कोल्हापूर : पोलीस दलात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल शाहूपुरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्रीकृष्ण कटकधोंड, पोलीस उपनिरीक्षक अमित पाटील, विजय मस्कर यांच्यासह २५ जणांना पोलीस महासंचालक पदक जाहीर झाले. त्यामध्ये तीन अधिकारी व २२ पोलीस कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. महाराष्ट्र दिनाच्या पूर्वसंध्येला शुक्रवारी ही पदके जाहीर झाली. महापुराची नैसर्गिक आपत्ती, उल्लेखनीय कामगिरी व राष्ट्रीय स्तरावरील खेळांमध्ये प्रावीण्यासह पोलीस दलात पंधरा वर्षे उल्लेखनीय कार्य करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.
पोलीस अधिकाऱ्यांच्या उल्लेखनीय कार्यकर्तृत्वाची दखल घेऊन त्यांना पोलीस महासंचालक संजय पांडे यांनी शुक्रवारी सायंकाळी सन्मानचिन्ह जाहीर केले.
२३ पोलीस कर्मचाऱ्यांनाही पदके
पोलीस दलात १५ वर्षे सतत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या २२ पोलीस कर्मचाऱ्यांनाही पोलीस महासंचालक पदक जाहीर झाले. त्यामध्ये सहायक फौजदार : काशीनाथ धुळे, शाम बुचडे, पोलीस हवालदार : विजय पाटील, शरद पोरे, दिलीप कांबळे, प्रकाश संकपाळ, सतीश चौगुले, संजय पडवळ, उत्तम सडोलीकर, लक्ष्मण धायगुडे, सचिन लोहार, सुनील तिबोले, नानासाहेब थोरात, हरी पाटील, भारत कांबळे, सतीश कुरणे, मीनाक्षी पाटील, पोलीस नाईक : विशाल साळोखे, सतीश कुरणे, अमित सातार्डेकर, चालक : रफीक आवळकर, पोलीस शिपाई : सोनाली देसाई, अमृत तिवले यांचा समावेश आहे.
पोरे यांची उल्लेखनीय कामगिरी अशी,
पोरे हे १९९७ साली पोलीस शिपाई म्हणून भरती झाले. सध्या लाचलुचपत विभागात हवालदार म्हणून कार्यरत आहेत. आजअखेर त्यांनी आव्हानात्मक असणारे दोन खुनाचे गुन्हे उघडकीस आणले आहेत. तपास केलेल्या बलात्काराच्या गुन्ह्यातील आरोपीस जन्मठेपेची शिक्षा दिली आहे, तर जातिवाचक गुन्ह्यातील १२ आरोपींना न्यायालयाने शिक्षा दिली आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागात काम करताना ३५ कारवाईत सहभाग घेतला आहे.
फोटो : ३००४२०२१-कोल-शरद पोरे (पोलीस)
फोटो : ३००४२०२१-कोल-सतीश चौगुले (पोलीस)
फोटो : ३००४२०२१-कोल-शाम बुचडे(पोलीस)
फोटो : ३००४२०२१-कोल-रफीक आवळकर(पोलीस)
फोटो : ३००४२०२१-कोल-उत्तम सडोलीकर (पोलीस)
फोटो : ३००४२०२१-कोल-श्रीकृष्ण कटकधोंड (पोलीस)