शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
9
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
10
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
11
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
12
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
13
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
14
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
15
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
16
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
17
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
18
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
19
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
20
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

डिजिटल अरेस्ट फसवणुकीचा म्होरक्या पुण्यातून ताब्यात, कोल्हापुरातील सेवानिवृत्त प्राध्यापिकेस घातला होता ३ कोटींना गंडा 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 11, 2025 13:31 IST

चौथा संशयित पोलिसांच्या हाती : आणखी काही गुन्ह्यांची उकल होण्याची शक्यता

कोल्हापूर : सेवानिवृत्त प्राध्यापिकेस डिजिटल अरेस्ट करण्याची भीती घालून ३ कोटी ५७ लाखांचा गंडा घालणाऱ्या सायबर भामट्यांच्या टोळीतील म्होरक्याला राजारामपुरी पोलिसांनी मंगळवारी पुण्यातून जेरबंद केले. या गुन्ह्यातील चौथा संशयित पोलिसांच्या हाती लागला असून, त्यांच्याकडून आणखी काही गुन्ह्यांचा उलगडा होण्याची शक्यता आहे. दरम्यान, या टोळीने फसवणूक करून विविध खात्यांवर जमा केलेली रक्कम पुण्यातील बँकांमधून काढल्याची माहिती चौकशीतून समोर येत आहे.मनी लाँड्रिंगच्या गुन्ह्यात सहभाग असल्याची भीती घालून सायबर भामट्यांनी सेवानिवृत्त प्राध्यापिका मीना मुरलीधर डोंगरे (वय ७५, रा. सम्राटनगर, कोल्हापूर) यांना ३ कोटी ५७ लाख रुपयांचा गंडा घातला आहे. याप्रकरणी राजारामपुरी पोलिसांनी गेल्या आठवड्याभरात तीन संशयितांना ताब्यात घेतले होते. त्यांच्या चौकशीतून या गुन्ह्याच्या सूत्रधारापर्यंत पोहोचण्यात पोलिसांना यश आले आहे.

त्याला पुण्यातून ताब्यात घेतले असून, त्यानेच पुण्यातील बँकांमधून पैसे काढल्याचे चौकशीत समोर आले आहे. या गुन्ह्यातील रकमा देशभरातील विविध बँकांमधील खात्यांवर जमा झाल्या होत्या. ते पैसे पुढे पुण्यातील बँकांमध्ये वर्ग करण्यात आले होते. त्यावरून पोलिसांनी संशयितांचा शोध घेतला. यांच्या चौकशीत आणखी काही गुन्ह्यांचा उलगडा होण्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे.

४० सीमकार्डचा वापरया गुन्ह्यात सायबर भामट्यांनी बारा मोबाईल आणि चाळीस सीमकार्डचा वापर केल्याचे पोलिसांच्या चौकशीत समोर आले. सर्व मोबाईल आणि सीमकार्ड पुण्यातील म्होरक्यानेच खरेदी केल्याची कबुली दिली. गुन्ह्यात वापरलेले मोबाईल आणि सीमकार्ड जप्त केले जाणार आहेत, अशी माहिती पोलिसांनी दिली.

हॉटेलमध्ये पोलिस ठाणे, न्यायालयाचा सेटअपपोलिसांनी या गुन्ह्यातील म्होरक्याला ताब्यात घेताच तो राहत असलेल्या पुण्यातील हॉटेलची झडती घेतली. त्यावेळी हॉटेलच्या एका रुममध्ये पोलिस ठाणे आणि न्यायालयाचा सेटअप तयार केल्याचे निदर्शनास आले. पोलिसांनी छापेमारी केली तेव्हाही तिथे फसवणुकीचा प्रकार सुरू होता, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली.

टॅग्स :Puneपुणेkolhapurकोल्हापूरcyber crimeसायबर क्राइमPoliceपोलिस