येणेचवंडीच्या लेकीचा धारावी पॅटर्न..!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2021 04:30 IST2021-06-09T04:30:26+5:302021-06-09T04:30:26+5:30

नूल: ३१ जानेवारी २०२० रोजी देशात केरळमध्ये कोरोनाचा पहिला रुग्ण सापडला. संसर्गात प्रथम मुंबई, दिल्ली, कोलकाता, चेन्नई, हैद्राबादसारखी ...

Dharavi pattern of Yenechwandi Leki ..! | येणेचवंडीच्या लेकीचा धारावी पॅटर्न..!

येणेचवंडीच्या लेकीचा धारावी पॅटर्न..!

नूल: ३१ जानेवारी २०२० रोजी देशात केरळमध्ये कोरोनाचा पहिला रुग्ण सापडला. संसर्गात प्रथम मुंबई, दिल्ली, कोलकाता, चेन्नई, हैद्राबादसारखी शहर विषाणूने काबीज केली असतानाच मुंबईत विमानतळ, मंत्रालय परिसरामार्गे ‘धारावी’ या प्रचंड दाट लोकवस्तीत कोरोनाचा शिरकाव झाला. दर दिवशी सुमारे दोन हजार रुग्ण सापडत असताना व मुंबई महापालिकेच्या आरोग्य व्यवस्थेपुढे प्रचंड आव्हान उभे राहिले असताना याठिकाणी कोल्हापूर जिल्ह्यातील सामानगडाच्या पायथ्याशी असणाऱ्या येणेचवंडी गावच्या ल. पा. तलावाजवळ शेतवडीत राहून शिक्षण घेतलेल्या धाडसी लेकीने डॉ. अमृताने १० एप्रिल २०२० रोजी धारावीतील ट्रँझिट कॅम्प स्कूलमध्ये भरती असणाऱ्या ४०० रुग्णांची जबाबदारी शिरावर घेतली.

टप्या-टप्प्याने विविध उपाययोजना करत धाडसाने पहिल्या टप्प्यातील कोरोनाला हरवून संपूर्ण भारतात ‘धारावी पॅटर्न’चा डंका वाजविला. ‘आज तक’ इंडिया न्यूजसह अनेक राष्ट्रीय व स्थानिक वाहिन्यांनी तिच्या या कार्याचे कौतुक केले आहे. ‘लोकमत’शी संवाद साधताना तिने धारावीतील कोरोनामुक्तीच्या रहस्याचा उलगडा केला ट्रँझिट कॅम्प स्कूल या चार मजली प्रशस्त इमारतीत ४०० रुग्ण. याशिवाय घरोघरीही रुग्ण होते ते वेगळेच. अमृता यांनी आपल्या हाती असणाऱ्या ४ नर्स व १५ वॉर्डबॉयना कामाची विभागणी करून दिली. सामान्य रुग्णांना आपल्या देखरेखीखाली ठेवून इतर गंभीर रुग्णांना रुग्णवाहिकांच्या सहाय्याने जम्बो कोवीड सेंटर ब्रांदा, सायन, कस्तुरबा, लीलावतीसारख्या शासकीय तसेच खासगी रुग्णालयांकडे वर्ग केले.

प्रत्येक घर-टू-घर, सोसायटी या ठिकाणी कर्मचाऱ्यांनी जावून तपासणी सुरू ठेवली व रुग्णांच्या मनातील भीती दूर करून उपचार घेण्यास प्रवृत्त केले. पहिल्या लाटेत राबविलेला ‘धारावी पॅटर्न’ आजअखेर अखंड सुरू राहिल्याने आजची रुग्णसंख्या अत्यंत नगण्य ठेवण्यात यश आले आहे.

------------------------------

*

आता लसीकरण

आता येथील नागरिकांची कोरोनाबाबतची भीती इतकी दूर झाली आहे की त्यांना लसीकरणासाठी प्रवृत्त करावे लागत आहे.

-

सहकार्य

महापौर किशोरी पेडणेकर, आरोग्य विभागाचे आयुक्त किरण दिघावकर, इतर वरिष्ठ अधिकारी, स्थानिक नगरसेवक, या भागातील प्रतिनिधी व शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड.

------------------------------

* सगळे सहकारी बाधित

एकवेळ माझे सगळे सहकारी बाधित आले. घरी दोन वर्षांचा मुलगा असताना मीही धोक्यात होते. नातेवाईकांच्या दबावाने रुग्णसेवा थांबवून घरी थांबली असताना कानात इन्फेक्शन होऊन रडणाऱ्या तीन वर्षाच्या बाळाच्या आईचा धारावीतून फोन आला. तडक त्या बाळाला बरे करून माझे व्रत मी अखंड सुरू ठेवले यासाठी आई सुमन व पती बँक कर्मचारी कृष्णा यांचे पाठबळ मिळाले.

माहेरची वाट बिकट...रस्त्याचे स्वप्न..!

येणेचवंडी गावी तेही शासनाच्या ल. पा. तलावाजवळ रानात राबून आपण शिवराज हायस्कूल नंदनवाड, शिवराज कॉलेज व ई. बी. गडकरी मेडिकल कॉलेज गडहिंग्लज येथे शिक्षण घेत असताना जिथे दुचाकीदेखील नीट जावू शकत नाही. अशी दगड-धोंड्याची वाट तुडवून आपण शिक्षण घेतल्याचे सांगताना लोकप्रतिनिधींनी हा रस्ता करावा, अशी आपली मनापासून इच्छा आहे.

------------------------------

* सेलिब्रिटींचे प्रोत्साहन

आपल्या या कार्याचे कौतुक वृत्तपत्रे वाहिन्यांनी तर केलेच त्याचबरोबर शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड, किशोर पेडणेकर, स्थानिक नगरसेवक, सिनेकलावंत अजय देवगण, शिल्पा शेट्टी, निर्मिती सावंत, शर्मिला राज ठाकरे यांच्यासह अनेकांच्या प्रोत्साहनामुळेच मला रुग्णसेवा करताना बळ मिळाले.

शेड्युलचा त्रिकोण

सकाळी ९ ते ३ धारावी, संध्याकाळी ६ ते १०.०० सायनमध्ये स्वत:चे क्लिनिक व तेथून भांडुपला घरी पोहोचून संसार अशा रोजच्या शेड्युलचा त्रिकोण सांभाळताना खूप कसरत करावी लागत असल्याचे त्या म्हणाल्या.

फोटो ओळी : मुंबई येथील धारावी ट्रँझिट कॅम्प स्कूलमध्ये भरती असणाऱ्या कोरोना रुग्णांचे अहवाल तयार करताना डॉ. अमृता व तिचे सहकारी. दुसऱ्या छायाचित्रात डॉ. अमृता

क्रमांक : ०७०६२०२१-गड-०९/१०

Web Title: Dharavi pattern of Yenechwandi Leki ..!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.