शहरं
Join us  
Trending Stories
1
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
2
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
3
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
4
शेअर बाजारात टाटा-अंबानींना मोठा धक्का! टॉप १० पैकी ६ कंपन्यांचे २.२२ लाख कोटींचे नुकनान; मग कमावले कोणी?
5
Video: हिमाचल प्रदेशातील पर्यटनस्थळी भारतीयांनी केला कचरा; परदेशी नागरिकाने केली सफाई
6
"उद्धव ठाकरेंच्या वाढदिवशी असं गिफ्ट..."; पुणे रेव्ह पार्टीवरून भाजपाचा 'मविआ'ला खोचक टोला
7
IND vs ENG: इंग्लंडच्या गोलंदाजावर 'बॉल टॅम्परिंग'चा आरोप, 'त्या' कृतीमुळे चर्चा, VIDEO व्हायरल
8
कोट्यवधींचा व्यवसाय सोडून जपानी अब्जाधीश बनला शिवभक्त! एका रात्री स्वप्नात... आणि संपूर्ण आयुष्य बदललं
9
Mansa Devi Stampede: गुदमरून टाकणारी गर्दी, एक अफवा अन्...; चेंगराचेंगरीपूर्वीचा व्हिडीओ आला समोर 
10
अनुष्का शर्माचा 'चकदा एक्सप्रेस' झाला डबाबंद? सिनेमातील अभिनेत्यानेच दिली प्रतिक्रिया, म्हणाला...
11
Roshni Walia : "कधीकधी काही लोक...", वडिलांनी सोडली आईची साथ, नातेवाईकांनी दिला शाप, अभिनेत्री भावुक
12
मोहम्मद मुइझ्झूंचा चीनला धक्का; भारतासोबत मुक्त व्यापार करार करण्याची व्यक्त केली इच्छा...
13
श्रावण विनायक चतुर्थी: दूर्वागणपती व्रत का करतात? वाचा, बाप्पाला प्रिय अमृतासमान दुर्वा कथा
14
यापेक्षा चांगली संधी मिळणार नाही; ही कंपनी आपल्या कारवर देतेय १ लाख रुपयांची सूट
15
कुठे गेला 'श्वास'मधला चिमुकला 'परश्या'? २९ वर्षीय तरुणाने आता धरली वेगळीच वाट
16
IND vs ENG: गिल-राहुलची फलंदाजी अन् स्टोक्सची तंदुरूस्ती... 'या' ५ गोष्टी ठरवतील चौथ्या कसोटीचा निकाल
17
चातुर्मासातील पहिली श्रावण विनायक चतुर्थी: गणपती होईल प्रसन्न, कसे कराल व्रतपूजन? शुभच घडेल
18
पहिला श्रावणी सोमवार: ‘असे’ करा शिवपूजन, कोणती शिवामूठ वाहावी? पाहा, महत्त्व अन् मान्यता
19
Corona Virus : संकटं संपता संपेना! कोरोना महामारीचा मेंदूवर भयंकर परिणाम, संसर्ग झाला नसला तरी...
20
प्राडाच्या वादानंतर कोल्हापुरी चप्पलांना QR कोड! संघटनेने का घेतला असा निर्णय? जाणून घ्या कोल्हापुरीचा इतिहास!

Kolhapur-सौरउर्जा उपकरण खरेदीत घोटाळा; भादोलेच्या सरपंचासह सर्व १८ सदस्य अपात्र करा, सीईओंचा अभिप्राय 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 16, 2025 18:28 IST

कोल्हापूर : हातकणंगले तालुक्यातील भादोले ग्रामपंचायतीच्या सर्व म्हणजे सरपंचासह १८ सदस्यांना महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम १९५९ मधील कलम ३९ नुसार ...

कोल्हापूर : हातकणंगले तालुक्यातील भादोले ग्रामपंचायतीच्या सर्व म्हणजे सरपंचासह १८ सदस्यांना महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम १९५९ मधील कलम ३९ नुसार अपात्र ठरवण्याची कार्यवाही करण्यात यावी असा अभिप्राय जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस. यांनी दिला आहे. हा अभिप्राय त्यांनी विभागीय आयुक्तांना पाठवला असून त्यांच्याकडूनच आता याबाबत निर्णय घेण्यात येणार आहे. सौरऊर्जा उपकरणे खरेदीप्रकरणी ९ लाख ८४ हजार रुपयांचा घोटाळा केल्याचे सिद्ध झाल्यानंतर हा अभिप्राय देण्यात आला आहे.ग्रामस्थ व तक्रारदार कृष्णात भीमराव पाटील यांनी याबाबत २६ जुलै २०२४ रोजी तक्रार केली होती. त्यानंतर पंचायत समिती पन्हाळ्याचे विस्तार अधिकारी राजेंद्र तळपे यांनी चौकशी केली त्यात तथ्य आढळले. सरपंच स्नेहा शिवाजीराव पाटील यांना ‘कारणे दाखवा नोटीस’ काढून त्यांचा खुलासा घेण्यात आला परंतु तो अमान्य करण्यात आला. कारण ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता अर्जुन गोळे यांनी प्रत्यक्ष पाहणी केली.त्यानुसार जो अहवाल दिला त्यात गंभीर कारभाराचा उल्लेख करण्यात आला आहे. सोलर पॅनेलची जोडणी पूर्ण नसणे, पॅनेल कनेक्ट पीन व्यवस्थित जाेडण्यात आल्या नाहीत, अर्थिंग केलेले नाही, लाईटनिंग कंडक्टर बसवण्यात आलेला नाही. हे सर्व साहित्य ५ लाख ९५ हजार ७९३ रुपयांचे असून प्रत्यक्ष ग्रामपंचायतीने १५ लाख ८० हजार रूपये अदा करून मूल्यांकनापेक्षा ९ लाख ८४ हजार २०७ रुपये जादा अदा केले आहेत. हातकणंगले पंचायत समिती गटविकास अधिकारी शबाना मोकाशी यांनीही या प्रकरणी अहवाल दिला होता.आर्थिक व्यवहारात कसूर झाल्याने तत्कालिन ग्रामसेवक राजेंद्र मगदूम यांच्या विभागीय खातेनिहाय चौकशी प्रस्तावित करण्यात आली आहे. याबाबत तक्रारदार आणि सरपंच, सदस्य यांना म्हणणे मांडण्याची संधी दिल्यानंतर कार्तिकेयन यांनी १८ सदस्यांच्या अपात्रतेचा अभिप्राय पाठवला आहे.

जनसुराज्यचे १३ तर काँग्रेसचे ५ सदस्यत्यातील सरपंच स्नेहा शिवाजीराव पाटील या जनसुराज्यच्या सरपंच असून गीतांजली अवघडे, दिलीप पाटील, गणपती पाटील, राहुल पाटील, भगवान घोलप, तोफिक सनदे, सुनील काटकर, धोंडिराम पाटील, अमोल कोळी, संगीत पाटील, अलका पाटील, मयुली पाटील, मालूबाई कोळी, सुवर्णा धनवडे, भारती माने, रुपाली कोळी, नीकिता कांबळे या ‘जनसुराज्य’च्या १३ आणि काँग्रेसच्या पाच सदस्यांना अपात्र करण्याचा हा प्रस्ताव आहे.

परस्पर ९ लाख ८४ हजार भरलेया प्रकरणामध्ये ग्रामविकास प्रशासनाचा कोणताही आदेश नसताना सरपंच आणि ग्रामसेवकांनी संबंधित ठेकेदाराकडून ९ लाख ८४ हजार २०७ रूपये भरून घेतले आहेत. त्यामुळे झालेली चूक कबूल केल्यातील प्रकार असून शासनाचे आर्थिक नुकसान झालेले नाही, असे भासवत कारवाईतून सुटण्यासाठी हा प्रयत्न असल्याचे मानले जाते.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरzpजिल्हा परिषदgram panchayatग्राम पंचायतsarpanchसरपंच