शहरं
Join us  
Trending Stories
1
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
2
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
3
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
4
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
5
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
6
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
7
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
8
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
9
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
10
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
11
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
12
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
13
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
14
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
15
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
16
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
17
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
18
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
19
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
20
दमदार इंजिनसह BMW ने भारतात लॉन्च केली सर्वात स्वस्त बाईक, जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
Daily Top 2Weekly Top 5

शेणा-मुतात राबणाऱ्या मायमाऊलीच्या घामाचे पैसे देता म्हणजे उपकार करता का

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 27, 2021 04:25 IST

लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : ‘गोकूळ‘मध्ये दूध उत्पादकांना ३,१३,२३ तारखेला दुधाची बिले देत असल्याचे सत्तारूढ गट सांगत आहे. गवळीदेखील ...

लोकमत न्यूज नेटवर्क

कोल्हापूर : ‘गोकूळ‘मध्ये दूध उत्पादकांना ३,१३,२३ तारखेला दुधाची बिले देत असल्याचे सत्तारूढ गट सांगत आहे. गवळीदेखील दहा दिवसाला पैसे देतात, तुम्ही काय वेगळे करता. पैसे नाही दिले तर दूध कोण घालणार? शेणा-मुतात राबणाऱ्या मायमाऊलीच्या घामाचे ते पैसे आहेत, ते दिले म्हणजे काय उपकार करता का? असा सवाल ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत केला.

‘गोकूळ’ला वैभव मिळवून द्यायला ते गेले होते काेठे? अशी विचारणा सत्तारूढ गटाच्या नेत्यांनी केल्याबाबत विचारले असता, मंत्री मुश्रीफ म्हणाले, वैभवाचा विषयच येथे नाही, ते म्हणतात ३,१३,२३ ला बिले देतो, गवळीसुध्दा दहा दिवसाला बिले देतात. पैसे दिले नाहीतर त्याला दूध कोण घालणार. आम्ही उसाची एफआरपी देतो म्हणजे काय उपकार करतो का? बिले देणे त्यांचे कामच आहे. मूळात ‘गोकूळ’मधील गैरव्यवहार किती दिवस चालणार, आपण उघड्या डोळ्याने किती दिवस बघायचे? म्हणून आमचा सकारात्मक प्रचार आहे. एकदा गोकूळ आपल्या हातात द्या आम्ही खर्च कमी करून पारदर्शीपणे कारभार करू. पाच-सहा वर्षांपूर्वी १३६ कोटी संचित तोट्यात असलेली जिल्हा बँक १५० काेटींच्या नफ्यात आणली, त्याप्रमाणे अतिशय पारदर्शी कारभार करून देशातील २७ व्या क्रमांकावर असणारा ‘गोकुल’ ‘अमूल’बरोबर काम करेल. लीटरला दोन रुपये जादा दिले नाहीतर पुढच्या निवडणुकीत शेतकऱ्यांनी दारात उभे करून घेऊ नये, असेही त्यांनी सांगितले.

महाडिकांकडून लोकांचा अपमान

महादेवराव महाडिक यांनी परवा आपण जिल्ह्याचा बाप असल्याचे वक्तव्य केले आहे. ते बाप आहेत, ताप आहेत की पाप, यावर खासदार संजय मंडलिक यांनी प्रतिक्रिया दिली आहे. मात्र महाडिक यांनी असे बोलून लोकांचा अपमान केला आहे. असे बोलणे बरे न्हवे, असे मुश्रीफ यांनी सांगितले.

तर आपण टँकरही लावला नसता

‘गोकूळ’च्या प्रत्येक निवडणुकीत टँकरवर एवढ्या जोरात टीका होते, तरीही महादेवराव महाडिक जराही आपल्यात बदल करत नाहीत. आपण जर महाडिक यांच्या ठिकाणी असतो, तर एक टँकरदेखील लावला नसता. असा टोला मुश्रीफ यांनी लगावला.