देवकर पाणंदमध्ये घरफोडी, लाखाचा ऐवज लंपास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 5, 2019 18:29 IST2019-03-05T18:28:20+5:302019-03-05T18:29:19+5:30
सरदार पार्क, देवकर पाणंद येथील बंब बंगल्याच्या दरवाजाचे कुलूप तोडून चोरट्यांनी कपाटातील सोन्याचे गंठण, अंगठी, चांदीचे करंडे असा सुमारे लाख रुपयांचा ऐवज चोरून नेल्याचे उघडकीस आले. हा प्रकार १ ते ३ मार्च या कालावधीत घडला. घरफोडीमुळे परिसरातील नागरिकांत भीती पसरली आहे.

देवकर पाणंदमध्ये घरफोडी, लाखाचा ऐवज लंपास
कोल्हापूर : सरदार पार्क, देवकर पाणंद येथील बंब बंगल्याच्या दरवाजाचे कुलूप तोडून चोरट्यांनी कपाटातील सोन्याचे गंठण, अंगठी, चांदीचे करंडे असा सुमारे लाख रुपयांचा ऐवज चोरून नेल्याचे उघडकीस आले. हा प्रकार १ ते ३ मार्च या कालावधीत घडला. घरफोडीमुळे परिसरातील नागरिकांत भीती पसरली आहे.
अधिक माहिती अशी, वैभवी प्रसाद मायनेकर (वय ३६) यांचे पती टपाल कार्यालयात लिपिक आहेत. सासूचा अपघात झाल्याने त्यांना पाहण्यासाठी मायनेकर कुटुंबीय तीन दिवसांसाठी शिवाजी पेठेतील दिराच्या घरी राहण्यासाठी गेले होते.
रविवारी (दि. ३) त्यांच्या शेजारी राहणाऱ्यांना बंगल्याचे कुलूप तोडून बाजूला टाकलेले दिसले. त्यांनी या प्रकाराची माहिती मायनेकर कुटुंबीयांना दिली. त्यांनी घरी येऊन पाहिले असता, चोरी झाल्याचे लक्षात आले.
जुना राजवाडा पोलीस ठाण्याचे निरीक्षक मानसिंह खोचे यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. गेल्या चार दिवसांत देवकर पाणंद परिसरात चोरट्यांनी धुमाकूळ घातला आहे.