Donation of Rs | मंदिर बंद असतानाही अंबाबाईला ७ लाखांचे दागिने अर्पण-११ लाखांची देणगी

मंदिर बंद असतानाही अंबाबाईला ७ लाखांचे दागिने अर्पण-११ लाखांची देणगी

ठळक मुद्देमंदिर बंद असतानाही अंबाबाईला ७ लाखांचे दागिने अर्पण११ लाखांची देणगी

 कोल्हापूर : कोरोनामुळे नवरात्रौत्सवात अंबाबाई मंदिर बंद असले तरी भाविकांनी देवीला १४० ग्रॅम ५५० मिली.चे दागिने अर्पण केले आहेत. त्यांची बाजारभावानुसार किंमत ७ लाख ६८ हजार ४८६ इतकी आहे तर ऑनलाईन ट्रान्स्फर झालेल्या ११ लाख २७ हजार ७१९ इतक्या रकमेची मंदिराच्या उत्पन्नात भर पडल्याची माहिती देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव व सचिव विजय पोवार यांनी दिली.

कोरोनामुळे अद्यापही राज्यातील मंदिरे भाविकांसाठी बंद आहेत. त्यामुळे यंदा अंबाबाईचा शारदीय नवरात्रौत्सवदेखील भाविकांविना पार पडला. दरवर्षी देवस्थानला या काळात २ कोटींचे उत्पन्न मिळते तर गेल्या सहा महिन्यांत १० कोटींच्या आसपास उत्पन्न घटले आहे. भाविकांना प्रवेश नसला तरी त्यांनी देवीला विविध प्रकारचे दागिने अर्पण केले आहेत. त्यात ठुशी, सोन्याची माळ, पेंडल, मंगळसूत्र या अलंकारांचा समावेश आहे. यासह भाविकांनी देणगी म्हणून ११ लाख २७ हजार इतकी रक्कम ऑनलाईन माध्यमातून देणगीच्या स्वरुपात दिली आहे.

अलंकार आणि त्यांचे मूल्य

  • सोन्याचे पेंडल (९ ग्रॅम ११० मिली) : ५२ हजार ४६८
  • ठुशी (७५ ग्रॅम) : ४ लाख ८ हजार
  • ठुशी (४२ ग्रॅम १०० मिली) : २ लाख २९ हजार २५
  • मंगळसूत्र (१० ग्रॅम २०० मिली) : ५७ हजार ५७३
  • सोन्याची माळ (३ ग्रॅम १४० मिली) : १६ हजार ४२०
  • सोन्याची नथ (१ ग्रॅम) : ५ हजार
  • एकूण : १४० ग्रॅम ५५० मिली : ७ लाख ६८ हजार ४८६

Web Title: Donation of Rs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.