(वितरण विभाग)

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 5, 2021 04:25 IST2021-03-05T04:25:06+5:302021-03-05T04:25:06+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : कोल्हापूर ते मुंबई जाणारी महालक्ष्मी एक्सप्रेस या रेल्वेची धडक बसल्याने बुधवारी रात्री एक अनोळखी ...

(Distribution department) | (वितरण विभाग)

(वितरण विभाग)

लोकमत न्यूज नेटवर्क

कोल्हापूर : कोल्हापूर ते मुंबई जाणारी महालक्ष्मी एक्सप्रेस या रेल्वेची धडक बसल्याने बुधवारी रात्री एक अनोळखी २५ वर्षीय तरुण ठार झाला. ही घटना गांधीनगर रेल्वे स्टेशन रुळावर घडली. त्याचे डोके व चेहरा फूटून त्याचा जागीच मृत्यू झाला. या अपघाताची नोंद गांधीनगर पोलीस ठाण्यात झाली आहे.

पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, गांधीनगर रेल्वे स्टेशन रुळावर महालक्ष्मी एक्स्प्रेस या रेल्वेची धडक बसल्याने तरुण जागीच ठार झाला. त्या अनोळखी पुरुषाच्या हातावर सुरज असे गोंदले आहे व डाव्या हातावर बदामामध्ये इंग्रजीत एस असे गोंदले आहे. त्याचा रंग सावळा, अंगात आकाशी रंगाचा पट्ट्याचा टी शर्ट व पांढऱ्या रंगाची पॅट परिधान केली आहे. संबंधीताच्या नातेवाईकांनी गांधीनगर पोलीस ठाण्याशी संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे.

Web Title: (Distribution department)