शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
2
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
3
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
4
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
5
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
6
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
7
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
8
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
9
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
10
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
11
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
12
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
13
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
14
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
15
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
16
इराणकडून आखाती देशांच्या तोंडचं पाणी पळवण्याची तयारी, पाणी आणि गॅस प्रकल्पांवर हल्ले, नव्या चालीमुळे खळबळ
17
बच्चू कडूंनी रचला खुनाचा कट? आमदार प्रवीण तायडेंचा ऑडिओ क्लिपसह खळबळजनक दावा
18
SIP की एकरकमी गुंतवणूक? १ कोटींचा टप्पा गाठण्यासाठी सर्वात सोपा मार्ग कोणता? पाहा गणित
19
Chanakya Niti: शून्यातून विश्व निर्माण करायचंय? आचार्य चाणक्यांचे 'हे' १० विचार तुम्हाला नक्कीच दिशा देतील
20
९० दिवसांत २८ मृत्यू, मग पुजाऱ्याने दिला 'असा' सल्ला, संपूर्ण गाव झाला रिकामी, आता...  
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur: आदमापूर येथे बाळूमामा भंडारा उत्सवादरम्यान भाविकांना शीतपेयातून विषबाधा; ३५ जण रुग्णालयात

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 16, 2026 12:30 IST

अन्नपदार्थांच्या गुणवत्तेबाबत प्रशासनाने अधिक काटेकोर उपाययोजना कराव्यात अशी भाविकांतून मागणी

गारगोटी : आदमापूर (ता. भुदरगड) येथे संत बाळूमामा भंडारा उत्सवादरम्यान रविवारी रात्री भाविकांना अचानक विषबाधा झाल्याची घटना घडली. दर्शनासाठी आलेल्या काही भाविकांनी थंडपेयाचे सेवन केल्यानंतर त्यांना मळमळ, उलट्या, पोटदुखी व जुलाबाचा त्रास सुरू झाल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. प्रशासनाने परिस्थितीचे गांभीर्य ओळखून प्रकृती अस्वस्थ झालेल्या ३५ जणांना तातडीने मडिलगे बुद्रुक प्राथमिक आरोग्य केंद्र तसेच गारगोटी उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे.मिळालेल्या माहितीनुसार, आदमापूर येथे संत बाळूमामा भंडारा उत्सवानिमित्त लाखोंच्या संख्येने भाविकांची गर्दी झाली आहे. या उत्सवाच्या पार्श्वभूमीवर काही दानशूर व्यक्तींमार्फत भाविकांना थंड पेयांचे वाटप केले जात होते. यावेळी काही भाविकांनी ते प्राशन केले. त्यानंतर काही वेळातच काहीजणांना मळमळ, उलट्या, पोटदुखी व जुलाबाचा त्रास सुरू झाल्याने नागरिकांमध्ये घबराट पसरली.प्रकृती बिघडलेल्या भाविकांना तातडीने रुग्णालयांमध्ये हलवून उपचार सुरू करण्यात आले. आरोग्य विभागाच्या पथकाने घटनेची माहिती मिळताच तातडीने घटनास्थळी धाव घेत परिस्थितीचा आढावा घेतला. प्रशासन जरी ३५ रुग्णांची माहिती देत असले तरी प्रत्यक्षात ही संख्या शेकड्यांत असल्याची भीती व्यक्त होत आहे. रुग्णवाहिकांच्या सायरनमुळे गावातील लोकांना नेमके काय झाले, हे समजत नव्हते. सर्व रुग्णांची प्रकृती सध्या स्थिर असल्याची माहिती गटविकास अधिकारी डॉ. शेखर जाधव यांनी दिली.दरम्यान, या घटनेनंतर प्रशासनही सतर्क झाले असून, डॉ. शेखर जाधव, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. आनंद वर्धन तसेच उपजिल्हा रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षक डॉ. पल्लवी तारळकर हे परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत.

याबाबत प्रांताधिकारी हरेश सूळ यांनी सांगितले की, सुमारे ३५ लोकांना याची बाधा झाली आहे. तालुक्यातील मडिलगे बुद्रुक प्राथमिक आरोग्य केंद्र, गारगोटी उपजिल्हा रुग्णालय तसेच वाघापूर उपकेंद्रात रुग्णांची व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच रुग्णांची संख्या वाढल्यास तातडीची उपाययोजना म्हणून राधानगरी व कागल तालुक्यांतील आरोग्य विभागालाही सज्ज ठेवण्यात आले आहे. आवश्यक औषधसाठा उपलब्ध असून सर्व वैद्यकीय अधिकारी व आरोग्य कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत.दरम्यान, या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून, अन्नपदार्थांच्या गुणवत्तेबाबत प्रशासनाने अधिक काटेकोर उपाययोजना कराव्यात, अशी मागणी भाविकांतून होत आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Kolhapur: Food poisoning during Balumama Bhandara festival, 35 hospitalized.

Web Summary : 35 devotees were hospitalized due to suspected food poisoning after consuming cold drinks at Balumama Bhandara festival in Admapur, Kolhapur. Symptoms included vomiting and abdominal pain. Authorities are investigating.