१०३० ग्रामपंचायतींना विकास निधी
By Admin | Updated: January 11, 2016 00:50 IST2016-01-11T00:30:22+5:302016-01-11T00:50:55+5:30
निवडलेल्या गावात काय कामे ?

१०३० ग्रामपंचायतींना विकास निधी
आमदारांनी दत्तक घेतलेल्या गावांत जागृतीचे काम सुरू आहे. येथे लोकसहभागातून विकास आराखडा तयार करण्यात येणार आहे. त्यानंतर लोकप्रतिनिधी, शासकीय कर्मचारी, गावकरी सामुदायिक शपथ घेतील. मूलभूत अधिकार आणि कर्तव्य याबद्दल सामूहिक कटिबद्धता बिंबविणे, आरोग्य शिबिराचे आयोजन करणे, पशु आरोग्य शिबिर घेणे, अंगणवाडीतील सेवेचा दर्जा सुधारणे, शाळेतील शैक्षणिक गुणवत्ता सुधारणे, वृक्षारोपण करणे, महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेतून काम करणे, जन धन योजनेंतर्गत बँक खाती उघडण्याची मोहीम राबविणे अशी कामे करून गावचा सर्वांगीण विकास करणे अपेक्षित आहे. अन्य गावांसमोर असा गावचा विकास करावा लागणार आहे.
ग्रामविकास विभागातर्फे १४ व्या वित्त आयोगातून लोकसंख्येच्या प्रमाणात जिल्ह्यातील १०३० ग्रामपंचायतींना कमीतकमी एक ते जास्तीतजास्त
८० लाखांपर्यंत विकास निधी मिळणार आहे. यामुळे गावांच्या विकासाला चालना मिळणार आहे. दरम्यान, पुढील वर्षी पाच वर्षांसाठी प्रत्येक गावांचा विकास आराखडा तयार करण्यात येणार आहे.
ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्था सक्षम करण्यासाठी
१४ व्या वित्त आयोगाच्या शिफारसीनुसार ग्रामपंचायतींना अनुदान दिले जाते. दोन टप्प्यात ६६ कोटी ८३ लाख १४ हजार रुपये मिळाले आहेत. हा निधी ग्रामपंचायतीला वर्ग करण्यात आला आहे. दुर्गम भागातील वाड्या, वस्त्या वगळता अन्य गावांत वीज, पाणी, रस्ते अशी मूलभूत विकासाची कामे झाली आहेत. स्मशानशेड, पाणीपुरवठा यांची कामेही होत आहेत.
चौदाव्या वित्त आयोगातून सर्वच ग्रामपंचायतींना निधी मिळाला आहे. त्यामुळे ग्रामीण विकासाला चालना मिळाली आहे. बहुतांश गावात मूलभूत सुविधा झाल्या आहेत.
-एम. एस. घुले, उपमुख्य
कार्यकारी अधिकारी (ग्रामपंचायत)
आमदार आदर्श गावासाठी वेळापत्रक असे :
३१ आॅक्टोबर २०१५ पर्यंत गावांची निवड.
१५ नोव्हेंबर २०१५ पर्यंत निवडलेल्या ग्रामपंचायतीसाठी प्रभारी अधिकाऱ्याची नेमणूक करणे
३० नोव्हेंबर २०१५ पर्यंत जागृती व वातावरण
निर्मिती करणे
१ डिसेंबरपर्यंत काम सुरू करणे
८ मार्च २०१६ पर्यंत प्रारूप ग्राम विकास
आराखड्यास ग्रामसभेत मंजुरी घेणे
८ मार्च ते ३० एप्रिल अखेर आराखड्यानुसार विविध घटकांच्या योजनांना तांत्रिक प्रशासकीय व वित्तीय मान्यता घेणे.
२ आॅक्टोबर २०१६ पर्यंत पहिले गाव आदर्श करणे.
२०१९ पर्यंत अशाप्रकारे तीन गावे आदर्श करणे.