शहरं
Join us  
Trending Stories
1
"आजच्या भेटीचा डायरेक्ट संबंध...!"; फडणवीस-राज ठाकरे भेटीवर संजय शिरसाटांची पहिली प्रतिक्रिया, मनसे प्रमुखांना थेट ऑफरच दिली!
2
Raja Raghuvanshi Case: एक चूक अन् डाव पालटला! राजाच्या हत्येला आत्महत्या दाखवायचे होते; सोनमच्या एका चुकीमुळे झाले उघड
3
"ऑपरेशन सिंदूर हे लहान मुलांच्या व्हिडीओ गेमसारखे" नाना पटोलेंचं वक्तव्य
4
भाजपाची खेळी स्वत:वरच उलटली; १० पैकी ९ नगरसेवकांनी बनवला स्वतंत्र गट, CM फडणवीसांना धक्का
5
Interest Rate Cut : स्वस्त झालं होम आणि कार लोन, 'या' ३ बँकांनी ग्राहकांना दिलं मोठं गिफ्ट
6
पाकिस्तानच्या नागरिकांची अन्नासाठी वणवण अन् ११ कोटींचा शेफ बनवणार शाहबाज शरीफ यांचं जेवण!
7
धरणं सुकली, शेतकरी त्रासले; सिंधु पाणी करार स्थगित झाल्याने पाकिस्तानमध्ये हाहाकार! सध्या परिस्थिती काय?
8
Paytm च्या शेअरमध्ये १०% ची मोठी घसरण; सरकारच्या एका पोस्टनं स्टॉकमध्ये भूकंप
9
महापालिका निवडणुकीत ‘मराठी’ मुद्दा गाजण्याची चिन्हे! पाणी, जमीन, भाषा महत्त्वाची, देशाचे विभाजन होऊ नये; मनसेची भूमिका
10
कामाख्या देवीचं दर्शन ठरलं अखेरचं! राजा रघुवंशीचा मंदिरातील 'तो' फोटो आला समोर
11
आधीच कर्जबाजारी त्यात आणखी भर! पाकिस्तान चीनकडून ४० विमाने खरेदी करणार; बजेटमधून मोठा खुलासा
12
ट्रम्प आणि मस्क यांच्यात 'पॅच-अप'? माफी मागताच एकाच रात्रीत संपत्तीत 'एवढी' वाढ!
13
पन्नाशी ओलांडली तरी इतक्या फिट कशा आहेत कविता मेढेकर? म्हणाल्या- "दोन मुलं झाली तरी..."
14
हनिमूनलाच केली नवऱ्याची हत्या; सोनम-राजा रघुवंशीसारखीच अंगावर काटा आणणारी घटना
15
IND vs ENG: कसोटी मालिकेआधी इग्लंडच्या उपकर्णधाराला विराट कोहलीची आठवण, म्हणाला...
16
राज-फडणवीस भेटले, विरोधकांचे टेन्शन वाढवले? महापालिका निवडणुकीच्या तोंडावर झालेल्या या भेटीसंदर्भात नाना पटोले काय बोलले?
17
'काँग्रेस का हात, पाकिस्तान के साथ' हे पुन्हा एकदा सिद्ध झालं; भाजपाचा नाना पटोलेंवर पलटवार
18
मोठी 'राज'कीय घडामोड! देवेंद्र फडणवीस - राज ठाकरे यांची ताज हॉटेलमध्ये बैठक? चर्चांना उधाण
19
देवेंद्र फडणवीस-राज ठाकरे भेटीनंतरही उद्धवसेनेचे नेते मनसेसोबत युतीवर सकारात्मक, म्हणाले... 

Kolhapur: सेलमच्या चांदी व्यावसायिकाची ७४ लाखांची फसवणूक, हुपरी पोलिसांत गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 27, 2025 16:52 IST

हुपरी : बनावट भेसळयुक्त चांदी देऊन कोल्हापूरच्या सराफाची फसवणूक करणारा रेंदाळचा धनंजय दिलीप पाटील याने सेलम (तामिळनाडू)मधील एका चांदी ...

हुपरी : बनावट भेसळयुक्त चांदी देऊन कोल्हापूरच्या सराफाची फसवणूक करणारा रेंदाळचा धनंजय दिलीप पाटील याने सेलम (तामिळनाडू)मधील एका चांदी व्यावसायिकाची सुमारे ७४ लाख रुपयांची फसवणूक केल्याचा गुन्हा बुधवारी हुपरी पोलिसांत दाखल झाला आहे.धनंजय पाटील सध्या राजारामपुरी पोलिस ठाण्याच्या कोठडीची हवा खात आहे. मूळचे तासगाव तालुक्यातील असलेले, पण व्यवसायानिमित्ताने सेलममध्ये वास्तव्यास असलेले सचिन पाटील यांनी हा गुन्हा दाखल केला आहे.याबाबत पोलिसांतून समजलेली माहिती अशी, सचिन पाटील यांचा सेलममधील कारागिरांकडून विविध डिझाइन्सचे चांदीचे दागिने तयार करून घेऊन विविध भागांतील पेठेवरील सराफांना पोहोच करण्याचा व्यवसाय आहे. धनंजय पाटील याने काही दिवसांची मुदत मागून घेत उधारीवर त्यांच्याकडून सन २०२१ मध्ये ७४ लाख रुपये किमतीचे ११२ किलो चांदीचे दागिने खरेदी केले होते.

गेल्या चार वर्षांच्या कालावधीत सचिन पाटील यांनी वारंवार उधारीची रक्कम वसुलीसाठी पाठपुरावा केला असतानाही धनंजय पाटील यांने अद्यापपर्यंत उधारीची रक्कम परत केलेली नाही. त्यामुळे चांदी व्यावसायिक सचिन पाटील यांनी बुधवारी हुपरी पोलिसांत येऊन फसवणुकीचा गुन्हा दाखल केला.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरfraudधोकेबाजीCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस