तहसीलदार शिल्पा ओसवाल यांच्याकडून कर्मचाºयांना दीवाळी भेट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 19, 2017 20:29 IST2017-10-19T20:19:29+5:302017-10-19T20:29:21+5:30
भोगावती : सरकारी अधिकाºयांकडून आपल्या आॅफिसच्या कर्मचाºयांना दिवाळी भेट दिली असे कोणी सांगू लागले तर त्याला खुळ््यात काढले

तहसीलदार शिल्पा ओसवाल यांच्याकडून कर्मचाºयांना दीवाळी भेट
भोगावती : सरकारी अधिकाºयांकडून आपल्या आॅफिसच्या कर्मचाºयांना दिवाळी भेट दिली असे कोणी सांगू लागले तर त्याला खुळ््यात काढले जाईल मात्र राधानगरीच्या तहसीलदार शिल्पा ओसवाल यांनी तालुक्यातील कोतवाल आणि शिपायांना साखर, साबण आणि तेल अशी दिवाळी भेट देवून जोर का झटका दिला आहे. श्रीमती ओसवाल यांच्या या अनोख्या भेटीचे सर्वत्र कौतुक होत आहे.
सरकारी कर्मचारी म्हटल की फक्त टेबल खालून होणारे व्यवहार हीच त्याची संकल्पना समजली जाते.मात्र असे अनेक उच्च पदस्थ अधिकारी आहेत ते स्वत:ची खरी ओळख करून देत नाहीत तोच त्याचा मोठेपणा असतो असेच राधानगरी च्या तहसीलदार श्रीमती शिल्पा ओसवाल या आहेत. ओसवाल यांनी अधिकारी पदापेक्षा ख?्या मानुष्कीचे दर्शन घडवले आहे.
राधानगरी पंचायत समिती व तहसील कार्यालयातील शिपाई तालुक्यातील कोतवाल अशा शंभर वर कर्मचा?्याना दिपावलीची भेट दिली आहे.तीहि स्वत:च्या खचार्ने दिली आहे हे विशेष आहे.सरकारी कर्मचार्यांचा बोनस यापूर्वीच पासून बंद झाला आहे. त्यामुळे कनिष्ट कर्मचारी आर्थिक अडचणीत आला त्यामुळे आशा काही संवेदनशील अधिकाºयांच्यामुळे दिवाळीचा प्रकाश तेजोमय होतो. यापेक्षा मोठा आनंद कोणता असू शकतो.