महाराष्ट्र सदनातील विसंगत पुतळ्यांबाबत शाहू छत्रपती, शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्यात चर्चा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 17, 2026 17:04 IST2026-03-17T17:03:53+5:302026-03-17T17:04:28+5:30

मुख्यमंत्र्यांकडे मुंबईत बैठक घेण्याची मागणी : शिव शाहू संघटनेचेही निवेदन

Discussion between Shahu Chhatrapati and Shivendrasinh Raje Bhosale regarding the inconsistent statues in Maharashtra Sadan | महाराष्ट्र सदनातील विसंगत पुतळ्यांबाबत शाहू छत्रपती, शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्यात चर्चा

महाराष्ट्र सदनातील विसंगत पुतळ्यांबाबत शाहू छत्रपती, शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्यात चर्चा

कोल्हापूर : राजर्षी छत्रपती शाहू महाराज आणि महाराष्ट्राचे शिल्पकार यशवंतराव चव्हाण यांच्या व्यक्तिमत्त्वाशी विसंगत असलेले दिल्लीतील पुतळे बदलावेत, याबाबत कोल्हापूरचे खासदार शाहू छत्रपती यांनी सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्याशी रविवारी चर्चा केली. आता याबाबत मुंबईतच बैठक घ्यावी, अशी मागणी उद्धवसेनेचे सहसंपर्कप्रमुख विजय देवणे यांनी केली आहे.

हे विसंगत पुतळे बदलण्याबाबत आता खासदार शाहू छत्रपती यांनीच पुढाकार घेतला आहे. त्यानुसार एका विवाह समारंभासाठी रविवारी आलेल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी या विषयावर चर्चा करण्याचेही ठरले होते; परंतु मुख्यमंत्र्यांना येण्यास विलंब झाल्यामुळे ही चर्चा झाली नाही; परंतु शाहू छत्रपती यांनी दिल्लीतील महाराष्ट्र सदन ज्या विभागाअंतर्गत येते त्या सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांना हा विषय सांगितला. यावेळी भोसले यांनी मुंबईतील वरिष्ठ अधिकाऱ्यांशी याबाबत चर्चा करणार असल्याचे स्पष्ट केले.

Web Title : शाहू छत्रपति ने भोसले के साथ महाराष्ट्र सदन में विसंगत मूर्तियों पर चर्चा की

Web Summary : सांसद शाहू छत्रपति ने दिल्ली के महाराष्ट्र सदन में विसंगत मूर्तियों को बदलने पर मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले के साथ चर्चा की। उद्धव सेना ने मुंबई में बैठक का अनुरोध किया। भोसले मुंबई के अधिकारियों के साथ चर्चा करेंगे।

Web Title : Shahu Chhatrapati Discusses Mismatched Statues at Maharashtra Sadan with Bhosale

Web Summary : MP Shahu Chhatrapati discussed replacing mismatched statues at Delhi's Maharashtra Sadan with Minister Shivendrasinharaje Bhosale. Uddhav Sena requests a Mumbai meeting. Bhosale will discuss with Mumbai officials.