कोल्हापूर : विद्यापीठ हायस्कूलच्या माजी विद्यार्थ्यांची दिवाळी भेट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 2, 2018 18:43 IST2018-11-02T18:39:29+5:302018-11-02T18:43:46+5:30

भक्ति ईश्वराची आणि सेवा मानवाची असे ब्रीदवाक्य असणाऱ्या विद्यापीठ हायस्कूलच्या माजी विद्यार्थ्यानी दिवाळी भेट देत मातोश्री वृध्दाश्रमातील आजी-आजोबांच्या चेहऱ्यावर हास्य खुलविले.

Diwali gift to former students of University High School | कोल्हापूर : विद्यापीठ हायस्कूलच्या माजी विद्यार्थ्यांची दिवाळी भेट

कोल्हापूरातील विद्यापीठ हायस्कूलच्या माजी विद्यार्थ्यांनी मातोश्री वृध्दाश्रमातील आजी-आजोंबासाठी दिवाळीची भेट देउन त्यांच्या चेहऱ्यावर हास्य फुलविले.

ठळक मुद्देविद्यापीठ हायस्कूलच्या माजी विद्यार्थ्यांची दिवाळी भेटमातोश्रीतील आजी-आजोंबाच्या चेहऱ्यावर फुलविले हास्य

कोल्हापूर : भक्ति ईश्वराची आणि सेवा मानवाची असे ब्रीदवाक्य असणाऱ्या विद्यापीठ हायस्कूलच्या माजी विद्यार्थ्यानी दिवाळी भेट देत मातोश्री वृध्दाश्रमातील आजी-आजोबांच्या चेहऱ्यावर हास्य खुलविले.

दुरावलेल्या मित्र-मैत्रिणींना सामाजिक माध्यमामुळे संपर्क साधला जातो, मात्र सामाजिक भान जपत मदतीचा हात पुढे करणाऱ्यांचे समूह मात्र फार कमी प्रमाणात आढळतात, परंतु विद्यापीठ हायस्कूलच्या १९९९ च्या तुकडीतील माजी विद्यार्थ्यांनी मातोश्री वृध्दाश्रमातील आजी-आजोबांसाठी उटणे, सुगंधी तेल, कपडे धुण्यासाठी पावडर अशा प्रकारची मदत करुन त्यांच्या चेहऱ्यावर दिवाळीनिमित्त हास्य फुलविले.

jpg


विद्यापीठ हायस्कूलचे अनघा डुबल, सुषमा सनी जाधव, सनी जाधव, गणेश नेर्लेकर, हर्षल घाटगे, पुष्कर देशपांडे, अनिरुध्द नेने, मल्हारी कुलकर्णी, दिपक गानू, रोहित पत्रावळे, सूरज गायकवाड, केदार पलुसकर, चंद्रकांत गुरव, सचिन मोहिते या माजी विद्यार्थ्यांनी हा उपक्रम राबविला.




 

Web Title: Diwali gift to former students of University High School