शहरं
Join us  
Trending Stories
1
सनरायझर्स हैदराबादने ९.४ षटकांत कुटल्या विजयी १६७ धावा, Mumbai Indians चे आव्हान संपुष्टात आणले
2
Chandrayaan-3 नं इतिहास रचला; आता चंद्रासंदर्भात आली आणखी एक आनंदाची बातमी! जाणून घ्या, काय सापडलं?
3
१६७ धावा, ९.४ षटकं, १६ चौकार, १४ षटकार! SRH चा चमत्कार, अभिषेक-ट्रॅव्हिस यांनी मोडला १६ वर्षांपूर्वीचा विक्रम
4
शरद पवारांकडे पक्ष विलिनीकरणाशिवाय पर्याय नाही; चंद्रशेखर बावनकुळे यांची खरमरीत टीका
5
माझे शब्दच हरवले आहेत, ही काल्पनिक फलंदाजी; बेक्कार हरल्यानंतर KL Rahul ला काहीच सूचेना
6
आमदाराच्या स्वीय्य सहाय्यकाच्या अपघाती मृत्यू प्रकरणी ट्रकचालकास अटक व सुटका
7
दर्यापुरात टोळक्याचा धुमाकूळ; अमरावती मार्गावर चालत्या वाहनांवर दगडफेक
8
भारतीय अर्थव्यवस्था 8% दराने वाढणार; देशाच्या मुख्य आर्थिक सल्लागारांनी व्यक्त केला विश्वास
9
'इंडिया' आघाडी भ्रष्टाचारी; भाजपकडे नेता, नीती अन् विकासाचा कार्यक्रम तयार: अमित शाह
10
ट्रॅव्हिड हेडने कुटल्या १२ चेंडूंत ५८ धावा! अभिषेक शर्मासह ३६ चेंडूंत फलकावर चढवल्या १०७ धावा
11
महा-बीसीए, बीबीए, एमसीए, एमबीए CET प्रवेश परीक्षा २९ मे रोजी; सुधारित वेळापत्रक जाहीर
12
भारताच्या लोकसंख्येत हिंदू 6 टक्क्यांनी घटले, मुस्लीम समाजाचा टक्का वाढला; सरकारी पॅनलनं केला 65 वर्षांचा अभ्यास
13
Air India ने 80 उड्डाणे रद्द केल्याबद्दल मागितली प्रवाशांची माफी; तिकीटाचे पैसेही परत करणार...
14
काँग्रेसची धुळधाण हीच खरी देशभक्ती; एकनाथ शिंदेंची संगमनेरात जोरदार टीका
15
मी दक्षिण भारतातील असून भारतीय दिसते; अभिनेत्रीचं सॅम पित्रोदांना चोख प्रत्युत्तर
16
इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेत नोकरीची संधी, 'या' तारखेपूर्वी उमेदवार करू शकतात अर्ज
17
लखनौला बसले धक्के; भुवीच्या चेंडूवर नितीश रेड्डी, सनवीर सिंग यांनी अविश्वसनीय झेल टिपले 
18
मोदीजी घाबरलात का? तुम्हाला कसं माहिती अदानी-अंबानी टेम्पोतून पैसे देतात? राहुल गांधींची टीका
19
CM केजरीवालांना तुरुंगात ऑफिस सुरू करण्यासाठी याचिका; कोर्टाने ठोठावला 1 लाखाचा दंड
20
"ते स्वतःच माणसासारखे कमी अन् पक्ष्यासारखे जास्त दिसतात..."; सॅम पित्रोदांच्या वक्तव्यावर कंगना भडकली 

थेट पाईपलाईनची श्वेतपत्रिका की माहितीपुस्तिका?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 17, 2019 11:42 PM

थेट पाईपलाईन योजना रखडण्यास ठेकेदार कंपनी आणि कन्सल्टंट कंपनी जबाबदार आहे; शिवाय योजनेला दोनवेळा मुदतवाढ देऊनही फक्त ६५ टक्केकाम पूर्ण झाल्याचा ठपका प्रशासनाने जाहीर केलेल्या २२ पानांच्या माहितीपत्रिकेत ठेवला आहे.

ठळक मुद्दे कोल्हापूर महापालिकेस आणखी ९६ कोटींचा हिस्सा भरावा लागणारआजच्या महासभेत होणार गदारोळ :

कोल्हापूर : थेट पाईपलाईन योजना रखडण्यास ठेकेदार कंपनी आणि कन्सल्टंट कंपनी जबाबदार आहे; शिवाय योजनेला दोनवेळा मुदतवाढ देऊनही फक्त ६५ टक्केकाम पूर्ण झाल्याचा ठपका प्रशासनाने जाहीर केलेल्या २२ पानांच्या माहितीपत्रिकेत ठेवला आहे. ही माहितीपत्रिका शनिवारी (दि. १६) रात्री महापौरांना देण्यात आली. तिच्या प्रती रविवारी सायंकाळी नगरसेवकांच्या हाती पडल्या. योजनेसाठी आतापर्यंत ३११ कोटी खर्च केले आहेत. शिल्लक निधी पाहता या योजनेसाठी महानगरपालिकेस आणखी ९६ कोटी रुपयांचा हिस्सा भरावा लागणार आहे. ठेकेदाराने काम वेळेत न केल्याने त्याच्या दंडात वाढ करण्याचा प्रस्ताव आहे; पण मागणी केली श्वेतपत्रिकेची आणि हाती आली माहितीपत्रिका अशी अवस्था नगरसेवकांची झाली असून, त्यावरून आज, सोमवारी होणारी महानगरपालिकेची सर्वसाधारण सभा वादळी होणार आहे.

चार दिवसांपूर्वी महापालिकेच्या विशेष सभेत थेट पाईपलाईनची श्वेतपत्रिका प्रसिद्ध करण्यावरून सभागृहात गोंधळ माजला होता; पण पाणीपुरवठा विभागाने श्वेतपत्रिकाऐवजी माहितीपत्रिका तयार केली आहे. त्यामध्ये या थेट पाईपलाईन योजनेवर आतापर्यंत ३११.४० कोटी रुपये खर्च करण्यात आला असून, सुमारे ७४ कोटी, ३३ लाख रुपये निधी शिल्लक असल्याचे दर्शविले आहे. सुमारे ४२५ कोटींच्या योजनेसाठी महापालिकेस १४८ कोटी रुपयांचा निधी उभा करण्याची जबाबदारी होती. त्यापैकी ५२ कोटी निधी केंद्रीय वित्त आयोगामधून समाविष्ट केला आहे; तर अजून ९६.२३ कोटी निधीचा हिस्सा महापालिकेला भरावा लागणार आहे.या जाहीर केलेल्या माहितीपत्रिकेमध्ये इंटकवेलसह इतर माहिती सविस्तर प्रसिद्ध केली आहे.पाईपलाईनची रखडलेली कामे- धरणक्षेत्रातील पाणीपातळी मार्च २०१८ पासून पाणी उपसा करूनही आतापर्यंत ४३ मीटर खोल खुदाईचे काम पूर्ण झाले असून, अद्याप तीन मीटर खुदाईकाम अपूर्ण आहे.- पाटबंधारे विभागाच्या कालव्याच्या हद्दीत ७९० मीटर लांबीची पाईपलाईन घालण्याचे काम बाकी आहे.- काळम्मावाडी गावातील ८०० मीटर लांबीचे पाईपलाईन काम पूर्ण झालेले नाही.- सोळांकूर ग्रामस्थांच्या विरोधामुळे सुळवी ते सोळांकूर कॅनॉलपर्यंत ३.७० कि.मी. लांबीच्या पाईपलाईनचे काम अपूर्ण आहे.- कपिलेश्वर ग्रामस्थ व सरपंच यांनी पाईपलाईन अन्य मार्गाने घालण्याचा आग्रह केल्यामुळे ८५० मीटर लांबीच्या पाईपलाईनचे काम अपूर्ण आहे.कामासाठी मुदतवाढ- ठेकेदारास प्रथम मुदतवाढ : ३१ मे २०१८ पर्यंत प्रतिदिन ५००० रुपये दंड.-द्वितीय मुदतवाढ : ३१ डिसेंबर २०१९ पर्यंत प्रतिदिन ५० हजार रुपये दंड.- द्वितीय मुदतीत वाढीच्या कालावधीत कामाची प्रगती विचारात घेऊन, दंडाच्या रकमेत वाढ करण्याची अट आहे. त्यानुसार वाढीव दंड आकारणी प्रस्ताव सादर करण्यात येणार आहे. 

 

टॅग्स :water transportजलवाहतूकkolhapurकोल्हापूर