उचगावात ४०० हून अधिक लाभार्थ्यांना पेन्शनचे वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 07:07 IST2021-02-05T07:07:43+5:302021-02-05T07:07:43+5:30

उचगाव: उचगाव येथे शिवसेनेच्यावतीने राबविण्यात आलेल्या ‘बँक आपल्या दारी’ उपक्रमांतर्गत ४०० हून अधिक पेन्शनधारकांना पेन्शनचे वाटप करण्यात आले. ...

Distribution of pension to more than 400 beneficiaries in Uchgaon | उचगावात ४०० हून अधिक लाभार्थ्यांना पेन्शनचे वाटप

उचगावात ४०० हून अधिक लाभार्थ्यांना पेन्शनचे वाटप

उचगाव: उचगाव येथे शिवसेनेच्यावतीने राबविण्यात आलेल्या ‘बँक आपल्या दारी’ उपक्रमांतर्गत ४०० हून अधिक पेन्शनधारकांना पेन्शनचे वाटप करण्यात आले. संजय गांधी, श्रावणबाळ, वृद्धापकाळ, इंदिरा गांधी, आदी शासनाच्या योजनांद्वारे नागरिकांना कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या मार्केट यार्ड येथील शाखेत पेन्शन दिली जाते. बँकेमध्ये जाण्यासाठी थेट बससेवा नसल्याने ज्येष्ठांची गैरसोय होते. त्यांची ही अडचण लक्षात घेत ‘बँक आपल्या दारी’ या उपक्रमाअंतर्गत बँकेच्या सहकार्यातून करवीर शिवसेनेच्यावतीने उचगावांतील ४०० हून अधिक पेन्शनधारकांना उचगांव येथील मंगेश्वर मंदिर या ठिकाणी कॅम्पद्वारे पेन्शन वाटप करण्यात आली.

यावेळी करवीर तालुकाप्रमुख राजू यादव, हिंदू जनजागृती समितीचे शिवानंद स्वामी, विक्रम चौगुले, युवा सेनेचे संतोष चौगुले, बाळासाहेब नलवडे, अजित चव्हाण, विराग करी, करवीर तालुका महिला आघाडीच्या स्वाती यादव, शिवाजी पाटील, अजित पाटील तसेच बँकेचे कर्मचारी सुनील केसरकर, मिलिंद प्रभावळकर आदी उपस्थित होते.

फोटो : २५ उचगाव पेन्शन

ओळ: उचगाव येथे शिवसेनेच्या पुढाकाराने 'बँक आपल्या दारी' या उपक्रमाअंतर्गत ४०० हून आधिक लाभार्थ्यांना पेन्शनचे वाटपप्रसंगी राजू यादव सह शिवसैनिक

Web Title: Distribution of pension to more than 400 beneficiaries in Uchgaon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.