शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
2
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
3
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
4
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
5
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
6
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
7
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
8
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
9
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
10
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
11
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
12
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
13
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
14
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
15
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
16
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
17
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
18
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
19
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
20
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
Daily Top 2Weekly Top 5

शक्तिपीठ महामार्गाविरोधात शेतकरी आक्रमक, पर्यायी कसा नेणार ते सांगा; कोल्हापुरात धरणे आंदोलन

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 25, 2025 12:29 IST

शेतकरी संघर्ष समिती आक्रमक : जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन

कोल्हापूर : शक्तिपीठ महामार्ग रद्द न झाल्याने कोल्हापुरातील शेतकऱ्यांमध्ये संभ्रम आहे. त्यामुळे हा महामार्ग कोल्हापुरातून कसा नेणार, याचे नोटिफिकेशन काढा अशी मागणी करत शक्तिपीठ महामार्गविरोधी संघर्ष समितीच्या वतीने शुक्रवारी येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. संपूर्ण शक्तिपीठ महामार्ग रद्द करा, शेती आमच्या हक्काची, नाही कुणाच्या बापाची, शेतकरी वाचवा, देश वाचवा, जय जवान, जय किसान, अशा घोषणांनी परिसर दणाणून सोडला. या आंदोलनामध्ये शिरोळ, हातकणंगले, करवीर, कागल, भुदरगड व आजरा या सहा तालुक्यांतील शेतकरी सहभागी झाले होते. आंदोलनानंतर पालकमंत्री प्रकाश आबिटकर व निवासी जिल्हाधिकारी संजय तेली यांना निवेदन देण्यात आले. समितीचे समन्वयक गिरीश फोंडे, माजी आमदार संजय घाटगे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते. 

फोंडे म्हणाले, महामार्गाला फक्त कोल्हापुरातून विरोध आहे, हे खोटे आहे. दहा जिल्ह्यांतील आंदोलनाने त्यांचे खोटे उघडे पडले आहे. कोल्हापुरात दोन मंत्र्यांनी सर्वपक्षीय कार्यकर्ते, शेतकऱ्यांची बैठक घेऊन शेतकऱ्यांचा संभ्रम दूर करावा. यावेळी शिवाजी मगदूम, शिवाजी कांबळे, प्रकाश पाटील, सम्राट मोरे, शामराव पाटील, सुरेश संकपाळ यांची भाषणे झाली.महामार्ग रद्दच, चुकीचा प्रचार करणाऱ्यांकडे दुर्लक्ष कराभुदरगड मतदारसंघात काही एजंट हे महामार्ग पाहिजे असा प्रचार करत आहेत. त्यांच्यावर जरब बसवा, अशी मागणी शेतकऱ्यांनी पालकमंत्री आबिटकर यांच्याकडे केली. यावर आबिटकर यांनी शक्तिपीठ महामार्ग रद्द केला आहे, त्यामुळे महामार्ग करा, असा चुकीचा प्रचार करणाऱ्यांकडे दुर्लक्ष करा, असे शेतकऱ्यांना सांगितले.

या केल्या मागण्या

  • कोल्हापुरातील सहा तालुक्यांतील अधिसूचना रद्द केल्याच्या शासन आदेशाप्रमाणे हा महामार्ग कोल्हापुरातून कसा जाणार, याचा उल्लेख असलेले नोटिफिकेशन काढा.
  • काही तालुक्यांमध्ये सुपाऱ्या घेऊन एजंटगिरी करणारे शक्तिपीठ महामार्ग करा, असे सांगत आहेत अशांना सत्ताधारी आमदारांचे समर्थन आहे काय, याचे स्पष्टीकरण द्यावे.
टॅग्स :kolhapurकोल्हापूरhighwayमहामार्गFarmerशेतकरीagitationआंदोलन