पाचगाव प्रकरणातील डीजे ऊर्फ दिलीप जाधवच्या मुसक्या आवळल्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 9, 2020 13:24 IST2020-05-09T13:13:10+5:302020-05-09T13:24:21+5:30
पाचगाव येथील संघटित होळीचा मोरक्या दिलीप अशोक जाधव उर्फ डीजे याला करवीर पोलीसांनी सोलापूर येथे शनिवारी पहाटे मुसक्या आवळल्या.

पाचगाव प्रकरणातील डीजे ऊर्फ दिलीप जाधवच्या मुसक्या आवळल्या
कोल्हापूर : पाचगाव येथील संघटित होळीचा मोरक्या दिलीप अशोक जाधव उर्फ डीजे याला करवीर पोलीसांनी सोलापूर येथे शनिवारी पहाटे मुसक्या आवळल्या.
अशोक पाटील खून प्रकरणी आजन्म कारावास झालेल्या डीजेच्या मोटारीवर चार दिवसापूर्वी तरुणांनी हल्ला केला होता मोटरची तोडफोड झाली होती करवीर पोलीस घटनास्थळी पोहोचण्यापूर्वीच डीजे तेथून पसार झाला होता.
चौकशीअंती दिलीप जाधव याने पॅरोल रजे संदर्भात न्यायालयाने दिलेल्या निर्देशांचे उल्लंघन करून त्याने पाचगाव येथील स्वतःच्या घरात बेकायदेशीर वास्तव केल्याचे उघड झाले होते याप्रकरणी डिजेवर करवीर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता.
दरम्यान, दोन दिवसापूर्वी डीजे स्वतः सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा पोलीस हजर झाला होता स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा व करवीर पोलीस पथकाने त्याचा आज ताबा घेत त्याला दुपारी न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.
दिलीप जाधव उर्फ डीजे ला पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती समजताच त्याच्या समर्थकांनी करवीर पोलीस ठाण्याच्या आवारात गर्दी केली होती