शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या एका जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ४ नावांवर चर्चा, विक्रम काकडे यांचं नाव आघाडीवर
2
'चंद्रकांता' फेम भरत कपूर यांचं निधन, वयाच्या ८६ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास; अभिनयाचा चार दशकांचा प्रवास थांबला
3
"न कळत सारं घडलं..." लाजिरवाण्या पराभवानंतर अक्षर पटेल झाला 'कावरा बावरा', म्हणे...
4
वेगळ्या घोषणेची गरज नाही, भारत आधीपासूनच हिंदूराष्ट्र - सरसंघचालक मोहन भागवत
5
Bhuvneshwar Kumar : स्विंगचा किंग भुवीची पॉवरप्लेमध्ये कमाल! एकाच डावात दोन खास विक्रमांना गवसणी
6
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
7
चंद्रपुरातील किडनी विक्री प्रकरणात रविंद्रपाल सिंग यांना जामीन नाहीच, हायकोर्टाचा निर्णय; सखोल तपासासाठी अर्ज फेटाळला
8
एमआयडीसीतील फॅक्टरींमध्ये अनेक कामगारांचे पोलिस व्हेरिफिकेशनच नाही; ना कागदपत्र, ना कुणाची नोंद
9
Virat Kohli New Record : किंग कोहलीचा 'विराट' पराक्रम! IPL मध्ये ९००० धावांसह रचला नवा विक्रम
10
२६ कामगारांचा बळी घेणाऱ्या एसबीएल कंपनीतील पाच पदाधिकाऱ्यांना दणका; उच्च न्यायालयाचा अटकपूर्व जामिनास नकार
11
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार, संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
12
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
13
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
14
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
15
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
16
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
17
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
18
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
19
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
20
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
Daily Top 2Weekly Top 5

वळीवडेत नमाज- हदीस पठणावरून दोन गटात धुमचक्री

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 3, 2021 04:25 IST

गांधीनगर : वळीवडे (ता. करवीर) येथील मुस्लीम समाजाच्या दोन गटात हदीस पठणावरून झालेल्या हाणामारीत दोन्ही गटाचे मिळून सहा ...

गांधीनगर : वळीवडे (ता. करवीर) येथील मुस्लीम समाजाच्या दोन गटात हदीस पठणावरून झालेल्या हाणामारीत दोन्ही गटाचे मिळून सहा जण जखमी झाले. तर २१ जणांवर गुरुवारी गांधीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिरोज गुलाब पठाण व जमीर मेहबूब नदाफ यांनी परस्परविरोधी फिर्यादी नोंदवल्या आहेत. वळीवडे येथील जामा मशिदीमध्ये गुलाब पठाण आणि त्यांचे सहकारी नमाज पठण करीत होते. त्यावेळी तबलिक निजामुद्दीन आणि तबलिक शुरा गटातील लोकांमध्ये हदीस पठण करण्याच्या कारणावरून वाद सुरू झाला. जमिर नदाफ व त्यांचे सहकारी येथे येऊन हदीस पठण करू नका, असे सांगून शिवीगाळ करू लागले. त्यामध्ये दोन्ही गटात हाणामारीत झाली.

जखमी फिरोज गुलाब पठाण (रा. मनेरमळा उचगाव ) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार जमीर मेहबूब नदाफ, इरफान इक्बाल नदाफ, अमीर मेहबूब नदाफ, शुक्रणा जमीर नदाफ, आयेशा इरफान नदाफ ,खदीजा अमीर नदाफ, रुबाबी मेहबूब नदाफ,( सर्व रा. वळीवडे) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे, तर जमीर मेहबूब नदाफ (रा.वळीवडे) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार चांद नदाफ, मेहबूब नदाफ, सलीम नदाफ, शकील नदाफ, दस्तगीर नदाफ, युनुस नदाफ, अश्पाक नदाफ, व मनेरमळा येथील अमीर साहब व त्यांचे पाच ते सहा सहकारी अशा १४ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामध्ये फिर्यादी जमीर नदाफ, समीर नदाफ, शुक्राना नदाफ, रूबाबी नदाफ, मोहम्मद नदाफ (सर्व रा. वळीवडे) हे पाच जण जखमी झाले आहेत. दोन्ही गटाकडून परस्परविरोधी फिर्याद गांधीनगर पोलीस ठाण्यात दाखल झाले असून अधिक तपास सपोनि सत्यराज घुले करीत आहेत.