कोल्हापुरातील कळंबा जेलमधील तुरुंग अधिकाऱ्यासह पाच पोलिसांना महासंचालक पदक

By उद्धव गोडसे | Updated: April 29, 2023 15:53 IST2023-04-29T15:52:32+5:302023-04-29T15:53:15+5:30

अत्यंत कमी मनुष्यबळ उपलब्ध असतानाही कारागृहातील कायदा सुव्यवस्था टिकवण्यासाठी केलेल्या प्रयत्नांची दखल वरिष्ठ कार्यालयाकडून घेण्यात आल्याची भावना कारागृह अधीक्षकांनी व्यक्त केली

Director General medal to five policemen including a jail officer in Kalamba Jail Kolhapur | कोल्हापुरातील कळंबा जेलमधील तुरुंग अधिकाऱ्यासह पाच पोलिसांना महासंचालक पदक

कोल्हापुरातील कळंबा जेलमधील तुरुंग अधिकाऱ्यासह पाच पोलिसांना महासंचालक पदक

कोल्हापूर : महाराष्ट्र दिनाच्या पार्श्वभूमीवर अपर पोलिस महासंचालक व महानिरीक्षक (कारागृह व सुधारसेवा) यांच्या वतीने कारागृहातील अधिकारी आणि कर्मचा-यांसाठी प्रशंसनीय सेवेबद्दल सन्मानचिन्ह जाहीर करण्यात आले. यात कळंबा मध्यवर्ती कारागृहातील तुरुंग अधिकारी चंद्रशेखर मारोतराम देवकर यांच्यासह पाच पोलिसांचा समावेश आहे.

सातत्याने उल्लेखनीय सेवा बजावल्याबद्दल सुभेदार विजय पांडुरंग कुंभार, पोलिस शिपाई श्रीधर हरी कुंभार, इजाज अब्दुलरहीम शेख आणि रुपेंद्र बाळू कोळी यांना महासंचालक पदकाने गौरविण्यात आले आहे. प्रभारी कारागृह अधीक्षक पांडुरंग भुसारे यांच्यासह अन्य अधिका-यांनी पदक विजेत्या पोलिसांचे अभिनंदन केले. सोमवारी (दि. १) होणाऱ्या समारंभात पदक प्रदान करण्यात येणार आहेत.

गेल्या काही महिन्यांपासून कैद्यांधील संघर्ष, गांजा आणि मोबाइल सापडण्याच्या घटनांमुळे कळंबा कारागृह चर्चेत आहे. मात्र, अत्यंत कमी मनुष्यबळ उपलब्ध असतानाही कारागृहातील कायदा सुव्यवस्था टिकवण्यासाठी केलेल्या प्रयत्नांची दखल वरिष्ठ कार्यालयाकडून घेण्यात आल्याची भावना कारागृह अधीक्षकांनी व्यक्त केली.

Web Title: Director General medal to five policemen including a jail officer in Kalamba Jail Kolhapur