शहरं
Join us  
Trending Stories
1
Operation Sindoor Live Updates: PM मोदींनी घेतली राष्ट्रपतींची भेट; 'ऑपरेशन सिंदूर'ची दिली माहिती
2
Operation Sindoor : पाकिस्तानमधील स्ट्राइकनंतर पीएम मोदींनी सैन्याचे कौतुक केले; कॅबिनेट बैठकीत काय झाले?
3
ऑपरेशन सिंदूरनंतर अमित शाहांनी बोलावली महत्वाची बैठक; या 9 राज्यांचे मुख्यमंत्री उपस्थित
4
Operation Sindoor: मोठी बातमी! जम्मू, अमृतसरसह देशातील ९ एअरपोर्ट १० मे पर्यंत बंद; अनेक उड्डाणं रद्द
5
मोहिनी एकादशी: श्रीविष्णू होतील प्रसन्न, ‘असे’ करा व्रत; पाहा, मुहूर्त, महात्म्य अन् मान्यता
6
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये ८ कोटींचे स्कॅल्प, ८४ लाखांचा बॉम्ब... हल्ल्यासाठी किती महागडी अस्त्र वापरली?
7
"दहशतवादाला जगात थारा नाही..."; सचिनपासून सेहवागपर्यंंत ऑपरेशन सिंदूरचं सर्वत्र कौतुक, कोण काय म्हणाले?
8
Astro Tips: बुध हा बुद्धी देणारा ग्रह, मात्र मेष आणि वृश्चिक राशीच्या बाबतीत दाखवतो वेगळेच रंग!
9
Operation Sindoor: 'आता त्यांना कुंकवाचा पराक्रम कळला असेल', अविमुक्तेश्वरानंत सरस्वतींचे विधान
10
चंद्र-केतु ग्रहण योगात मोहिनी एकादशी: ७ राशींवर लक्ष्मी नारायणाची कृपा, शुभ फले; घवघवीत यश!
11
BSNL नं आणली Mother's Day ऑफर, स्वस्त केले आपले ३ रिचार्ज प्लान्स; पाहा डिटेल्स
12
Operation Sindoor : "जे काही घडलं ते बरोबर, पहलगाममध्ये धर्म विचारणाऱ्या ४ दहशतवाद्यांचाही केला पाहिजे खात्मा"
13
विजापूरमध्ये भीषण चकमक; कर्रेगुट्टा टेकड्यांमध्ये लपलेल्या 15+ नक्षलवाद्यांचा खात्मा
14
त्यांनी महिलांना मारलं नाही पण...; पहलगाम हल्ल्याचे प्रत्यक्षदर्शी 'ऑपरेशन सिंदूर'वर काय म्हणाले?
15
Operation Sindoor: कित्येक निष्पापांचा जीव घेतला! आता स्वतःच्या कुटुंबाचा खात्मा झाल्यावर दहशतवादी मसूद अजहर म्हणतो...
16
Operation Sindoor : कठीणातल्या कठीण प्रदेशात हेलिकॉप्टर उडविण्याचा हातखंडा; हवाई दलाच्या व्योमिका सिंग, ज्यांनी ऑपरेशन सिंदूरची दिली माहिती
17
Operation Sindoor नंतर शेअर बाजाराबाबत मोठी अपडेट, BSE-NSE नं घेतला महत्त्वाचा निर्णय
18
“विना अपघात सेवा बजावणाऱ्या ST चालकांचा रोख रक्कम देऊन गौरविण्यात येणार”: प्रताप सरनाईक
19
पाकविरोधात आणखी मोठी कारवाई? गृहमंत्र्यांच्या J&Kच्या मुख्यमंत्री-नायब राज्यपालांना सूचना...
20
Kangana Ranaut : "मोदींनी त्यांना दाखवून दिलं"; 'ऑपरेशन सिंदूर' नंतर कंगना राणौतची सैन्याच्या सुरक्षिततेसाठी प्रार्थना

कोल्हापुरातील अंबाबाई मंदिराचा १,४९६, जोतिबाचा २६० कोटींचा विकास आराखडा मंजूर

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 7, 2025 12:42 IST

चौंडी येथील मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता

कोल्हापूर : गेली अनेक वर्षे चर्चेत असलेल्या अंबाबाई मंदिराच्या १,४९६ कोटी आणि जोतिबा मंदिर विकासाच्या २६० कोटी रुपयांच्या आराखड्याला अहिल्यानंतर जिल्ह्यातील चौंडी येथे मंगळवारी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली. पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी ही माहिती दिली.या बैठकीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, आरोग्यमंत्री व कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री प्रकाश आबिटकर, वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ, राज्यमंत्री व सहपालकमंत्री माधुरी मिसाळ, कोल्हापूर जिल्ह्याचे पालक सचिव राजगोपाल देवरा यांची प्रमुख उपस्थिती होती.गेली अनेक वर्षे या दोन्ही प्रमुख देवस्थानांच्या विकासाचा मुद्दा चर्चेत होता. अंबाबाईचा विकास आराखडा तर टप्प्याटप्प्यानेच तयार करण्यात आला. परंतु यामध्ये एकजिनसीपणा नव्हता. परंतु गेल्या दोन वर्षात हा एकात्मिक विकास आराखडा तयार करण्यात आला आणि तो सर्व त्रुटी काढून मंत्रिमंडळासमोर मांडण्यात आला. याची पूर्वतयारी म्हणून अंबाबाई मंदिर परिसरातील संभाव्य विस्थापितांच्या बैठकाही जिल्हा प्रशासनाने घेतल्या होत्या.दुसरीकडे आमदार विनय कोरे यांच्या पाठपुराव्यामुळे जोतिबा देवस्थानच्या विकासाचा आराखडाही तयार झाला. याबाबतचे प्राधिकरणच स्थापन करण्यात आले असून आता याही कामाला गती येणार आहे. प्रकाश आबिटकर यांनी पालकमंत्रिपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर या दोन्ही आराखड्यांबाबत प्रत्येक टप्प्यावर लक्ष घातले. परिणामी चौंडी येथील मंत्रिमंडळ बैठकीत या विकास आराखड्यांना मंजुरी मिळाली आहे.या बैठकीला जिल्हाधिकारी अमोल येडगे, जिल्हा नियोजन अधिकारी विजय भोपळे, कार्यकारी अभियंता चंद्रकांत आयरेकर व रोहित तोंदले, सहायक जिल्हा नियोजन अधिकारी सागर पाटील, पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे सचिव शिवराज नायकवडे, उपअभियंता सुयश पाटील तसेच संबंधित कन्सल्टंट व आर्किटेक्ट संतोष रामाणे व अभिनंदन मगदूम उपस्थित होते.

अंबाबाई विकास आराखड्यात या बाबींचा समावेश

  • मंदिराची दुरुस्ती व संवर्धन
  • किरणोत्सव मार्गातील अडथळे व अतिक्रमणांचे निर्मूलन
  • मंदिर परिसरातील दुकान गाळ्यांचे व्यवस्थापन
  • दर्शनासाठी अच्छादित मंडप
  • स्वच्छतागृह व पिण्याच्या पाण्याची सुविधा
  • लॉकर्स, शू स्टँड
  • भवानी मंडप परिसराचा ‘हेरिटेज प्लाझा’ म्हणून विकास

जोतिबा मंदिर व परिसर विकास आराखड्यात या बाबींचा समावेश

  • श्री क्षेत्र जोतिबा व यमाई मंदिराचे संवर्धन
  • पायवाटांचे जतन
  • कर्पूरेश्वर, चव्हाण व मुरलीधर तलावांचे संवर्धन
  • भाविकांसाठी वाहनतळ, सुविधा केंद्र
  • अपारंपरिक ऊर्जा स्रोताद्वारे ज्योतस्तंभ निर्मिती
  • घनकचरा व सांडपाणी प्रकल्प
  • केदार विजय गार्डन व नवतळे परिसराचे सुशोभीकरण
  • यमाई मंदिर चाफेवन परिसर विकास

साडेतीन पीठापैकी एक असलेल्या अंबाबाई मंदिराच्या आणि दख्खनचा राजा जोतिबा विकास आराखड्यास मंजुरी दिल्याबद्दल मी मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचे आभार मानतो. या निर्णयामुळे कोल्हापूर जिल्ह्यातील पर्यटन व विकास कार्याला गती मिळणार आहे. जिल्हा प्रशासनाने दोन्ही मंदिरांसाठी सखोल अभ्यास करून आवश्यक व प्राधान्य कामांचा समावेश करत उपयुक्त आराखडा तयार केला आहे. जगभरातील भाविकांसाठी ही आनंदाची बाब आहे. - प्रकाश आबिटकर, पालकमंत्री, कोल्हापूर

टॅग्स :kolhapurकोल्हापूरMahalaxmi Temple Kolhapurमहालक्ष्मी मंदिर कोल्हापूरJyotiba Templeजोतिबा