लिंगनूर ग्रामपंचायतीतर्फे कोरोना साहित्याचे वितरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2021 04:30 IST2021-06-09T04:30:28+5:302021-06-09T04:30:28+5:30
लिंगनूर कानूल (ता. गडहिंग्लज) येथील ग्रामपंचायतीतर्फे कोरोना योद्ध्यांना पीपीई किट, ऑक्सिमीटर, थर्मामीटर व सॅनिटायझरचे वितरण करण्यात आले. यावेळी आशासेविका ...

लिंगनूर ग्रामपंचायतीतर्फे कोरोना साहित्याचे वितरण
लिंगनूर कानूल (ता. गडहिंग्लज) येथील ग्रामपंचायतीतर्फे कोरोना योद्ध्यांना पीपीई किट, ऑक्सिमीटर, थर्मामीटर व सॅनिटायझरचे वितरण करण्यात आले.
यावेळी आशासेविका संगीता येसरे, सुनीता जोशिलकर, कविता येसरे तर रामदास शेटके व महादेव येसरे या फ्रंटलाइन कामगारांना सरपंच अॅड. परमेश्वरी पाटील व पोलीस पाटील मारुती संकपाळ यांच्या हस्ते हे किट देण्यात आले.
यावेळी उपसरपंच दीपक राजगोळे, संतोष पाटील, तलाठी जितेंद्र माने, तानाजी जोशिलकर, ग्रा. पं. सदस्य संजय कांबळे, मनीषा ढेंगे, गजेंद्र कांबळे, संभाजी ढेंगे, बाळू मुल्लाणी आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.
-------------------------
फोटो ओळी : लिंगनूर कानूल (ता. गडहिंग्लज) येथे आशासेविका कविता येसरे व सुनीता जोशिलकर यांना वैद्यकीय साहित्य देताना सरपंच परमेश्वरी पाटील. शेजारी तानाजी जोशिलकर, दीपक राजगोळे, मारुती संकपाळ, जितेंद्र माने आदी उपस्थित होते.
क्रमांक : ०८०६२०२१-गड-०१