प्रमाणे पान खाऊन घरी आल्यानंतर वडिलांकडून श्रीमुखातही खावी लागल्याची आठवण त्यांनी सांगितली.

‘डॉन’  पिक्चरला  ४१ वर्षे पूर्ण झाली. त्यावेळेस मुंबईतील एका थिएटरमध्ये अॅडव्हाॅन्स बुकिंगला झालेली गर्दी. विशेष म्हणजे याच थीएटरला अमिताभ आराधनाच्या तिकीटासाठी उभा होता, पण तिकीट मिळाले नाही,शेवटी त्याच पैशात त्याने वडा पाव खरेदी केला होता.

आता पुण्यात एका कंपनीत मॅनेजरच्या हुद्द्यावर असलेल्या उमेश कुलकर्णी यांनीही ‘डॉन’ सिनेमा मित्रांसमवेत पाहिल्याची आठवण सांगितली. बच्चनचा सिनेमा म्हटले की फर्स्ट डे, फर्स्ट शो पाहणारे कोल्हापूरचे हेमंत पाटील आता महावीर महाविद्यालयात इंग्रजीचे प्राध्यापक आहेत. पोलीस असलेल्या वडिलांना बच्चन आवडत. त्यामुळे वयाच्या आठव्या वर्षी पुण्यात देहू रोडला डिफेन्स थिएटरमध्ये प्रथमत: बच्चनचा ‘डॉन’ सिनेमा दाखविला आणि आजअखेर ते बच्चनचा एकही सिनेमा सोडत नाहीत.

मूळचे किणी गावचे दौलत हवालदार यांनीही कॉलेज बंक करून कोल्हापुरात डॉन पाहिल्याची आठवण सांगितली. ते सध्या गोव्यात सांस्कृतिक खात्यात काम करतात. ‘डॉन’चा संपूर्ण आयुष्यावर प्रभाव असणारेही काही कमी नाहीत. राजारामपुरीतील माउली पुतळ्याजवळ राहणारी रमेश नावाची व्यक्ती तर मृत्यूपर्यंत ‘रमेश डॉन’ म्हणून प्रसिद्ध होती. ‘लोकमत’चे छायाचित्रकार नसीर अत्तारही बच्चन यांचे जबरदस्त वेडे. मित्रांसमवेत रांगेत घुसून तिकीट काढून हा सिनेमा पाहिल्याची आठवण त्यांनी सांगितली.फिर भी ‘डॉन’ आखीर ‘डॉन’ है‘डॉन’ने रिलीज व्हायच्या आधीच दोन महिने माझ्या आयुष्यात प्रवेश केला होता. सिनेमात मूळ ‘डॉन’ हा फक्त १० ते १५ मिनिटांपुरताच आहे. पोलिसांचा पाठलाग चुकवतानाच्या दृश्यातील पिवळ्या शर्टवर घातलेले, पांढऱ्या ठिपक्या ठिपक्या असलेले काळे जाकीट, जीवाच्या आकांताने पळणाऱ्या डॉनचे पोस्टर तरुण वर्गात इतके लोकप्रिय झाले, की ती फॅशन तर आलीच; पण शर्टवर हाताने ते चित्र रंगवून मुलं मिरवू लागली. सहा महिने शर्टच्या खिशावर हे चित्र काढून घ्यायला माझ्याकडे रोज पोरं यायची.

दोन रुपयाला एक चित्र. तीन-चार महिने ‘डॉन’ मी याच पैशातून पाहिला. आजही डॉनची नशा तशीच आहे. आजूबाजूच्या वाईटावर प्रहार करावा, असे तेव्हा वाटायचे; पण बळ नव्हते. ती सुप्त इच्छा पडद्यावर बच्चनने पूर्ण केली. डॉनमुळे वडिलांची एक कानफाटीतही खाल्ली होती. सलग आठ-दहावेळा डॉन पाहिल्यावर, तोंड लाल होईतोपर्यंत पान खायचं ठरलं आणि पान खाऊन घरी आलो. घरी आल्यावर तोंड बाहेरूनही लाल झाले होते. तो काळ म्हणजे पानाकडेसुद्धा वाईट व्यसन म्हणून पाहिलं जायचं. वडिलांनी कानफाटीत दिली खरी; पण मी मनातल्या मनांत म्हटलं, ‘इन्स्पेक्टरसाब कानफाडीत पडी तो क्या हुवा, फिर भी डॉन आखीर डॉन है।’दहावीच्या पूर्वपरीक्षेला लिहिली चक्क सिनेमाची स्टोरीबच्चनवेडे ग्रुपमध्ये व्हाईस अ‍ॅडमिन असलेले राजू नांद्रे यांनीही १0 वर्षांचे असताना ‘डॉन’ पाहिल्याची आठवण सांगितली. राजू नांद्रे यांचे मित्र असलेले वेताळमाळ येथे राहणारे संजय जगताप यांच्यावर डॉनचा तर इतका प्रभाव होता, की १९७९ मध्ये दहावीच्या पूर्वपरीक्षेला त्यांनी कलाशिक्षक आणि चळवळीतील कार्यकर्ते असलेल्या एका विषयात डॉनची स्टोरी लिहिली होती. अर्थात महाराष्ट्र हायस्कूलचे तत्कालीन मुख्याध्यापक डी. बी. पाटील यांच्याकडून नंतर त्यांना कानफाटीत खावी लागली, हा भाग वेगळा. आज जगताप यांचे एस. एम. लोहिया हायस्कूलसमोर आइस्क्रीमचे दुकान आहे. 

 

टॅग्स :cultureसांस्कृतिकkolhapurकोल्हापूर