वंचित मुलांनी पाहिला ‘द लायन किंग’, ‘रॉबिन हुड आर्मी’चा उपक्रम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 3, 2019 11:36 IST2019-08-03T11:34:35+5:302019-08-03T11:36:30+5:30
‘रॉबिन हुड अकॅडमी’च्या वतीने गरीब पण शिक्षणासाठी संघर्ष करणाऱ्या १२० मुला-मुलींना ‘द लायन किंग’ हा चित्रपट दाखविण्यात आला. मोठ्या मॉलमधील चकाकणाऱ्यां वातावरणात चित्रपट पाहताना या मुलांच्या चेहºयावर आनंद, उत्साह आणि कुतूहलाचे भाव उमटले.

कोल्हापूर येथील रॉबीन हुड आर्मीतर्फे वंचित मुलांना ‘लायन किंग’ चित्रपट दाखविण्यात आला.
कोल्हापूर : ‘रॉबिन हुड अकॅडमी’च्या वतीने गरीब पण शिक्षणासाठी संघर्ष करणाऱ्या १२० मुला-मुलींना ‘द लायन किंग’ हा चित्रपट दाखविण्यात आला. मोठ्या मॉलमधील चकाकणाऱ्यां वातावरणात चित्रपट पाहताना या मुलांच्या चेहºयावर आनंद, उत्साह आणि कुतूहलाचे भाव उमटले.
‘रॉबिन हुड आर्मी’च्या वतीने देशभरातील २२ शहरांमध्ये जवळपास २२०० विद्यार्थ्यांना एकाचवेळी हा चित्रपट दाखविण्यात आला. मुलांसाठी हा अविस्मरणीय क्षण होता. त्यांच्या आनंदाला पारावारच उरला नाही. चित्रपटगृहाच्या आजूबाजूचे वातावरण बघून ही मुले कावरीबावरी झाली होती.
सर्व रॉबिन्सनी (कार्यकर्ते) त्यांना सांभाळून घेत त्यांच्यासोबत हा चित्रपट अनुभवला. या मुलांना नेण्या-आणण्यापासून ते चित्रपट पाहिल्यानंतर खाण्यापिण्याची चोख व्यवस्था पार पाडण्यात आली. या निमित्ताने वंचित, गरीब आणि होतकरू मुलांचा आनंद द्विगुणीत झाला.
बॅग आॅफ होपचे वितरण
स्वातंत्र्यदिनानिमित्त १५ आॅगस्ट रोजी संस्थेतर्फे गरजू कुटुंबांच्या चरितार्थाची साधने दिली जातात. यंदा देशातील ५० लाख गरजूंना बॅग आॅफ होपद्वारे धान्य पोहोचविण्यात येणार आहेत. यात पाच किलो तांदुळ, पाच किलो आटा, एक किलो दाळ व एक किलो तेल देण्यात येणार आहे. नागरिकांना या अभियानात सहभागी व्हायचे असेल, तर त्यांनी १० तारखेच्या आत ९५९५८५८१८० या व्हॉटस अॅप क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.