ज्येष्ठ दिग्दर्शक चंद्रकांत जोशी यांचे निधन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 20, 2021 20:05 IST2021-12-20T15:44:21+5:302021-12-20T20:05:10+5:30

कोल्हापुरातील कलासृष्टीचे अर्ध्वयू चंद्रकांत दत्तात्रय जोशी यांचे आज, सोमवारी सायंकाळी निधन झाले. प्रसिद्ध अभिनेते ऋषीकेश जोशी यांचे चे वडील होत.

director Chandrakant Joshi passes away | ज्येष्ठ दिग्दर्शक चंद्रकांत जोशी यांचे निधन

ज्येष्ठ दिग्दर्शक चंद्रकांत जोशी यांचे निधन

कोल्हापूर : ज्येष्ठ सिनेदिग्दर्शक, चित्रकार व कलामहर्षि बाबूराव पेंटर फिल्म सोसायटीचे अध्यक्ष, कोल्हापुरातील कलासृष्टीचे अर्ध्वयू चंद्रकांत दत्तात्रय जोशी यांचे सोमवारी सायंकाळी निधन झाले. वयाच्या ७८ वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. प्रसिद्ध अभिनेते ऋषीकेश जोशी यांचे चे वडील होत.

सुमित्रा भावे स्मृती महोत्सवात व्यस्त असताना रविवारी अचानक चक्कर आल्याने खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. पण ब्रेन डेड झाल्याने ते कोम्यात गेले. उद्या, मंगळवारी (दि.२१) सकाळी साडे नऊ वाजता महाद्वार रोड येथील घरापासून अंत्ययात्रा निघणार आहे.

कोल्हापुरच्या सिने आणि कलासृष्टीचा चालत बोलता इतिहास आणि जगभरातील समांतर, कलात्मक आणि वेगळा विचार मांडणाऱ्या चित्रपटांना फिल्म फेस्टिवलच्या माध्यमातून रसिकांपर्यंत पोहोचवणारे चंद्रकांत जोशी यांच्या निधनाने सिने-सांस्कृतिक चळवळीची न भरून निघणारी हानी झाली आहे.

Web Title: director Chandrakant Joshi passes away