ध्रुव बाेराटेंने केले सिक्कीममधील झोंगरी टॉप सर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 5, 2021 04:20 IST2021-04-05T04:20:46+5:302021-04-05T04:20:46+5:30
कोल्हापूर : बाल गिर्यारोहक ध्रुव विश्वजित बोराटेने सिक्कीम मधील 'झोंगरी टॉप' हा ट्रेक पूर्ण करण्याचा पराक्रम केला. ...

ध्रुव बाेराटेंने केले सिक्कीममधील झोंगरी टॉप सर
कोल्हापूर : बाल गिर्यारोहक ध्रुव विश्वजित बोराटेने सिक्कीम मधील 'झोंगरी टॉप' हा ट्रेक पूर्ण करण्याचा पराक्रम केला. नानी दमन येथील या बाल गिर्यारोहकाने आजपर्यंत अनेक छोटे-मोठे ट्रेक जिद्दीने पूर्ण केले आहेत.
महे (ता. करवीर) येथील ध्रुव याला वडील विश्वजित यांच्याकडून ट्रेकिंगचा वारसा मिळाला. रायगड, दुधसागर, सापुतारा गड, डोंगर माऊली (खानविल सिल्वासा), असे अनेक ट्रेक त्याने लीलया पूर्ण केले आहेत. मार्चच्या पहिल्या आठवड्यात त्याने महाराष्ट्रातील दुसऱ्या क्रमांकाच्या उंचीचे आणि अवघड असे सालहेर, सलोटा हे दोन्ही गड पादाक्रांत केले आहेत.
२० मार्चपासून सिक्कीममधील 'झोंगरी टॉप' या १२ हजार फूट उंचीच्या बर्फाच्छादित असलेले शिखर २३ मार्च रोजी सर केले. या प्रवासात ध्रुवला वडील विश्वजित बोराटे यांची साथ, तर सोबत असलेले डॉ. पंकज देसाई आणि डॉ. मीना देसाई यांचे मार्गदर्शन लाभले.
(फोटो-०४०४२०२१-कोल-ध्रुव बोराटे)