शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur: पराभवाने हिंमत हरू नका, पुन्हा भरारी घेऊया; सतेज पाटील यांनी जागविली उमेद 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 7, 2025 13:03 IST

पी.एन.पाटील जयंतीनिमित्त निर्धार

कोल्हापूर : नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचा पराभव झाला असला, तरी जिल्ह्यातील दहा मतदारसंघांतील साडेअकरा लाखांहून मतदारांनी आपल्याला मतदान केले आहे. या मतदारांना वाऱ्यावर सोडायचे नाही. त्यामुळे पराभवाने हिंमत हरू नका, आहे ही एकी कायम ठेवा, फिनिक्स पक्ष्याप्रमाणे आपण पुन्हा भरारी घेऊ, या शब्दांत काँग्रेसचे विधानपरिषदेतील गटनेते, आमदार सतेज पाटील यांनी सोमवारी महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांमध्ये उमेद जागवली. यावेळी त्यांनी सगळे संपली नाही, अजून बरेच काही शिल्लक आहे, असे सांगत आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये ताकदीने उतरणार असल्याचा संदेशही दिला.माजी आमदार स्व.पी.एन.पाटील यांच्या ७२ व्या जयंतीनिमित्त कोल्हापुरातील काँग्रेस कमिटीत आयोजित अभिवादन कार्यक्रमात ते बोलत होते. खासदार शाहू छत्रपती अध्यक्षस्थानी होते. यावेळी माजी आमदार के.पी.पाटील, माजी आमदार मालोजीराजे, माजी आमदार संजय घाटगे, ‘गोकुळ’चे ज्येष्ठ संचालक विश्वास पाटील, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष राहुल पाटील, जिल्हा बँकेचे संचालक राजेश पाटील, ‘गोकुळ’चे संचालक बाळासाहेब खाडे, बाबासाहेब चौगले, राजेंद्र मोरे, बयाजी शेळके, शशिकांत पाटील चुयेकर उपस्थित होते.सतेज पाटील म्हणाले, पी.एन.पाटील हे काँग्रेसचे निष्ठावंत म्हणून राज्यभर ओळखले जात होते. त्यांच्या निष्ठेचा हाच विचार आपण तेवत ठेवूया. शाहू छत्रपती म्हणाले, पी.एन.पाटील हे एकनिष्ठतेचे उदाहरण होते. पक्षनिष्ठा काय असते हे त्यांनी दाखवून दिले. कार्यकर्त्यांनीही त्यांचे एकनिष्ठ विचार पुढे घेऊन जाणे गरजेचे आहे.के.पी.पाटील म्हणाले, १९८५ पासून पी.एन. यांच्याबरोबर जिल्हा बँकेत एकत्र काम केले. पुढे राष्ट्रवादीच्या स्थापनेनंतर आमचे पक्ष वेगळे झाले. मात्र, त्यात कधीच कटुता आली नाही. एकनिष्ठतेचा वस्तुपाठ त्यांनी घालून दिला. यावेळी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष व्ही.बी.पाटील, शेकापचे बाबूराव कदम, उदय नारकर, भारती पोवार, सतीशचंद्र कांबळे, डी.जी.भास्कर यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी धैर्यशील पाटील कौलवकर, दिलीप पवार, राहुल देसाई, बाळासाहेब सरनाईक, हिंदुराव चौगले, भारत पाटील भुयेकर, सरलाताई पाटील उपस्थित होते. राजेखान शानेदिवाण यांनी प्रास्ताविक केले.करवीरचे ते मताधिक्य गेले कुठे?लोकसभा निवडणुकीत मला ७४ हजार मतांचे मताधिक्य मिळाले. विधानसभेला मात्र हे मताधिक्य गेले कुठे? असा सवाल शाहू छत्रपती यांनी केला.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरSatej Gyanadeo Patilसतेज ज्ञानदेव पाटीलcongressकाँग्रेस