गणेशोत्सवात ठाकरे-शिंदे गटात वाद उफळला, कोल्हापुरात तणाव; अचानक आणून बसविली २१ फुटी मूर्ती

By भारत चव्हाण | Published: September 21, 2023 02:22 PM2023-09-21T14:22:40+5:302023-09-21T14:23:31+5:30

कोल्हापूर : येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात गणपती प्रतिष्ठापणा करण्यावरून दोन गटातील वाद गुरुवारी पोलीस प्रशासनाची मोठी डोकेदुखी ठरली. ...

Dispute erupted between Thackeray-Shinde group during Ganeshotsav, tension in Kolhapur | गणेशोत्सवात ठाकरे-शिंदे गटात वाद उफळला, कोल्हापुरात तणाव; अचानक आणून बसविली २१ फुटी मूर्ती

गणेशोत्सवात ठाकरे-शिंदे गटात वाद उफळला, कोल्हापुरात तणाव; अचानक आणून बसविली २१ फुटी मूर्ती

googlenewsNext

कोल्हापूर : येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात गणपती प्रतिष्ठापणा करण्यावरून दोन गटातील वाद गुरुवारी पोलीस प्रशासनाची मोठी डोकेदुखी ठरली. एका गटाने मूर्ती बसविण्याचा आग्रह धरला तर दुसऱ्या गटाने त्याला कडाडून विरोध केला. राज्यातील उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे वादाचे पडसाद कोल्हापूर शहरातील गणेशोत्सवात गणेश भक्तांतून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.

शिवाजी चौकातील छत्रपती शिवाजी चौक संयुक्त मित्र मंडळात यावर्षी ठाकरे - शिंदे असे दोन गट पडले आहेत. गणपती कोणी बसवायचा यावरून दोन गटात वाद निर्माण झाला. त्यामुळे हे मंडळ ज्या रिक्षा चालकांनी स्थापन केले, त्यांनी गणेशोत्सव साजरा करावा आणि ठाकरे - शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी यात भाग घेऊ नये, असे पोलीस प्रशासनासोबत झालेल्या बैठकीत ठरले. दोन्ही गटांनी ते मान्य देखील केले.

परंतु अचानक रात्री शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी 21 फुटी मूर्ती मंडपात आणून बसविली. त्यामुळे ठाकरे गटाचे कार्यकर्ते संतप्त झाले. त्यांनी गुरुवारी याच मंडपात आपलाही गणपती बसविण्याचा निर्धार केला. त्याला शिंदे गटाने विरोध केला. त्यामुळे वातावरण कमालीचे तणावपूर्ण बनले
कार्यकर्त्यांनी सामज्यास्याची भूमिका घ्यावी, उत्सवाला गालबोट लागेल असे वागू नका अशा शब्दात समजावण्याचा पोलिसांनी प्रयत्न केले, पण दोन्ही गट आपल्या भूमिकेवर ठाम राहिले.

अशाताच राज्य नियोजन मंडळाचे कार्याध्यक्ष राजेश क्षीरसागर शिवाजी चौकात पोहचले. त्याने शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांना जोर चढला. घोषणाबाजी सुरु झाली. कायदा व सुव्यवस्था बिघडविणाऱ्या ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांना अटक करा, अशी मागणी क्षीरसागर यांनी केली.

Web Title: Dispute erupted between Thackeray-Shinde group during Ganeshotsav, tension in Kolhapur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.