धनंजय महाडिक यांनी माझी कळ काढू नये, हसन मुश्रीफ यांचा इशारा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 12, 2021 18:53 IST2021-04-12T18:49:54+5:302021-04-12T18:53:58+5:30
Politics GokulMilk Election Kolhapur : गोकुळचा प्रचार करताना धनंजय महाडिक यांनी माझी कळ काढू नये, अन्यथा मी जर तोंड उघडले तर तुम्हाला तोंड दाखवता येणार नाही, असा कडक इशारा ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांनी सोमवारी दिला.

धनंजय महाडिक यांनी माझी कळ काढू नये, हसन मुश्रीफ यांचा इशारा
कोल्हापूर : गोकुळचा प्रचार करताना धनंजय महाडिक यांनी माझी कळ काढू नये, अन्यथा मी जर तोंड उघडले तर तुम्हाला तोंड दाखवता येणार नाही, असा कडक इशारा ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांनी सोमवारी दिला.
महाडिक हे आजरा, गडहिंग्लज, चंदगड तालुक्याच्या दौऱ्यावर असताना त्यांनी गोकुळ मोडण्यासाठीच विरोधक एकत्र आल्याचा आरोप केल्याचे मुश्रीफ यांच्या निदर्शनास आणून दिले. त्यावर मुश्रीफ यांनी ही प्रतिक्रिया दिली.
मी आतापर्यंत कोणाच्याही विरोधात बोललो नाही. पी. एन. पाटील यांच्याशी चर्चा करतानाही मी १५, २० लाख रुपये घेवून नोकऱ्यांचा बाजार याविषयी संताप व्यक्त केला होता. गोकुळ दूध उत्पादकांच्या मालकीचा करू, वासाच्या आणि कमी प्रतीच्या दुधाचा मोबदला देऊ आणि शेतकऱ्यांना दोन, चार रुपये जादा दर देऊ अशी आमची भूमिका आम्ही मांडली. माझ्या जिल्हा बँकेसह साखर कारखाना, अन्य संस्था चांगल्या चालल्या आहेत. त्यामुळे महाडिक यांनी माझ्यावर टीका करू नये. मुंबई, पुण्यातील दूध विक्री, भीमा कारखान्याचं मी बाहेर काढलं तर मग वाईट होईल, असेही ते म्हणाले.