शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
2
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
3
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
4
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
5
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
6
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
7
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
8
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
9
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
10
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
11
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
12
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
13
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
14
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
15
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
16
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
17
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
18
‘साहेब’ होऊ घातलेला बिरदेव म्हणतो, शेळ्या-मेंढ्यांना काय लाजायचं? तीच माझी ताकद
19
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
20
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे

कोडोलीत हॉस्पिटलमध्ये गर्भलिंग निदान, स्टिंग ऑपरेशनमध्ये डॉक्टर जाळ्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 16, 2020 20:17 IST

Crimenews, Hospital, Doctor, police, Kolhapurnews स्त्री भ्रूणहत्या रोखण्यासाठी गर्भलिंग चाचणी करण्यावर कायद्यानं बंदी आहे. परंतु  कोल्हापूर जिल्ह्यात गर्भलिंग निदानाचा पर्दाफाश झाला आहे. पुरोगामी जिल्हा अशी ओळख असलेल्या कोल्हापूरमध्ये गर्भलिंग निदानाचं एक धक्कादायक वास्तव उघडकीस आल्यानं राज्यात खळबळ उडाली आहे.

ठळक मुद्देकोडोलीत हॉस्पिटलमध्ये गर्भलिंग निदानस्टिंग ऑपरेशनमध्ये डॉक्टर जाळ्यात

कोल्हापूर: स्त्री भ्रूणहत्या रोखण्यासाठी गर्भलिंग चाचणी करण्यावर कायद्यानं बंदी आहे. परंतु  कोल्हापूर जिल्ह्यात गर्भलिंग निदानाचा पर्दाफाश झाला आहे. पन्हाळा तालुक्यातील कोडोली गावात अरविंद कांबळे हा ५५ वर्षीय डॉक्टर मातृसेवा हॉस्पिटल चालवतो. या हॉस्पिटलमध्ये गर्भलिंग निदान केलं जात असल्याचा संशय सामाजिक कार्यकर्त्यांना होता.

त्यामुळे प्रशासकीय वैद्यकीय अधिकारी आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी बुधवारी सकाळपासून या हॉस्पिटलमध्ये एक स्टिंग ऑपरेशन राबवलं. त्या स्टिंग ऑपरेशनमध्ये अरविंद कांबळे हा डॉक्टर अलगदपणे जाळ्यात सापडला. त्यानं सोनोग्राफीसाठी २० हजार रुपये घेतल्याचंही स्टिंग ऑपरेशनमध्ये उघड झालं आहे.

२०१७ साली हा डॉक्टर गर्भलिंग निदान करत असल्याचे उघड झालं होतं. त्याच्यावर कारवाई करून त्याच्या रुग्णालयातील सोनोग्राफी मशीन सील करण्यात आलं होतं. कारवाईनंतरही सोनोग्राफी मशीनचं सील काढून डॉ. कांबळे यानं गर्भलिंग निदानाचा गोरखधंदा सुरूच ठेवला होता. त्यामुळे सामाजिक कार्यकर्त्या गीता हसुरकर आणि वैद्यकीय अधिकाऱ्यांनी आज स्टिंग ऑपरेशन केलं.

कांबळे यांनं २० हजार रुपयांची मागणी केली. त्यानंतर गर्भलिंगनिदानही केलं. त्यानंतर पन्हाळा पोलिसांनी आरोपी डॉक्टरला रंगेहात ताब्यात घेतलं. कांबळे यांनं किती महिलांचं गर्भलिंगनिदान केलं आहे, याची पोलीस कसून चौकशी करत आहेत. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीdocterडॉक्टरhospitalहॉस्पिटलPoliceपोलिसkolhapurकोल्हापूर