शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

दिगंबरा, दिगंबरा, श्रीपाद वल्लभ..! कोल्हापूर शहरात दत्त जयंती उत्साहात, मंदिरे भक्तांनी फुलली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 4, 2017 14:46 IST

‘दिगंबरा, दिगंबरा, श्रीपाद वल्लभ दिगंबरा’चा जयघोष, भजन, कीर्तन अशा उत्साही व भक्तिपूर्ण वातावरणात कोल्हापूर शहरात रविवारी दत्त जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. यानिमित्त विविध दत्त मंदिरांवर विद्युत रोषणाई, केळीचे खांब, फुलांच्या माळा लावण्यात आल्या होत्या.

ठळक मुद्देसायंकाळी ६ वाजून १ मिनिटांनी श्री दत्त जन्मकाळ सोहळा, पालखी प्रदक्षिणा विद्युत रोषणाई, दिवसभर कीर्तन,भजन असे धार्मिक कार्यक्रम दत्त दर्शनासाठी भक्तांची दिवसभर गर्दी आज सप्ताहाची सांगता, आज महाप्रसाद

कोल्हापूर : ‘दिगंबरा, दिगंबरा, श्रीपाद वल्लभ दिगंबरा’चा जयघोष, भजन, कीर्तन अशा उत्साही व भक्तिपूर्ण वातावरणात कोल्हापूर शहरात रविवारी दत्त जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. यानिमित्त विविध दत्त मंदिरांवर विद्युत रोषणाई, केळीचे खांब, फुलांच्या माळा लावण्यात आल्या होत्या.

भजन, कीर्तन असे धार्मिक कार्यक्रम होऊन प्रसाद वाटप करण्यात आला. विविध मंदिरांत श्री दत्त जन्मकाळ सोहळा झाला. यावेळी भक्तांनी मंदिरे फुलून गेली होती. शाहू मिलजवळील कोटितीर्थ येथील श्री स्वामी समर्थ मंदिरात दुपारी १२ वाजून ३९ मिनिटांनी श्री दत्त जन्मकाळ सोहळा झाला. दरम्यान, शहरासह उपनगरामधील दत्त मंदिरांतही मोठ्या उत्साहात जयंती साजरी झाली.

कोटितीर्थ येथील श्री स्वामी समर्थ सेवा व आध्यात्मिक विकास बालसंस्कार केंद्र (दिंडोरीप्रणीत) येथे श्री दत्त जयंतीनिमित्त रविवारी सकाळी गुरुचरित्राच्या चौथ्या अध्यायाचे वाचन झाले. यासाठी मोठ्या प्रमाणात भक्तांची गर्दी झाली होती.

दुपारी श्री दत्त जन्मकाळ सोहळा स्वामी समर्थ मंदिरात झाला. त्यानंतर आरती होऊन प्रसाद वाटप करण्यात आला. रविवार पेठ आझाद चौकातील श्री दत्त भिक्षालिंग देवस्थान दत्त मंदिरात पहाटे अभिषेक, सकाळी आरती झाल्यानंतर गुरुचरित्राचे वाचन करण्यात आले. दत्त महाराज यांची अलंकार पूजा बाळासो दादर्णे, हिंमत दादर्णे यांनी बांधली.

यावेळी भक्तांना मसाले दूध, भात वाटप करण्यात आला. सायंकाळी ६ वाजून १ मिनिटांनी श्री दत्त जन्मकाळ सोहळा भक्तांच्या उपस्थितीत झाला. यानिमित्त विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. दिवसभर कीर्तन,भजन असे धार्मिक कार्यक्रम झाले. रात्री पालखी मंदिर प्रदक्षिणा झाली.

त्याचबरोबर गंगावेशमधील श्री कृष्ण सरस्वती दत्त महाराज मंदिर (निजबोध मठी) येथे पहाटे रुद्राभिषेक झाला. सकाळी आरती होऊन प्रसाद वाटप करण्यात आला. दत्त दर्शनासाठी भक्तांची दिवसभर गर्दी होती. सायंकाळी सहा वाजता श्री दत्त जन्मकाळ सोहळा झाला. त्यानंतर रात्री मंदिरापासून भव्य पालखी मिरवणुकीला सुरुवात झाली.

रंकाळावेश बसस्थानक, धोत्री गल्ली, रेगे तिकटीमार्गे निजबोध मठात पालखी आली. दत्त मंदिरातील दत्त सोहळा पाहण्यासाठी भाविकांसाठी मंदिराबाहेर भव्य स्क्रीनची सोय केली होती. त्याचबरोबर रुईकर कॉलनी महाडिक वसाहत, फुलेवाडी दत्त मंदिर, गंगावेशतील दत्त गल्लीमधील दत्त मंदिरांसह विविध मंदिरांत दत्त जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.

आज सप्ताहाची सांगता२७ नोव्हेंबरपासून कोटितीर्थ येथील श्री स्वामी समर्थ मंदिरात श्री स्वामी समर्थ अखंड नामजप यज्ञ याग व सहस्त्रचंडी याग सप्ताह सुरू होता. या सप्ताहाची सांगता आज, सोमवारी सकाळी सत्यदत्त पूजन आणि त्यानंतर सकाळी १० वाजून ३० मिनिटांनी महाआरती व प्रसाद वाटपाने होणार आहे.आज महाप्रसादश्री एकमुखी दत्त आखाडा सेवाभावी संस्थेतर्फे मिरजकर तिकटी येथील एकमुखी दत्त मंदिरात दत्त जयंतीनिमित्त सकाळी काकडआरती करण्यात आली. त्यानंतर लघुरुद्र अभिषेक, श्री दत्त सहस्त्र नामावली, दुपारी १२ वा. महाआरती करण्यात आली. संतोष महाराज यांनी गंधलेपन करून पूजा बांधली. सायंकाळी जन्मकाळ सोहळा पार पडला. यानंतर प्रसादाचे वाटप करण्यात आले. आज, सोमवारी सायंकाळी साडेसहा वाजता महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. तरी भाविकांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन संतोष गिरी गोसावी महाराज यांनी केले आहे.आज पालखी सोहळा, महाप्रसाददत्त जयंतीनिमित्त दत्त भिक्षालिंग देवस्थान मंदिरतर्फे सोमवारी पालखी सोहळा सकाळी नऊ वाजता पार पडला.  बिंदू चौक, शिवाजी पुतळा, भवानी मंडप, बिनखांबी गणेश मंदिर, महाद्वार रोड, पापाची तिकटी, महापालिका, लक्ष्मीपुरी (आईसाहेब महाराज पुतळा), चांदणी चौक रविवार पेठमार्गे पालखी सोहळा पार पडला. आहे. याठिकाणी आरतीनंतर दुपारी महाप्रसाद होणार आहे. 

 

टॅग्स :kolhapurकोल्हापूरTempleमंदिर