शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur Politics: मुश्रीफ-कोरे, दोघांत मतभेदाचे वारे; ‘गोकुळ’च्या राजकारणावर परिणाम शक्य

By राजाराम लोंढे | Updated: March 11, 2026 12:41 IST

गडहिंग्लजमध्ये पडली वादाची ठिणगी : शह-काटशहाचे राजकारण उफाळले

राजाराम लोंढेकोल्हापूर : गेल्या तीन दशकापासून वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ व आमदार विनय काेेरे यांच्यामधील दोस्ताना जिल्ह्याने अनुभवला. पण, सध्या या दोन जिवलग दोस्तांमध्ये मतभेदाची दरी रुंदावली आहे. गडहिंग्लज नगरपालिका निवडणुकीत पडलेल्या ठिणगीचा जिल्हा परिषद निवडणुकीत भडका उडाला आणि बघता-बघता दोघांमध्ये शह-काटशहाचे राजकारण उफाळून आले आहे.गेल्या पंधरा-वीस वर्षांच्या राजकारणात या दोन्ही नेत्यांनी संघटनकौशल्याच्या बळावर आपापली ताकद निर्माण केली. जिल्हा परिषद, जिल्हा बँक, गोकुळ, कोल्हापूर बाजार समिती, शेतकरी संघामध्ये मंत्री मुश्रीफ व आमदार कोरे यांनी हातात हात घालून काम करत आपलेच वर्चस्व कायम राखले. पण, नगरपालिका निवडणुकीत कोरे यांनी गडहिंग्लजमध्ये लक्ष घातले.

वाचा : ‘त्या’ दूध संस्थांना वगळून निवडणूक घ्या, दुग्ध विभागाकडे बेलवाडे यांची मागणी मुश्रीफ यांच्या पारंपरिक विरोधक स्वाती कोरे यांना सोबत घेत थेट नगराध्यक्षपदाच्या उमेदवारासमोर आव्हान उभे केले. येथूनच दोघांमध्ये मतभेद वाढत गेले. त्या रागातून मुश्रीफ यांनी पन्हाळा, शाहूवाडी, हातकणंगले तालुक्यांत ताकद लावली आणि पन्हाळा, शाहूवाडीत काेरे यांना फटका बसला. दोन्ही नेत्यांमध्ये शह-काटशहाचे राजकारण सुरू झाले असून, भाजपने आमदार कोरे यांना पुढे करून मंत्री मुश्रीफ यांना रोखण्याचा प्रयत्न सुरू केला आहे.

भटकता आत्मा..जिल्हा परिषदेत मुश्रीफ यांचा सत्तेचा दावा मोडून काढण्यासाठी मंत्री चंद्रकांत पाटील यांनी कोरे यांना हाताशी धरले आहे. जनसुराज्य व भाजप म्हणजे दोन शरीरे असली तरी आत्मा एकच आहे, असे विधान मंत्री पाटील यांनी केले होते. मग तसे असेल तर कोल्हापूर महापालिका निवडणुकीत हा आत्मा कुठे भटकायला गेला होता, अशी खोटक टीका मुश्रीफ यांनी केली आहे. महापालिकेला जनसुराज्यच्या उमेदवारांचा फटका राष्ट्रवादीला बसला आहे.

अलिखित करार...मंत्री हसन मुश्रीफ व आमदार कोरे यांच्या मध्ये काहीसा अलिखित करार झाला होता. एकमेकांच्या बालेकिल्ल्यात घुसखोरी करायची नाही. त्यानुसार मुश्रीफ यांनी कधीही पन्हाळा, शाहूवाडी, गगनबावडा तालुक्यांत लक्ष घातले नाही. या मैत्रीतूनच जिल्हा बँकेचे माजी संचालक मानसिंगराव गायकवाड व राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष बाबासाहेब पाटील-आसुर्लेकर यांचे राजकीय नुकसान झाले. दोन्ही नेत्यांमध्ये कमालीची एकवाक्यता होती.

मुश्रीफ-सतेज यांच्या मैत्रीवर आक्षेपमंत्री मुश्रीफ व आमदार सतेज पाटील यांच्यामध्ये अंतर्गत समझोता असून, कोल्हापूर महापालिका व जिल्हा परिषद निवडणूक एकमेकांना पूरक भूमिका घेत असल्याचा आक्षेप भाजपच्या नेत्यांचा आहे. पण, जिल्हा परिषद निवडणुकीत ‘करवीर’, ‘राधानगरी’, ‘हातकणंगले’, ‘शिरोळ’, ‘गडहिंग्लज’मध्ये राष्ट्रवादी व काँग्रेस एकमेकांविरोधात लढली आहे.गोकुळ’च्या राजकारणावर परिणाम शक्यमुश्रीफ-कोरे यांच्यात ताणलेल्या संबंधाचे परिणाम आगामी राजकारणावर उमटणार हे निश्चित आहे. ‘गोकुळ’मध्ये गेली अनेक वर्षे एकत्र असणारे हे दोन्ही नेते आता काय भूमिका घेतात, याकडे जिल्ह्याचे लक्ष आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Kolhapur Politics: Rift between Mushrif and Kore may affect Gokul.

Web Summary : Growing differences between Minister Mushrif and MLA Kore could impact Kolhapur's political landscape, especially affecting 'Gokul' dairy politics. Their strained relationship stems from local election clashes.