शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur: थेट पाईपलाईनचे पाणी सोमवारी ‘पुईखडी’वर येणार, आमदार सतेज पाटील यांची माहिती 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 28, 2023 12:26 IST

योजना पूर्ण झाल्याचा आनंद

कोल्हापूर : गेल्या अनेक वर्षांचे कोल्हापूरकरांचे स्वप्न असलेल्या काळम्मावाडी थेट पाईपलाईन योजना पूर्ण झाली असून, योजनेचे पाणी नव्याने घालण्यात आलेल्या जलवाहिनीतून सोमवारी पुईखडी येथील जलशुद्धीकरण केंद्रात येईल, अशी माहिती माजी पालकमंत्री आमदार सतेज पाटील यांनी शुक्रवारी पत्रकारांना दिली. ‘योजनेच्या मंजुरीसाठी तसेच पूर्ततेसाठी राजकीय ताकद पणाला लावली होती, त्यामुळे योजना पूर्ण झाल्याचा मनस्वी आनंद आहे, अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या.आमदार सतेज पाटील, आमदार ऋतुराज पाटील, आमदार जयश्री जाधव यांनी महापालिका सभागृहातील काँग्रेसच्या माजी नगरसेवकांसमवेत गुरुवारी पुईखडी जलशुद्धीकरण केंद्रात जाऊन थेट पाईपलाईन योजनेच्या कामाचा आढावा घेतला. तसेच, तेथे उभारण्यात आलेल्या नवीन जलशुद्धीकरण केंद्र तसेच स्काडा यंत्रणा कक्षाची पाहणी केली.काळम्मावाडी धरण क्षेत्रापासून पुईखडी जलशुद्धीकरण केंद्रापर्यंतची जलवाहिनी जोडण्याचे काम पूर्ण झाले आहे. पुईखडी ते कसबा बावडा जलशुद्धीकरण केंद्राला जोडणाऱ्या जलवाहिनीचे कामही पूर्ण होत आले आहे. संपूर्ण योजनेवर तसेच जलवाहिनीच्या कार्यप्रणालीवर नियंत्रण ठेवणाऱ्या अत्याधुनिक स्वयंचलित स्काडा यंत्रणेचे काम वेगाने सुरू आहे. जेव्हा काळम्मावाडी धरणातील पाणी पुईखडी जलशुद्धीकरण केंद्रात येईल, त्यावेळी ही यंत्रणा कार्यान्वित होईल, असे आमदार पाटील यांनी सांगितले.धरणक्षेत्र ते पुईखडी या मार्गावर १८०० एमएम जाडीची स्पायरल वेल्डेड जलवाहिनी, तर पुईखडी ते कसबा बावडा जलशुद्धीकरणपर्यंत ६०० एमएम जाडीची जलवाहिनी घालण्यात आली आहे. नव्या योजनेत ४० एमएलडी क्षमतेचे दोन जलशुद्धीकरण केंद्र उभारण्यात आले असून, जुन्या ६० एमएलडी क्षमतेचे जलशुद्धीकर केंद्रही कार्यान्वित राहणार असल्याचे आमदार पाटील यांनी सांगितले.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरWaterपाणीSatej Gyanadeo Patilसतेज ज्ञानदेव पाटील