शहरं
Join us  
Trending Stories
1
Narendra Modi : "चार जूनला इंडिया आघाडीची एक्सपायरी डेट"; नरेंद्र मोदींचं टीकास्त्र
2
"मनी... मसल्स... महाराष्ट्र...; अदृश्य शक्तीमुळं नात्याला गालबोट लागलं"! काय म्हणाल्या सुप्रिया सुळे?
3
"काँग्रेसला राम मंदिराबाबतचा न्यायालयाचा निर्णय बदलायचा आहे", भाजपा नेत्याचा दावा
4
Mumbai Indians ने केलेल्या पराभवानंतर काव्या मारनच्या SRH ला सतावत आहेत 'या' 3 चिंता
5
लोकसभा निवडणुकीत भाजप 400 जागा का मागत आहे? खुद्द पीएम मोदींनी सांगितले...
6
"आम्ही गांधींचा भारत स्वीकारला होता, मोदींचा भारत नाही", फारुख अब्दुल्लांचा भाजपावर हल्लाबोल
7
इंडिया आघाडी घटनेत बदल करून मुस्लिमांना आरक्षण देणार? लालूप्रसाद यादव यांच्या विधानावर भाजपाचा पलटवार
8
"देशात 'व्होट जिहाद' चालणार की 'राम राज्य'? आपल्याला ठरवायचे आहे"; PM मोदींचा काँग्रेसवर हल्लाबोल
9
दीपिकाच्या प्रेग्नंसीदरम्यान रणवीर सिंहने डिलीट केले लग्नाचे Photos, चाहते संभ्रमात
10
Narendra Modi : "इंडिया आघाडीच्या नेत्याने जनावरांचा चारा खाल्ला"; मोदींचा लालू प्रसाद यादवांना खोचक टोला
11
“महाराष्ट्रात भाजपाचे मोदी कार्ड फोल ठरले, कर्मठ ठाकरे सैनिक हद्दपार करतील”: रमेश चेन्निथला
12
धक्कादायक! धाराशिव जिल्ह्यात मतदान केंद्राबाहेर तरुणांचा राडा, वादातून एकाचा खून
13
मनात धाकधूक की राजकीय खेळी? सुप्रियाताई अचानक अजितदादांच्या घरी का गेल्या?; बारामतीत तर्कवितर्क
14
अरविंद केजरीवाल यांना दुहेरी धक्का; सुप्रीम कोर्टाचा दिलासा नाही, कोठडी २० मेपर्यंत वाढवली
15
उमेदवारी न मिळालेले शिंदें गटातील खासदार राजेंद्र गावित भाजपात, देवेंद्र फडणवीस म्हणाले...
16
किरण सामंत नॉट रिचेबल, ठाकरे गटाने केली पोलीस संरक्षण देण्याची मागणी, उदय सामंतांनी दिलं असं स्पष्टीकरण
17
Closing Bell: सेन्सेक्स-निफ्टी पुन्हा घरसला, ३ दिवसांत गुंतवणूकदारांचे ११ लाख कोटी बुडाले
18
'हीरामंडी'मधील शेखर सुमनसोबतच्या इंटीमेट सीनवर मनीषा कोईरालानं सोडलं मौन, म्हणाली...
19
गुजरातमधील नवसारी मतदारसंघात मराठीचाच 'आवाssज', मताधिक्य पाहून व्हाल अवाक्
20
₹१४४ वर आलेला IPO; आता शेअरनं पकडल रॉकेट स्पीड, ४ दिवसांपासून लागतंय अपर सर्किट

चंद्रकांत पाटील यांच्या अतिशयोक्तिपूर्ण वक्तव्यांची चर्चा- स्वत:च्याच जिल्ह्यात युतीला झटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 25, 2019 11:16 AM

राज्यात युतीच्या २५० जागा येणार, कोल्हापूरच्या युतीच्या १० ही जागा निवडून येणार, कोथरूडला दीड लाखावर लीड घेणार, अशी भाषणे पाटील यांनी केली होती; परंतु यातील त्यांचे एकही म्हणणे खरे ठरले नाही.

ठळक मुद्देभाजपने दोन्ही जागा गमावल्या

कोल्हापूर : भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांची अतिशयोक्तिपूर्ण वक्तव्ये, परिणामी चवताळून उठलेली राष्ट्रवादी कॉँग्रेस, कोल्हापूर जिल्ह्यातच शिवसेनेला दणका देण्यासाठी ‘जनसुराज्य’चा वापर या सगळ्यांमध्ये प्रदेशाध्यक्षांच्या जिल्ह्यातच युतीला जोरदार झटका बसला असून, भाजपनेही आपल्या दोन्ही जागा गमावल्या आहेत.

गेल्या लोकसभेच्या निवडणुकीपासून चंद्रकांत पाटील यांनी शरद पवार यांना ‘लक्ष्य’ करून आपली जाहीर मते मांडली आहेत. त्यामुळेच ‘आधी लोकांतून निवडून या’ हे पवारांचे आव्हान स्वीकारण्यासाठी पाटील कोथरूडमधून उभे राहिले. परिणामी त्यांचे जिल्ह्याकडे दुर्लक्ष झाले, ही वस्तुस्थिती आहे.

राज्यात युतीच्या २५० जागा येणार, कोल्हापूरच्या युतीच्या १० ही जागा निवडून येणार, कोथरूडला दीड लाखावर लीड घेणार, अशी भाषणे पाटील यांनी केली होती; परंतु यातील त्यांचे एकही म्हणणे खरे ठरले नाही. उलट त्यांच्या या वक्तव्यांमुळे शरद पवार यांना सहानुभूती मिळत गेल्याचे चित्र आले.

कोल्हापूर जिल्ह्यात विनय कोरे यांच्या ‘जनसुराज्य’च्या खांद्यावर बंदूक ठेवून तीन मतदारसंघांमध्ये बंडखोरी करण्यासाठी भाजपने बळ दिल्याची उघड चर्चा आहे. शाहूवाडी मतदारसंघामध्ये जनसुराज्यचे डॉ. विनय कोरे स्वत: निवडून आले. चंदगडमध्ये भाजपकडे उमेदवारी मागणारे शिवाजी पाटील, अशोक चराटी, रमेश रेडेकर रिंगणात राहिले. परिणामी मतविभागणी झाली आणि येथे राष्ट्रवादीचे राजेश पाटील विजयी झाले. राष्ट्रवादीच्या तत्कालीन आमदार संध्यादेवी कुपेकर यांच्या कन्या डॉ. नंदाताई यांना वेळीच भाजपमध्ये घेऊन जोडणी घातली असती तर कदाचित येथे वेगळा निकाल लागला असता.

कोल्हापूर उत्तरमध्ये शिवसेनेचे आमदार व राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेक्ष क्षीरसागर यांच्याविरोधात सुरुवातीला कोणी उभारायला तयार नव्हते. मात्र घरात पत्नी भाजपची नगरसेविका आणि भाऊ भाजपचा नगरसेवक असलेल्या उद्योजक चंद्रकांत जाधव पंधरवड्यात कॉँग्रेसची उमेदवारी घेतात काय आणि निवडून येतात काय ? जाधव यांना सार्वत्रिक पाठबळ मिळाल्याचे हे द्योतक आहे.

तर दक्षिणमध्ये भाजपचे अमल महाडिक ज्या मतांच्या फरकाने पराभूत झाले ते पाहता, या ठिकाणी शिवसेनेचे खासदार संजय मंडलिक यांनी चंद्रकांत पाटील यांनी त्यांना दिलेला इशारा फारसा गांभीर्याने घेतला नसल्याचे स्पष्ट झाले आहे. थोडक्यात, एकीकडे पाटील कोथरूडमधून लढत असताना त्यांच्याविरोधात सुरुवातीला वातावरण तयार केले गेल्याने त्यांना तेथून हलता येईना. परिणामी कोल्हापूर जिल्ह्यात जिथे-तिथे ज्यांनी-त्यांनी सोयीच्या भूमिका घेतल्या आणि भाजप-शिवसेना युती व्हावी म्हणून आग्रही असणाऱ्या चंद्रकांत पाटील यांच्याच जिल्ह्यात युतीला केवळ एका जागेवर समाधान मानावे लागले.भाजपची सत्त्वपरीक्षापक्ष वाढविण्यासाठी घेतलेले नेते पक्ष सोडून गेले. दोन आमदारही पराभूत झाले. त्यामुळे केंद्रात आणि राज्यात सत्ता असूनही कोल्हापूर जिल्ह्यात युतीची वाईट हालत झाली. शिवसेनेची किमान प्रत्येक तालुक्यात ताकद तरी आहे. नवे घेतलेले बरोबर राहिले नाहीत आणि जुने भाजप कार्यकर्ते नाराज अशा परिस्थितीत आता भाजपला पुन्हा नव्याने सुरूवात करावी लागणार आहे आणि अर्थात ही सर्व जबाबदारी पुन्हा चंद्र्रकांत पाटील यांच्यावरच पडणार आहे. 

टॅग्स :kolhapurकोल्हापूरchandrakant patilचंद्रकांत पाटीलVidhan Parishad Electionविधान परिषद निवडणूक