कोल्हापूर : फेडरेशन ऑफ कर्नाटक लॉरी ओनर्स अँड एजंट असोसिएशनने १४ एप्रिलच्या मध्यरात्रीपासून कर्नाटक राज्यात बेमुदत चक्काजाम करून सर्व प्रकारची मालवाहतूक बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील मालवाहतूकदारांनी १२ आणि १३ एप्रिलला कर्नाटक मालवाहतूक करू नये, असे आवाहन जिल्हा लॉरी ऑपेरटर असोसिएशनच्या गुरुवारी झालेल्या बैठकीत करण्यात आले. अध्यक्षस्थानी अध्यक्ष सुभाष जाधव होते.डिझेल दरवाढ, टोल दरवाढ, आरटीओ सीमा तपासणी नाके बंद करावे, यासह अन्य मागण्यांसाठी कर्नाटक लॉरी असोसिएशनने मालवाहतूक बंदचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे महाराष्ट्रातून जाणाऱ्या मालवाहतूकदारांनी कर्नाटकात वाहतूक करू नये. साखर, धान्य, रवा, आटा, मैदा, कांदा, बटाटा, स्टील व्यापाऱ्यांनी आणि इतर व्यापाऱ्यांनी माल भरू नये. कांदा, बटाटा, साखर, इंडस्ट्रियल मटेरियल आणि इतर कर्नाटकात पाठवला जाणारा सर्व प्रकारचा माल १४ तारखेपर्यंत गाड्या परत येतील, असे नियोजन करावे. वाहनाचे आणि मालाचे नुकसान होणार नाही, याची दक्षता सर्व व्यापारी, उद्योजक, कारखानदार यांनी घ्यावी, असे बैठकीत आवाहन केले. बैठकीस उपाध्यक्ष भाऊ घोगळे, सेक्रेटरी हेमंत डिसले, खजानिस प्रकाश केसरकर, संचालक विजय भोसले, शिवाजी चौगुले, जोसेफ फर्नांडिस, जगदीश सोमय्या, पंडित कोरगावकर, विलास पाटील उपस्थित होते.
कर्नाटकात १२, १३ एप्रिलला मालवाहतूक करू नका, ‘लॉरी असोसिएशन’चे आवाहन; नेमकं कारण काय..वाचा
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 11, 2025 12:45 IST