शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
2
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! खुद्द स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
3
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
4
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
5
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
6
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
7
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
8
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
9
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
10
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
11
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
12
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
13
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
14
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
15
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
16
दमदार इंजिनसह BMW ने भारतात लॉन्च केली सर्वात स्वस्त बाईक, जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
17
इन्स्टाग्राम युजर्सना मोठा धक्का! रंगीत फोटो झाले काळे-पांढरे; मिनिटांत करा दुरुस्त, फॉलो करा या सोप्या स्टेप्स
18
"मी त्याच्याशीच लग्न करणार...", बिग बॉस विजेती तन्वी कोलतेने केला खुलासा; प्रेमाबद्दल म्हणाली...
19
राजकारणात येण्यापूर्वी काय करायचे राघव चड्ढा; आपने ग्लॅमरस मोहरा गमावला... 
20
सावधान! फळ आणि भाज्या खाल्ल्याने वाढतोय कॅन्सरचा धोका? नव्या रिसर्चने सर्वच हादरले
Daily Top 2Weekly Top 5

धुळे, सिंधुदुर्ग विजयी

By admin | Updated: November 12, 2014 00:16 IST

ंमहाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ आंतरविभागीय क्रिकेट स्पर्धा

कोल्हापूर : राज्य परिवहन महामंडळामार्फत आयोजित करण्यात आलेल्या आंतरविभागीय क्रिकेट स्पर्धेत आज, मंगळवारी झालेल्या उद्घाटनीय सामन्यात धुळे विभागाने मुंबई विभागावर तर सिंधुदुर्ग विभागाने लातूर विभागावर मात करत विजयी सलामी दिली. शिवाजी स्टेडियम व राजर्षी शाहू स्टेडियमवर झालेल्या सामन्याचे उद्घाटन रा. प. मुंबईचे मुख्य कामगार अधिकारी वि. ना. शेटे व कोल्हापूर विभाग नियंत्रक सुहास जाधव यांच्या हस्ते करण्यात आले. राजर्षी शाहू स्टेडियमवर मध्यवर्ती कार्यालय, मुंबई विभाग विरुद्ध धुळे विभाग यांच्यामध्ये झाला. मुंबई विभागाने प्रथम फलंदाजी करताना २१.४ षटकांत सर्वबाद ५४ धावांपर्यंत मजल मारली. त्यामध्ये कर्णधार संदीप सरणकर यांनी १३ धावा केल्या. धुळे विभागातर्फे गोलंदाजी करताना मिलिंद पाटील व सुनील पाटील यांनी प्रत्येकी तीन बळी तर मोहन किलस्करने दोन गडी बाद केले. उत्तरादाखल खेळताना धुळे विभागाने हे आवाहन ६.१ षटकांत आव्हान पूर्ण करत विजयी सलामी दिली. त्यामध्ये पद्माकर बाबरने नाबाद १७ धावा केल्या. छत्रपती शिवाजी स्टेडियम येथे सिंधुदुर्ग विभाग विरुद्ध लातूर विभाग यांच्यामध्ये सामना झाला. लातूर संघाने प्रथम फलंदाजी करताना २०.४ षटकांत ७७ धावांपर्यंत मजल मारली. त्यामध्ये सचिन संपते याने २४ धावा केल्या. सिंधुदुर्ग विभागातर्फे गोलंदाजी करताना कैतान फर्नांडिसने ३ तर सुधीर भातमारे, तमास अलमेडाने प्रत्येकी २ गडी बाद केले. उत्तरादाखल खेळताना सिंधुदुर्ग विभागाने हे आव्हान अवघ्या १३.४ षटकांत एक गडी गमावून पूर्ण केले. त्यामध्ये शेखर तेंडोलकरने नाबाद ३० धावा तर सागर चिकोडीकरने नाबाद १६ धावा केल्या. उद्घाटनप्रसंगी यंत्रअभियंता एस. डी. कणेगावकर, विभागीय वाहतूक अधिकारी एस. टी. भुरे, उपयंत्र अभियंता बी. के. भातमारे, दीपक घारगे, सोपान गोसावी, मधू बामणे, किरण रावण, प्रभाकर यादव, धर्मशील गायकवाड, शमील शेख आदी उपस्थित होते.