आशा वर्कर्सना दिलेले कार्यमुक्तीचे पत्र रद्द

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 7, 2020 06:02 PM2020-12-07T18:02:37+5:302020-12-07T18:05:18+5:30

Zp, Morcha, Kolhapurnews आशा वर्कर्सनी जर क्षयरोग आणि कुष्ठरुग्ण सर्वेक्षणामध्ये सहभाग घेतला नाही, तर त्यांना कार्यमुक्त करण्याचा इशारा देणारे पत्र रद्द करण्यात आले आहे.

Dismissal letter issued to Asha workers canceled | आशा वर्कर्सना दिलेले कार्यमुक्तीचे पत्र रद्द

आशा वर्कर्सना दिलेले कार्यमुक्तीचे पत्र रद्द

googlenewsNext
ठळक मुद्देआशा वर्कर्सना दिलेले कार्यमुक्तीचे पत्र रद्दजिल्हा परिषदेसमोर दोन तास रास्ता रोको

कोल्हापूर : आशा वर्कर्सनी जर क्षयरोग आणि कुष्ठरुग्ण सर्वेक्षणामध्ये सहभाग घेतला नाही, तर त्यांना कार्यमुक्त करण्याचा इशारा देणारे पत्र रद्द करण्यात आले आहे.

कोल्हापूर जिल्हा आशा वर्कर्स व गटप्रवर्तक युनियन यांच्यावतीने हे पत्र रद्द करण्याबरोबरच अन्य मागण्यांसाठी सोमवारी दुपारी जिल्हा परिषदेसमोर दोन तास रास्ता रोको करण्यात आला. यावेळी घोषणा देत हा परिसर दणाणून सोडण्यात आला.

राज्यामध्ये क्षयरोग, कुष्ठरोग सर्वेक्षण सुरू करण्यात आले आहे. मात्र, आधीचेच मानधन मिळालेले नसल्याने या सर्वेक्षणावर आशा वर्कर्स आणि गटप्रवर्तक यांनी बहिष्कार घातला होता. जिल्हा परिषदेसमोर आंदोलन करण्याची घोषणाही केली होती.

 

Web Title: Dismissal letter issued to Asha workers canceled

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.